Cotton Crop 2025 जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचा असणारा पांढरे सोने म्हणजे कापूस महाराष्ट्र मध्ये उसापाठोपाठ कापूस हे दुसरं महत्त्वाचं अगदी पीक आहे.

Cotton Crop 2025 या पिकाच्या लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंत जवळपास 60 दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. कापसाच्या सरकीमध्ये 16 ते 20 टक्के तेल असते. याचा उपयोग खाद्यतेल म्हणूनही केला जातो. त्याचप्रमाणे तंतुमय रचना असलेल्या कापसाच्या पळाटयांचा उपयोग पार्टिकल बोर्ड, कागद, हार्ड बोर्ड, कागदी डबे, तयार करण्यासाठी केला जातो.
आता शेतजमिनीचे जुने दस्त डिजिटल स्वाक्षरीसहित मिळणार ऑनलाईन;
महाराष्ट्रात देशातील कापसाच्या क्षेत्रापैकी 36 टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. कापसाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा तर उत्पादकतेत नववा क्रमांक लागतो. कारण राज्यात 85 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर कोरडवाहू कापसाची लागवड केली जाते.

जमिनीच्या प्रतवारीनुसार योग्य वाणांची निवड केली जात नाही, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांकडे सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव असतो. यामुळे उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. इतकेच नव्हे तर या पिकावर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो व त्याचे व्यवस्थापन न झाल्यास उत्पादनात घट होते.
आजच्या दिवसाची गरज म्हणून वापरात येणारी अवास्तव रासायनिक खते, बुरशीनाशके, इत्यादींचे उपयोगामुळे उपयुक्त सूक्ष्म जंतूंवर होणारे हानिकारक परिणाम रोगाच्या निर्मिती होणाऱ्या उपजाती त्यांचे प्रकार आणि निसर्गात हळूहळू होत असलेला समतोलपणा याकरिता पिकांवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक्य आहे.
Cotton Crop 2025 कपाशी पिकांवर येणारे महत्त्वाचे रोग:
दहिया रोग:
हा रोग रॅमुल्यूरिया गॉसिपाय या रोगाची लागण सप्टेंबर महिन्यात किंवा त्यानंतरचे कमी तापमान ढगाळ वातावरण या दरम्यान येणारा पाऊस अशा अनुकूल परिस्थितीत तीव्र गतीने इतका वाढतो की बरेचदा नियंत्रणात वेळही मिळू देत नाही. सुरुवातीस पानाचे खालचे बाजूने आकारविहिरीत पांढऱ्या रंगाचे दही शिंपडण्यासारखे ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने वाळतात व गळून पडतात. रोपवाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते फांद्या, फुले व बोन्डे गळतात.
व्यवस्थापन:
रोगकारक जमिनीत पडणाऱ्या रोगग्रस्त अवशेषांवर वास्तव्य करीत असल्यामुळे खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी.
रोगाची लक्षणे दिसतात पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा कार्बेनडिझम 10 ग्रॅम व 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. पिकांची फेरपालट करावी.
Cotton Crop 2025 लाल्या:
रात्रीचे तापमान अचानकपणे ऑक्टोबर आणि त्यानंतरच्या महिन्यांमध्ये कमी झाल्यास जमीन जास्त काळ पानाथळ राहिल्यास पाण्याची कमतरता असल्यास आणि महत्त्वाचे म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता तसेच पानांमध्ये नत्राचे प्रमाण कमी असल्यास लाल्या हा रोग होतो. यामध्ये अँथोसायनिन हे रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार करून पानांमध्ये साठून राहते. त्यामुळे पाने हिरवी न दिसता लालसर रंगाचे दिसतात. नत्राच्या कमतरतेमुळे पानांचा हिरवा रंग जाऊन पाने लाल होतात. कालांतराने लाल झालेली पाने गळून पडतात.
व्यवस्थापन:
पिकाच्या बॉन्डवाढीच्या आणि बोडधारणेच्या कालावधीमध्ये नत्राचा योग्य पुरवठा केल्यास लाल्या टाळता येऊ शकतो. त्याच बरोबर 25% मॅग्नेशियम सल्फेट किंवा 1% युरिया अथवा डायमोनियम सल्फेट 2% या प्रमाणात फवारणी करावी.

Cotton Crop 2025 पॅराविल्ट:
हा रोग बहुदा कपाशीच्या संकरित वाणांवर येतो पॅराविल्ट हा कोणत्याही बुरशी, जिवाणू किंवा सूत्रकृमीपासून होत नाही तर केवळ वनस्पतीच्या शस्त्रक्रियेमध्ये झालेल्या बिघाडांमुळे होऊ शकतो. कपाशीची वाढ होण्यासाठी दिवसांचे तापमान 28 ते 35 डिग्री सेल्सिअस लागते.
परंतु त्यापेक्षा अधिक तापमान दीर्घकाळ टिकून राहण्यास कपाशीच्या शास्त्रक्रियांवर अनिष्ट परिणाम होतो. अश्या वेळेस पिकास पाण्याचा अतिरिक्त ताण बसल्यास रोपाच्या अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात व नलिका अर्धवट किंवा पूर्णपणे बंद होते.
झाडाच्या पाने, फुले, बोंडे , इत्यादी भागांना अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्याने पानांची चमक नाहीशी होऊन पाने मलूल होतात. पानातील ताठरपणा कमी होतो. झाडे मंद गतीने सुकतात पाने, फुले, बॊडांची गळ होते अपक्व बोंडे उमलल्यामुळे धागा अपरिपक्व राहतो व उत्पन्नात घट येते.
व्यवस्थापन:
कपाशीची लागवड तापमान कमी झाल्यावरच म्हणजे 25 मे नंतर करावी हा रोग प्राथमिक अवस्थेत असेल तर कोबाल्ट क्लोराइडची 10 ग्रॅम लिटर पाणी अशी फवारणी पिकापूर्वी किंवा नंतर करावी.
रोगग्रस्त झाडास 2 टक्के तसेच युरिया 1 टक्के चा फवारा करावा. तसेच रोगग्रस्त झाडांजवळ 500 ते 1000 मिलि डायमोनियम फॉस्फेट 2 टक्के चे पाण्याची आवळणी करावी.
Cotton Crop 2025 अणुजिवी करपा रोग:
हा रोग झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडीस पॅथेव्होर मालवाशियारम या अनुजीवीमुळे होतो. हा रोग बियाण्याद्वारे व शेतातील रोगग्रस्त विशेषांमुळे होऊ शकतो. सुरुवातीस पानाचे खालचे बाजूस तेलीय कोणात्मक ठिपके दिसतात. रोगाचे तीव्रतेनुसार पाण्याच्या मुख्य व उपशिरा काळ्या पडतात.
देठावर व फांद्यांवर काळपट रंगाचे ठिपके दिसतात. बोंडावर सुद्धा तेलकट ठिपके पडून बोंडांतील कापूस पिवळा पडून त्यांची प्रत खराब होते. रोगाची तीव्रता वाढल्यास झाडाची पाने, फांद्या व अपरिपक्व बोंडे गळून पडतात.
व्यवस्थापन:
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून तापू द्यावी. कार्बोक्झिन 1 ग्रॅम अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किंवा स्टेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी पिकांची फेरपालट करावी.

मूळकूज/ खोडकूज:
Cotton Crop 2025 हा रोग रायझोकटोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त बियाणे शेतातील रोगग्रस्त अवशेष या रोगास कारणीभूत ठरतात. यामुळे रोपटे एकाकी वाढते व ते सहज उमटले जाते. झाडाची मूळ कुजून त्याची साल निघते, मुळे तंतुमय होतात. मुळाचा खालचा भाग प्रथम पिवळसर नंतर काळपट पडतो. झाडाची मुळे ओलसर व चिकट होतात. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळपट होतो व त्याचे साल निघते झाडे मरून जातात.
व्यवस्थापन:
जंतू बिहारीत बियाण्यांचा वापर पेरणी करता करावा.
मुंग उडीद या पिकांसारखे मिश्र पीक घ्यावे.
रोगाचे प्रमाण जास्त असल्यास झाडावर व लगतच्या जमिनीत 10 ग्रॅम कार्बेनडिझम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन द्रावण जमिनीत मुळांपर्यंत जाईल असे टाकावे.
अशाप्रकारे सर्व रोगांचे व्यवस्थापन केल्यास शेती व औद्योगिक क्षेत्रावर परिणाम करण्याऱ्या या पांढऱ्या सोन्याचे उत्पादन वाढवण्यास नक्कीच मदत होईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |