Cotton Market Update 2025 भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामात विकत घेतलेल्या 100 लाख गाठींपैकी 35 लाख गाठींची विक्री पूर्ण केली असून, उर्वरित 65 लाख गाठींचे लिलाव सुरू आहे.

देशातील कापसाचे दर आम्ही भावापेक्षा खाली असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा जास्त असल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस बाजारातील पुढील हालचालींवर साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
फलटण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण, कांदा उत्पादकांना बसतोय आर्थिक फटका!
भारतीय कापूस महामंडळाने चालू हंगामात हमीभावाने विकत घेतलेल्या 100 लाख गाठींपैकी आतापर्यंत 35 लाख गाठी कापसाची विक्री केली आहे.

उर्वरित 65 लाख गाठी कापूस शिल्लक असून त्याचे लिलाव सुरूच आहेत. अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
31 टक्के कापूस सीसीआयच्या खरेदी खाली!
या हंगामात देशात तीनशे एक लाख गाठी उत्पादनाचा अंदाज होता. त्यापैकी सुमारे 33 टक्के कापूस एकट्या सीसीआयने हमीभावाने खरेदी केला. हे प्रमाण खरेदी धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
Cotton Market Update 2025 राजनिहाय खरेदीचे चित्र!
राज्य | खरेदी केलेल्या गाठी |
तेलंगणा | 40 लाख |
महाराष्ट्र | 29 लाख |
गुजरात | 14 लाख |
तेलंगणामध्ये तुलनेने भाव कमी असल्यामुळे सीसीआयची सर्वाधिक खरेदी या ठिकाणी झाली.
महाराष्ट्रात विकल्या 16 लाख गाठी
महाराष्ट्रात खरेदी झालेल्या 29 ला गाठींपैकी 16 ला गाठी सी सी आय ने विकल्या असून उर्वरित साठा लिलाव प्रक्रियेत आहे.
Cotton Market Update 2025 नुकत्याच पार पडलेल्या लिलावामध्ये कापसाचे दर काय?
सामान्य कापूस (खंडीमागे) | 53,500 ते 54,500 रुपये |
कस्तुरी गाठी | 55,300 च्या दरम्यान |
दरात घट उद्योजकांच्या नजरा सीसीआय वर….
‘सीसीआय’ने सध्या कापूस विक्रीचे दरखंडी मागे सुमारे 500 रुपये कमी केले आहेत. सध्या देशातील कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात दरांपेक्षा हे दर अधिक असल्याचे निरीक्षण आहे.
Cotton Market Update 2025 कापूस दरातील गट पुढे किती प्रमाणात होणार? आणि सीसीआय याबाबत पुढील निर्णय कधी घेणार? याकडे उद्योजक व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |