‘या’ जिल्ह्यातील पाऊण लाख शेतकऱ्यांना अजूनही पीक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा; Crop Insurance 2025

Crop Insurance 2025 खरीप 2024 मधील पीक काढणी कव्हर अंतर्गत पिक विमा, नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या 75,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी धाराशिव जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

Crop Insurance 2025

Crop Insurance 2025 खरीप 2024 मध्ये जिल्ह्यातील 7 लाख 19 हजार 167 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दरम्यान, याच वर्षात जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर कंपनीने सर्वेक्षण करून 5 लाख 19 हजार 757 अर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत 218 कोटी 8 लाख रुपयांचे वाटप केलेले आहे.

तुर बाजारात नवा ट्रेंड आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर;

तसेच 7 हजार 699 शेतकऱ्यांची पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम 1,000 पेक्षा कमी असल्याने राज्य शासनाकडून सबसिडी आल्यानंतर त्याचेही वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम 1 कोटी 25 लाख इतकी आहे.

WhatsApp Group Join Now

Crop Insurance 2025 दरम्यान, केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकानुसार 100 रुपये नुकसान झाले तरी केवळ 25 रुपयेच नुकसान देण्याची सूत्र निश्चित केले गेले आहे.

यानुसार पीक काढणी कव्हर अंतर्गत जवळपास 45 हजार शेतकऱ्यांना, तर वैयक्तिक पूर्वसूचनेच्या आधारे काढणी कव्हर अंतर्गत 30 हजार अशा एकूण 75 हजार शेतकऱ्यांचे अद्याप जवळपास 12 कोटी रुपये येणे बाकी असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

Crop Insurance 2025 तालुकानिहाय मिळालेले नुकसान भरपाई

भूम17 कोटी 1 लाख
धाराशिव50 कोटी 55 लाख
कळंब36 कोटी 28 लाख
लोहारा17 कोटी
परंडा8 कोटी 56 लाख
तुळजापूर45 कोटी 59 लाख
उमरगा25 कोटी 96 लाख
वाशी17 कोटी 72 लाख

एकूण – 218 कोटी 8 लाख

WhatsApp Group Join Now

पोस्ट हार्वेस्टिंग अर्थात पीककाढणी कव्हर अंतर्गत जिल्ह्यातील 75 हजार शेतकऱ्यांची जवळपास 12 कोटी रुपये रक्कम मिळणे बाकी आहे. पिक विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार 516 कोटी पैकी कोटींपैकी राज्य शासनाकडून अद्याप 213 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे सदरील रकमेचे शेतकऱ्यांना वाटप झाले नाही. राज्य शासनाने दुसरा हप्ता कंपनीला दिल्याचे समजते. त्यामुळे कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देऊन पेरणीसाठी आर्थिक दिलासा द्यावा. -अनिल जगताप, सामाजिक कार्यकर्ते”

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment