Dalimb Bajar Bhav 2025 अकलूज सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला 301 रुपयांचा प्रति किलो उच्चांकी दर मिळाल्याने सहकार पंढरीचा डाळिंब पंढरी म्हणून पुढे येत आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सिद्धिविनायक फ्रुट कंपनीच्या सागर नागणे यांच्या अडत दुकान दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला 301 रुपये प्रति किलो दर मिळाला.
कृषी व्यापारातील संधी व आव्हाने!!
Dalimb Bajar Bhav 2025 तसेच बालाजी फ्रुट कंपनीचे चालक अमोल जाधव यांच्या अडत दुकानी शेतकरी युवराज मरकड यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला 301 रुपये प्रति किलो दर मिळाला.

Dalimb Bajar Bhav 2025 चोख वजन आणि रोख पट्टी
बाजार समितीत शेतमालाचे योग्य प्रकारे मापाडी तोलार यांच्याकडून चोख वजन शेतमालाची रोख पट्टी यामुळे अकलूज बाजार समितीचा नावलौकिक झाला बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत सूक्ष्म नियोजन व पायाभूत सुविधा यामुळे बाजार घटक समाधानी आहेत.
Dalimb Bajar Bhav 2025 शेतकऱ्यांमध्ये आनंद
डाळिंब पूर्व सीजन सुरू होत असताना चांगल्या घरामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकलूज बाजारपेठ मध्यवर्ती असल्याने इंदापूर, माढा, मान, खटाव, फलटण, येथून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी अकलूज बाजार समितीकडे आणत आहेत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |