कापूस पिक व्यवस्थापन भरघोस उत्पादनासाठी योग्य नियोजन!! Cotton Crop 2025

Cotton Crop 2025 कापूस या पिकास पांढरे सोने असे संबोधले जाते. विदर्भ, मराठवाडा व खानदेश या भागात कापूस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

Cotton Crop 2025

Cotton Crop 2025 कापसा मध्ये मुख्यत्वे रस शोषणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी व पिठ्या ढेकूण), बोंडे पोखरणाऱ्या अळ्या (अमेरिकन बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी व शेंदरी बोंड अळी ), लाल्या रोग, मररोग, बुरशीजन्य करपा, जिवाणूजन्य करपा, मूळकूज व भूरी या प्रमुख समस्या उद्भवतात. कपाशीची उगवण झाल्या नंतर 8-10 दिवसानंतर एकरी ह्युमिफोर किंवा 1 लीटर रुटशाईन 1 किलो दिल्यास चांगला परिणाम मिळतो.

वांगी पीक नियोजन!!

Cotton Crop 2025 रसशोषक किडीं पासून कपाशीचे रक्षण करण्यासाठी पेरणी नंतर 21-30 दिवसा नंतर खालील फवारणी घ्यावी.

पाणी 100 लीटर + सुदामा 60 मिली + हंस 200 मिली किंवा सुपर हंस 100 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 150 ग्रॅम + सी.बी.झेड. -50 100 ग्रॅम किंवा

WhatsApp Group Join Now

पाणी 100 लीटर + स्लोगन 40 ग्रॅम + हंस 200 मिली किंवा सुपर हंस 100 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 150 ग्रॅम + सी.बी.झेड- 50 100 ग्रॅम.

वरील फवारणी मुळे रसशोषक किडींचा बंदोबस्त होतो. पिकास सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात. हंसमुळे कपाशीस फुटवे निघाल्या मुळे रोपांचा आकार डेरेदार होतो . सी.बी.झेड – 50 मुळे बुरशी जन्य करपा आटोक्यात येतो.

कपाशीच्या वाढीच्या काळामध्ये व पाते निघण्याच्या काळामध्ये खालील फवारणी घ्यावी.

  1. Cotton Crop 2025 पाणी 100 लीटर + बोरो-क्विक 100 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट 300 ग्रॅम + स्ट्रॉबेरी /स्प्रेवेल 100 ग्रॅम + समरूप 19:19:19 300 ग्रॅम + एस.आर.पी. 200 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यावी. म्हणजे पाते गळ किंवा बोंडे गळणे समस्या थांबते व कपाशीच्या बोंडाचा विकास चांगला होतो.
  2. ज्या जातीं मध्ये बोंडाची संख्या कमी मिळते. अशा जातींची उत्पादकता वाढवण्या साठी सुपरस्टार-9 2 मिली / लीटर या प्रमाणात पाते निघण्या अगोदर 15 दिवस फवारणी घेतल्यास चांगले परिणाम मिळतात.
  3. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल या मुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कपाशीवर होऊ शकतो.
  4. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खालील फवारणी 2-3 वेळा पिकाच्या बोंडे धरल्या नंतरच्या कालावधी मध्ये घेतल्यास लाल्या रोगाची समस्या बऱ्याच अंशी कमी करता येते.
  5. पाणी 100 लीटर यूरिया 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 400 ग्रॅम – एसआरपी 200 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम.
  6. ठिबक सिंचनाद्वारे कपाशी सदर 15 दिवसांच्या अंतराने विद्राव्य खतां सोबत 1-1.5 किलो एसआरपी -9 व 2 किलो मॅक्सवेल-एस चा वापर केल्यास कपाशीची गुणवत्ता चांगली मिळते व उत्पादनात वाढ होते.


इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment