Control Seed Treatment Diseases 2025 पिकांना विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्मजंतू, धातुकलस, सूत्रकृमी, इत्यादी. तसेच अन्न घटकाच्या व वातावरणातील बदलामुळे बरेचसे रोग होऊन उत्पादनात घट येते पिकांवरील रोगाकरिता ही सजीव व निर्जीव कारणे आहेत. रोगांचा प्रसार मुख्यता जमिनीद्वारे, बियाणाद्वारे, हवेद्वारे, तसेच कीटकांद्वारे होतो.

Control Seed Treatment Diseases 2025 पिकांना रोगांची लागण झाल्यानंतर निर्मूलन करणे फार अवघड असते. म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. बीज प्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाणाची उगवण बरोबर होत नाही. किंवा झाले तर शेतामध्ये रोकट झाडांची संख्या भरपूर आढळते म्हणून बीजे प्रक्रिया ही रोग नियंत्रणासाठी साधी सोपी व कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे.
केळीवरील मर रोग, एक भविष्यकालीन आपत्ती!!
बीजजन्य रोगामुळे पिकाच्या उत्पादनात होणारे घट
बीजजन्य रोगामुळे प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, भात, गहू, हरभरा आणि कापूस या पिकांच्या उत्पादनात मोठे 10 ते 90 टक्के घट येते. यासाठी बियाणास पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. बीजोत्पादनातच नव्हे तर कृषी उत्पादनामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक आहे. तृणधान्यांमध्ये कडधान्य, गळीतधान्य, पिकांना जमिनीतून व बियांपासून होणाऱ्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे.

Control Seed Treatment Diseases 2025 बियाणास बीज प्रक्रिया न करताच पेरणी केल्यास बियाणाची उगवण होते परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणे नंतर बियाणावरील पाणी जमिनीतील वेगवेगळ्या बुरशीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणारी संख्या कमी होते. किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवण्यास प्रत्येक पिकात प्रति हेक्टरी निर्धारित केलेली रोपांची संख्या राखणे आवश्यक असते. यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही एक महत्त्वाची बाब आहे.
Control Seed Treatment Diseases 2025 बीज प्रक्रिया म्हणजे काय?
बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाणातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाणांची शेतातील उगवण वाढवण्यासाठी तसेच जोमदार रोपे येण्यासाठी बियाणांवर वेगवेगळी जैविक वर रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते याला बीजप्रकिया म्हणतात.

Control Seed Treatment Diseases 2025 बीजप्रक्रियेचे फायदे
जमिनीतून व बियाणापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
बियाणांची शेतात उगवण्याची क्षमता वाढते.
रोपांची निरोगी व जोरदार वाढ होते.
रोबोट झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व हेक्टरी निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
रोग व कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते.
बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.
नत्र व स्फुरद यांची उपलब्धता वाढते.
जमिनीचा पोत सुधारतो.
Control Seed Treatment Diseases 2025 जिवाणूसंवर्धनाचे बीजप्रक्रिया:
250 ग्रॅम जिवाणू संवर्धनाचे पाकीट 10 ते 15 किलो बियाणास वापरावे.
एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावे.
द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन टाकून बियाणास हळुवारपणे लावावे, जिवाणू संवर्धकाचा लेप बियाणावर सम प्रमाणात बसेल व बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी किंवा बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाणास लावावे.
नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे.
अशी बीज प्रक्रिया केलेल्या बियाणाची पेरणी ताबडतोब करावी.
पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.
बियाणांची उगवण क्षमता वाढते बियाणं द्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात रोपांना अन्नद्रव्य पुरवठा होतो त्यामुळे रोपे जोमदार व निरोगी वाढतात.
जिवाणू संवर्धने/बुरशीनाशके | पीक | बीज प्रक्रियेची मात्रा (प्रति किलो बियाणे) |
ऍझोटोबॅक्टर | कापूस, वारी, गहू, भात, इ. तृणधान्य सूर्यफूल, तीळ, कारळे इ. गळीतधान्य पिके | 25 ग्रॅम किलो/बियाणे |
रायझोबियम | सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, इ. डाळवर्गीय व गळीतधान्य पिके | 25 ग्रॅम किलो/बियाणे |
स्फुरद विरघळणारे जिवाणू | सर्व पिकांकरिता | 20 ग्रॅम किलो/बियाणे |
ट्रायकोडर्मा (जैविक बुरशीनाशके) | सर्व पिकांकरिता | 6 ग्रॅम किलो/बियाणे |
जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची दक्षता
जिवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करण्यात यावी.
रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहास करावे.
ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जिवाणू संवर्धकाचे बीजप्रक्रिया करता येते.
रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे
बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवावे : Control Seed Treatment Diseases 2025 प्रथमता 100 किलो बियाणे एक लिटर पाणी या प्रमाणात भांड्यात 1 मिनिटभर घोळावे. नंतर बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे पाच मिनिटापर्यंत लाकडी दांडा अथवा उलथने वापरून चांगले घोळावे. बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाचे झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात वाढ करावी जेणेकरून बुरशीनाशक बियाणा सारख्या प्रमाणात सहजतेने चिटकेल त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावेत.
बियाणास बुरशीनाशकाची भुकटी पावडर चोळणे : बियाणे प्रक्रिया शिफारसी मध्ये दिलेल्या शिफारसीनुसार 1 किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे, त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरावेत.
बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया करावी (ही प्रक्रिया मशीन किंवा यंत्राद्वारे करावी) : Control Seed Treatment Diseases 2025 प्रथमतः 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये घ्यावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावे, बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडेफार वाढ करावी. जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिटकेल त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवावे.
बियाण्यास बुरशीनाशकाचे भुटकी पावडर चोळणे.
भुईमूग, सोयाबीन पातळ साल सणाठा बियाण्यास बीज प्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशक असे द्रावण करावे व बियाण्याचे टरफल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा धातूचे भांडे अथवा प्लास्टिक पिशवीचा वापर करावा, या भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये.
बीज प्रक्रियेनंतर भांड्याचे झाकण किंवा प्लास्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडू नये.
बीज प्रक्रिया नंतर शिल्लक राहिलेले बियाणे मनुष्याच्या किंवा जनावराच्या खाद्यासाठी वापरू नये.
बीजेपी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत व तोंडावर मास्क लावावा.
बीजप्रक्रिया करताना तंबाखु खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |