अधिक उत्पादनक्षम सोयाबीनच्या सुधारित वाणांच्या लागवडीसाठी प्रसार!! Cultivation of more Productive Soybeans 2025

Cultivation of more Productive Soybeans 2025 पुणे स्थितीत महाराष्ट्र विज्ञान अंगभूत आघारकर संशोधन संस्थेमध्ये सन 1968 सालापासून सोयाबीन पिकावर भा.कृ.सं.प. नवी दिल्लीच्या संयोगाने अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प अंतर्गत सोयाबीन या महत्त्वाच्या नगदी पिकावर संशोधनाचे काम सुरू आहे. जास्त उत्पादन क्षम वाणांची निर्मिती सोयाबीन पिकाबद्दलची वाढलेली लोकप्रियता त्यापासून होणारे फायदे कमी कालावधीत हाताशी येणारे खरीपातील पीक इत्यादींमुळे राज्यातील सोयाबीन क्षेत्रात मोठी वाढ झाली.

Cultivation of more Productive Soybeans 2025

परिणामी महाराष्ट्र राज्य सोयाबीन उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले. या सर्वांसोबतच अलीकडील काळात सोयाबीनच्या कमी कालावधी तयार होणाऱ्या यंत्राद्वारे काढणीस योग्य विविध रोग व किडीस प्रतिरोधक आणि पोषण दृष्टीने महत्त्व असणाऱ्या सोयाबीन मानांची मागणी वाढली. तदनुषंगाने अशा वाहनांच्या विकसनावर या संस्थेद्वारे भर देण्यात आला.

पावसामुळे फुल शेतीचे नुकसान; आवक झाली कमी, वाढणार भाव!!

Cultivation of more Productive Soybeans 2025 एमएसीएस 1460:

  • हा वाण देशाच्या दक्षिण पूर्व आणि उत्तर पूर्वी पर्वतीय प्रदेश या प्रमुख तीन क्षेत्रांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
  • दक्षिण क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हा वाण 89 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो.
  • या वाणांच्या झाडास 3 ते 4 फांद्या फुटतात व ते 42 ते 45 सेंटीमीटर पर्यंत उंच वाढते.
  • या स्थिती 33 व्या दिवसापासून पांढऱ्या रंगाची फुले येण्यास सुरुवात होते.
  • शेंगा लव विहरीत पिवळ्या रंगाचे 3 दाणे असणाऱ्या व फुटण्यास प्रतिबंधक असतात.
  • यांच्या बिया गोलाकार आणि मध्यम आकाराच्या असून त्यावर फिकट काळ्या रंगाचे हायलम असते.
  • या वाणास शेंगा जमिनीपासून सात सेंटीमीटर उंची पासून लागण्यास सुरुवात होते, त्यामुळे हा मानयंत्राद्वारे कापणीस योग्य आहे.
  • हे वाण मावा, खोडमाशी, चक्री, भुंगा, पाने खाणारी, व पोखरणारी अळी व बिहारी केसाळ अळी या किडींना मध्यम प्रतिकारक्षम आहे.
  • या वानाची उगवण क्षमता चांगले असून यांच्या बियांमध्ये 18.91% तेल व 41 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे.
  • हे वाण सरासरी 22 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

WhatsApp Group Join Now

Cultivation of more Productive Soybeans 2025 एमएसीएस 1407:

  1. हे वाण मध्य उंचीचा असून सरासरी 58 सेंटीमीटर पर्यंत उंच वाढतो.
  2. यास 37 व्या दिवसापासून पांढऱ्या रंगाचे फुले लागण्यास सुरुवात होते.
  3. हे वाण सरासरी 104 दिवसांमध्ये काढण्यास तयार होते.
  4. यांच्या शेंगांमध्ये 3 दाणे असून ते मध्यम गोलाकार पिवळ्या रंगाचे असतात तर त्यावर तपकिरी हायलम असते.
  5. यांच्या झाडांची पाने हिरवी असून यांचा आकार त्रिकोणी आहे.
  6. शेंगावर लव असून पकवतेच्या वेळी शेंगांचा रंग तपकिरी होतो आणि काढणीच्या वेळी शेंगा फुटत नाहीत.
  7. या वाणास शेंगा जमिनीपासून 7 सेंटीमीटर उंची पासून लागण्यास सुरुवात होते, त्यामुळे हे वाण यंत्राद्वारे कापणीस योग्य आहे.
  8. या वाणाची उगवण क्षमता चांगली असून यांच्या बियांमध्ये 91.81 टक्के तेल व 41 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे.
  9. हे वाण सरासरी 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

Cultivation of more Productive Soybeans 2025 एमएसीएस 1520:

  • हे वाण शंभर दिवसात कडून तयार होते.
  • यास 40 व्या दिवसापासून जांभळ्या रंगाची फुले लागण्यास सुरुवात होते,
  • झाडास तीन ते चार फांद्या फुटतात व झाडांची उंची सरासरी 56 cm असते.
  • पानांचा रंग गर्द हिरवा असतो.
  • एका झाडात सरासरी 48 शेंगा लागतात, शेंगावर लव असते व प्रत्येक शेंगांमध्ये तीन बिया असतात.
  • बिया मध्यम गोलाकार पिवळ्या रंगाच्या असून त्यावर काळा रंगाचे हायलम असते.
  • शेंगावर लव असून पकवतेच्या वेळी शेंगांचा रंग तपकिरी होतो आणि काढणीच्या वेळी उशीर फुटत नाहीत.
  • हेवान कोळसा कूज व अल्टरनेरिया लीफ स्पॉट या रोगांना प्रतिकारक्षम आहे.
  • या वाणाची उगवण क्षमता उत्तम असून, यांच्या बियांमध्ये 18.51 टक्के तेल व 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे.
  • हे वाण सरासरी 21 ते 29 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

Cultivation of more Productive Soybeans 2025 एमएसीएस-एनआरसी 1667:

  • हा पोषण विरोधी घटक कुर्नित्झ ट्रिप्सीन एनव्हीबीटर नसणारा सोयाबीनचा अगदी अलीकडेच देशाच्या दक्षिण क्षेत्रात लागवडीसाठी प्रसारित झालेला वाण आहे.
  • पारंपारिक वनस्पती प्रजनन पद्धत आणि जैव तंत्रज्ञान यांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून एमएसीएस आघारकर संशोधन संस्था पुणे व आयसीएमआर-भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर यांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे.
  • या वाणामुळे सोयाबीनचा खाद्य-अन्न पदार्थ निर्मिती व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग वाढू शकणार आहे.
  • हा वाण यापूर्वी विकसित व प्रसारित केलेल्या एमएसीएस 450 या वाहनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गरज म्हणून विकसित बाण म्हणून प्रसारित करण्यात आला आहे.

Cultivation of more Productive Soybeans 2025 या वनांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात विविध गुणधर्म व गुणवत्तापूर्ण सोयाबीनचे बीज निवडण्यास वाव निर्माण होणार आहे. त्यापासून मिळणाऱ्या भरघोस उत्पादनामुळे शेतकऱ्यांची भरभराट होऊन ते समृद्ध होतील अशी अपेक्षा आहे. वर नमूद केलेले वाण नुकतेच लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment