Control of Pests on Soybeans 2025 सोयाबीन हे जगातील प्रमुख तेलबिया व कडधान्य पीक आहे अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना व भारत हे सोयाबीन पिकवणारे प्रमुख देश आहेत. 1980 च्या दशकात काही हजर हेक्टर क्षेत्रावर असणाऱ्या या पिकाची आज संपूर्ण जगात 113.10 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जात आहे. जगातील सोयाबीनच्या एकूण क्षेत्रापैकी जवळ जवळ 12 टक्के क्षेत्र भारतात आहे.

Control of Pests on Soybeans 2025 सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी भारतातील सरासरी उत्पादकता 10 ते 12 क्विंटल प्रती हेक्टर आहे. शिफारस लागवड तंत्राचा कमी प्रमाणात वापर सोयाबीनची जिरायती लागवड, पावसाची अनिश्चितता आणि महत्त्वाचे रोग व किडीस प्रतिकारक्षम वानांची अनुउपलब्धता अशा विविध कारणांमुळे सोयाबीनचे उत्पादकता कमी आहे.
जनावरांमधील विषबाधा!! Poisoning in Animals 2025
या पिकावर जवळजवळ 300 किडींची नोंद झालेली आहे सन 2008 मध्ये महाराष्ट्रात तंबाखू वरील पाने खाणारी अळी तसेच उंट अळ्यांचा उद्रेक होऊन जवळपास 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. म्हणून असे नुकसान टाळण्यासाठी जागरूक राहून शिफारसी लागवड तंत्रज्ञानासोबत किडींची ओळख करून घेऊन त्यांचा प्रभावीपणे बंदोबस्त केल्यास सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होण्यास निश्चित मदत होईल.

तंबाखूवरील पाने खाणारी अळी(स्पोडोप्टेरा):
Control of Pests on Soybeans 2025 किडीची मादी पानावर एकाच जागी समूहाने अंडी देते अंडीपुंजावर तंतुमय लव अच्छादलेले असते. लहान अळ्यांसुद्धा समूहाने राहतात. अळीच्या शरीरावर 2 फिकट पट्टे व त्यावर काळे त्रिकोणी ठिपके असतात. अळ्या लहान अवस्थेत पानातील हरितद्रव्य खातात व जाळी झालेली पाणी मागे सोडतात. मोठी अळी स्वतंत्रपणे पाणी कोवळे शेंडे व फुले खातात प्रादुर्भाव जास्त झाल्यास आळ्या कोवळ्या शेंगाही खातात या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास 33 दिवस लागतात.
Control of Pests on Soybeans 2025 उंट अळी:
हिरव्या रंगाच्या असून चालताना पाठीत बाक काढून चालतात सुरुवातीला पानाचा खालचा हिरवा भाग खरडून काढतात. त्यामुळे त्यावर पांढरे वेडेवाकडे डाग दिसतात पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने खाऊन फक्त पानाच्या शिरा मागे राखतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास अळ्या फळधारणा होणारा भाग फुले व शेंगा खातात. या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास 28 ते 32 दिवस लागतात.
केसाळ अळी:
अळ्या पुंजक्याने झाडावर राहून पाण्यातील हरितद्रव्य खातात. लहान आळ्या फिकट पिवळा असून पूर्ण वाढ झालेल्या आळ्या भुरकट रंगाच्या असतात. अळीच्या अंगावर दात केस असतात. त्यांचा जीवनक्रम 5 ते 10 आठवड्यांचा असून वर्षभरात 3 ते 5 पिढ्या तयार होतात. जुलै ते ऑक्टोबर या काळात किडीची तीव्रता जास्त असते.

Control of Pests on Soybeans 2025 पाने गुंडाळणारी अळी:
लहान हिरवट रंगाचे असून डोके काळे असते पतंग गर्द भुरकट रंगाचा असून पुढील पंखाच्या बाहेरील बाजूस पांढरा लांबट खुणा असतात. अळ्या सुरुवातीला पाने पोखरून उपजीविका करतात. नंतर आजूबाजूची पाने जोडून पानाच्या सुरळीत राहून जगतात. प्रादुर्भाव झाल्यास पाणी भुरकट तांबडी होऊन गोळा होतात व शेवटी वाळतात. झाडांची वाढ खुंटते व शेंगा भरत नाहीत ही कीड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर या काळात सक्रिय असते. जास्त नुकसान सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिसून येते.
Control of Pests on Soybeans 2025 खोडमाशी:
प्रौढ माशा चकचकीत काळा रंगाच्या असतात. अशा अळ्या पांढऱ्या रंगाच्या असून त्या खोडात लपून बसतात मादी माशी देठावर व पानावर अंडी घालते अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पाने पोखरून डेठापर्यंत पोहोचतात. आळ्या फांद्या व खोडाच्या आतील भाग खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्य मिळत नाहीत. परिणामी झाडांची वाढ खुंटते व झाड वाळू लागते खोडामुळे बहुदा छिद्र दिसते.

Control of Pests on Soybeans 2025 चक्री भुंगे:
गर्द भुरकट, काळे पंख असणारे प्रौढ भुंगे पिक वाढीच्या सुरुवातीस देठ फांद्या किंवा मुख्य खोडावर समांतर खापा करून अंडी घालतात. अळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्यांच्या धडाच्या खाली उभरट ग्रंथी असतात. खापा केल्यामुळे अन्नपुरवठा थांबतो व खापाच्या वरील भाग वाळून जातो शेवटी अळ्या पानाचे देठ फांदी खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचतात, व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास 40 ते 50 दिवस लागतात. पुढील हंगामापर्यंत ही कीड सुप्तावस्थेत राहते याशिवाय रस शोषणाऱ्या किडी जसे पांढरी माशी फुल किडे तुडतुडे इ. किडींचा या पिकावर प्रादुर्भाव होतो.
किडींचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन:
Control of Pests on Soybeans 2025 पेरणीसाठी बियाणांचे प्रमाण शिफारसी प्रमाणे ठेवावे व पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
मुख्य पिका भोवती सापळा पीक म्हणून एरंडी आणि सूर्यफूल या पिकांची ओळ लावावी आणि त्यावर तंबाखू वरील पाने खाणारी अळी व केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अंडी व अळ्यांसहित नष्ट करावीत.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे बांधांवर असणाऱ्या किडींच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.
नत्रय कुठे खताचा समतोल वापर करावा नक्षत्रयुक्त खताचे प्रमाण जास्त झाल्यास तर असं शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
आंतरमशागत निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
हेक्टरी वीस ते पंचवीस पक्षी थांबे उभारावेत.
सोयाबीन वर वृद्धी संप्रेरकांचा वापर टाळावा.
तंबाखू वरील पाने खाणारी अळी नियंत्रित करण्यासाठी हेक्टरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावेत. हिरवी घाटे अळी नियंत्रित करण्यासाठी हेक्टरी 5 ते द10 हा कामगंध सापळे लावावेत. तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
तंबाखू वरील पाने खाणारी अळी व केसाळ अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य प्रमाणात दिसून येतात अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडींसह नष्ट करावी.
चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाणी फांद्या वाळतात त्यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच कीटकनाशकांची फवारणी करावी.
जिथे चक्रीभंगा व खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर जमीन पुरेशी ओल असताना टाकावे.

पाने खाणाऱ्या अळी चक्रीभुंगा यांच्या प्रादुर्भाव होऊ नये तसेच खोडमाशीने अंडी घालू नये म्हणून सुरुवातीला 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
तंबाखू वरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस एल एन पी व्ही 500 एल विषाणू 2 मिलि प्रति लिटर पाणी किंवा नेमोरिया रिलाई या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून अळीचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
पिकाची फेरपालट करावे सोयाबीन नंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |