राज्यातून बेदाणा निर्यातीत मोठी घट!! Currant Exports 2025

Currant Exports 2025 सांगली: नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बेदाणा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. 2024-25 आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत राज्यातून 42 हजार 716 टन बेदाण्याची निर्यात झाली होती.

Currant Exports 2025

Currant Exports 2025 मागील वर्षाच्या तुलनेत बेदाणा निर्यातीत यंदा लक्षणीय घट झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात केवळ 7 हजार 924.99 टन बेदाण्याची निर्यात झाली आहे.

शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार!!

Currant Exports 2025 गतवर्षीच्या तुलनेत बेदानाच्या निर्यातीत 81.45% घट झाली आहे. महाराष्ट्राला यामुळे दरवर्षी मिळणाऱ्या परकीय चलनात यावर्षी तब्बल 414 कोटी रुपयांची घट झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Currant Exports 2025 महाराष्ट्रात दरवर्षी 2 लाख 50 हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात जवळपास एक लाख टनाने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे.

केवळ 1 लाख 50 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात बेदाण्याची विक्री सर्वाधिक झाली. या सर्व कारणांमुळे बेदाणा निर्यातीला गंभीर परिणाम झाला आहे.

कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार 2024-25 आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातून 42 हजार 716.41 टन बेदाण्याची निर्यात झाली असून त्यातून 541 कोटी 21 लाख रुपये परकीय चलन मिळाले होते.

WhatsApp Group Join Now

मात्र, 2025-26 आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत केवळ सात हजार 924.99 टन बेदाण्याची निर्यात झाली असून त्यातून 127 कोटी 11 लाख रुपये परकीय चलन मिळाले.

म्हणजेच, 34 हजार 791.42 टन बेदाण्याची निर्यात कमी झाली आहे. ज्यामुळे देशाला 414 कोटी 1 लाख रुपयांचे परकीय चलन गमवावे लागले.

या देशात होतेय बेदाणा निर्यात Currant Exports 2025

बेदाण्याची निर्यात मोरोक्को, रोमानिया, रशिया, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशात होते, असे निर्यातदारांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून द्राक्षाच्या उत्पदनात घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबाग काढून टाकल्यामुळे ही महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन कमी झाले. यामुळे बेदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्याचा औचित्यपूर्ण परिणाम निर्यातीवर हि झाला आहे. मात्र, बेदाण्यास चांगले दर मिळत आहेत. -राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन आणि निर्यातदार”

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment