Dalimb Crop Cover 2025 घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे.

काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे. संपूर्ण बाग पांढरी शुभ्र दिसत आहे.
हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी ठरत आहे. गाडेकर हे गेली 40 वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांनी शेतात अनेक नवनवीन प्रयोग राबवत उंच्चाकी उत्पन्न मिळवले आहे.
गाडेकर यांनी 1 जुलै 2023 रोजी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंब पिकाची चार पद्धतीत 3 हजार 300 रोपांची लागवड केली. दोन वर्षात आता एक झाडाला सुमारे 100 फळे लागलेली आहेत.
Dalimb Crop Cover 2025 असे केले व्यवस्थापन
- संपूर्ण बागेची स्टीलचे पाईप द्वारे बांधणी.
- एकरी 10 ते 15 ट्रक शेणखताचा वापर.
- शेतीचा सेंद्रिय कर्ब 2.58 आहे.
- गुजरात येथून क्रॉप कव्हर खरेदी केला.
- संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हर टाकला.
- 3 लाख रुपयांचा क्रॉप कव्हर आणि मजुरी 50 हजार.
सौर कृषी पंपसाठी 100 कोटींच्या निधी वितरणास मंजुरी, वाचा सविस्तर;
Dalimb Crop Cover 2025 रोग प्रतिरोधक वातावरण
क्रॉप कव्हरमुळे उन्हाची तीव्रता रोखली जात असल्याने पाण्याची धूप कमी होत असून तेल्या रोगासाठी प्रतिरोधक वातावरण बनत आहे.
शिवाय हवेतून येणारी धूळ व जीवजंतू यांची फळाशी संपर्क रोखला जात असल्याने फळाची गुणवत्ता वाढत असल्याचे गाडेकर यांचे म्हणणे आहे.
ड्रीप, शेणखत, रोपे, स्टील, तार, क्रॉप कव्हर यांसह मजुरी यासाठी आजपर्यंत सुमारे 60 ते 70 लाखांचा खर्च झाल्याचे गाडेकर यांनी सांगितले आहे.
“डाळिंब सेंद्रिय पद्धतीने पिकवले आहेत. बाहेर देशात निर्यात करण्यासाठी वरील पद्धतीने डाळिंब बागेची काळजी घेतली आहे. दोन महिन्यात डाळिंब विक्रीसाठी येतील. चांगला बाजार भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.”

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |