Crop Insurance 2025 यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने यंदा एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा साठी पैसे मोजावे लागणार आहे.

Crop Insurance 2025 तर यंदाच्या खरिपातील पिकांसाठीचे विमा अर्ज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचे आवाहन कृषी विभागाकडून येण्यात करण्यात येत आहे.
धान्यापेक्षा भाजीपाला मध्ये ‘धन’ शेतकऱ्यांचा बदलता कल, वाचा सविस्तर;
Crop Insurance 2025 दरम्यान, पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी महत्त्वाचा असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही. अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी ही लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक योजनेत नाव नोंदवून फार्मर आयडी काढून घ्यावा.

पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंत विविध नैसर्गिक घटकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास एक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते. तर यामध्ये पावसामधील खंड, कीड, रोगांचा प्रादुर्भाव पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पन्न उत्पादन अशा वेगवेगळ्या निकषांचा समावेश आहे.
Crop Insurance 2025 पिक विमा योजनेमध्ये समाविष्ट पिके
भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग, कारळे, कांदा, तीळ आणि तूर.
पीक निहाय आणि जिल्हा निहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता यामध्ये फरक असतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |