Crop Rotation to Increase Production 2025 महाराष्ट्रातील शेती हि बहुतांशी पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचे प्रमाण हे अनियमित अनिश्चित असल्यामुळे पीकी उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नसते. त्यामुळे याकरिता जेवढे उपलब्ध पाणी आहे. त्याचा चांगला प्रकारे उपयोग करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचा नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

Crop Rotation to Increase Production 2025 यासाठी पिकांचे फेर नियोजन करण्याची गरज आहे. प्रत्येक हंगामात विविध पिके घेण्यात येतात. त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला पिके, फुलपिके, फळ पिके यांचा समावेश होतो. शेतकरी बंधू कडून पिकांची पेरणी करताना ज्या पिकास चांगला भाव मिळेल त्याचीच पेरणी करतात. पण या सर्व प्रक्रियेमध्ये पिकांच्या फेरपालटीचा विचार केला जात नाही.
पान वेलीचे एकात्मिक रोग व्यवस्थापन!!
Crop Rotation to Increase Production 2025 पिकांचे नियोजन हे मुख्यतः उपलबध पाणीसाठा, पिकांना भविष्यात मिळणारा भाव, अवलंबून असतो. कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केल्यास सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरबरा अशा पिकांचे नियोजन केल्यास त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. जमिनीचे आरोग्य जर उत्तम असेल तर त्यातील जिवाणू आणि पिकांचे आरोग्य उत्तम अशा पोषणतत्वांनी युक्त असलेल्या पिकांमुळे पशुधनाचे माणसाचे आरोग्य उत्तम राहते.

पीक नियिजनातील फेरबदल:
Crop Rotation to Increase Production 2025 पूर्वीची पीक पद्धत त्यातील टप्पे व पद्धतीतील फेरबदल यादृष्टीने भविष्यामध्ये पीक पद्धत कशी असावी तसेच त्यासाठीच्या संभाव्य बाबी खालीलप्रमाणे…
एकपिक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा. एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करणे ऐवजी विविध पिकांचे नियोजन करून लागवड केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते. उदा. पूर्ण क्षेत्रावर कापूस केव्हा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य, ज्वारी, चारापिके तसेच फळपिकांच्या हि समावेश करावा.
सध्या भविष्यातील पिकांच्या किंमतींचा अंदाज बऱ्यापैकी समजत असल्यामुळे त्याआधारे आधीच काही धोरणे उदा. आयात / निर्यात धोरण साठवणूक करणे क्षेत्र व उत्पादकता वाढविणे इत्यादी बाबींची काही धोरणे ठरवून नियोजन करण्यात येत आहे.
जागतिक हावमानामुळे गेल्या काही वर्षा पासून पाऊस वेळेवर येत नाही खंडित पाऊस यामुळे मूग, उडीद व तूर यासारख्या कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम होतो व त्यामुळे उत्पन्न घटते.
लागवड करण्यात येणाऱ्या म्हणजेच पेरणी करण्यात येणाऱ्या सर्व पिकांची वाढ व त्यांची अन्नद्रव्य घेण्याची पद्धत एकसारखी नसते काही पिकांची मुळे तंतुमय असतात व ती जमिनीच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त 90 सेंमी खोलीपर्यंत जातात. तेवढ्याच खोलीवर अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे शेतामध्ये पिकांची पेरणी करताना एकाच प्रकारच्या पिकांची पेरणी न करता 2 किंवा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने मुळांची वाढ होणाऱ्या पिकांची म्हणजेच तृणधान्या सोबत कडधान्य किंवा गळितधान्य या पिकांची आंतर पीक पद्धतीने पेरणी करावी.
जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना पुढील बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.
- जमीन हवामान आणि आर्थिक परिस्थीतीशी हि पद्धत अनुकूल असावी.
- उत्पादन टिकवून व जमिनीची कमीत कमी झीज होईल याचा विचार करून फेरपालट अवलंबवावी.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकवण्याच्या दृष्टीनेच न्हवे तर आणखी वाढण्याच्या दृष्टीने फेरपालट या योजनेत जमिनीत सुधारणा करणाऱ्या पिकासाठी पुरेसे क्षेत्र ठेवले पाहिजे.
- शेंग कुळातील पिकासाठी पुरेसे क्षेत्र फेरपालट योजनेत ठेवले पाहिजे.
- शेतावरील जनावरांना वैरण व चारा भरपूर देता यावा म्हणून कडवळ व चाऱ्याच्या पिकांची तरतूद केली पाहिजे.
- पिकांची फेरपालट अशा प्रकारे योजावी कि त्यामुळे टन कीटक आणि रोगांचे नियंत्रण करण्यात मदत होईल.
- मजुरांचा पूर्ण उपयोग करून घेता येईल व उत्पदनाच्या खर्चात हि काटकसर करता येईल या पद्धतीने फेरपालटी ची योजना आखावी.

पिंकांच्या फेरपालटीचे फायदे:
- Crop Rotation to Increase Production 2025 जमीतील सेंद्रिय पदार्थ टिकवून ठेवल्यामुळे पिकांच्या उतपादन वाढ होते.
- जमिनीच्या निरनिराळ्या थरांतील अन्नांश वाढणाऱ्या व वेगळ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांचा समावेष केल्यामुळे जमिनीतील अन्नामध्ये चांगल्या प्रकारे संतुलन राखण्यास मदत होते.
- पिकाच्या विविधतेमुळे प्रतिकूल हवामान कीटक व रोग यांमुळे होणारे नुकसान यांच्यापासून जो आर्थिक तोटा होण्याचा धोका असतो तो कमी होतो.
- मजुरांच्या कामाची वाटणी सारखी करण्यास मदत होते.
- फेरपालटीसाठी फिट केल्याने जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.
- तण, कीटक आणि रोगांचे आक्रमण कमी होते व त्यांचे नियंत्रण करता येणे शक्य होते.
- शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जनावरांच्या कडेगाव भागवता येतात.
पिकांची फेरपालट उदाहरणे: Crop Rotation to Increase Production 2025
| बाजरी- | रब्बी ज्वारी – | कापूस |
| बटाटा – | गहू- | भाजीपाला पिके |
| ऊस – | गहू- | हरभरा – मका |
| कांदा – | रब्बी ज्वारी- | कापूस |
| बाजरी – | गहू- | कडवळ |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |