CNG Gas 2025 अकोला : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 7 एप्रिल रोजी पार पडली असून विविध 95 उद्योग व्यवसायांसोबत जिल्ह्यात 1 हजार 238 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामजस्य करार करण्यात आले.

त्यामध्ये 120 कोटी गुंतवणूक सीएनजी गॅस उत्पादनामध्ये करण्यात येणार असून, या उद्योगात शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर करण्यात येणार असल्याने, या उत्पादनाचा जिल्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
सरकारकडून सौर कृषी पंप योजनेत मोठी सुधारणा; या शेतकऱ्यांना होणार फायदा!
CNG Gas 2025 यंदाच्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 1 हजार 238 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. रिलायन्स इंडिया लिमिटेड घटकांकडून 120 कोटी रुपयांची गुंतवणूक सी एनजी गॅस उत्पादनामध्ये करण्यात येणार आहे.

अकोला शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर चांदूर परिसरात सीएनजी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या उद्योगाची निर्मिती करण्यात येणार असून, त्याद्वारे जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील सीएनजी वाहनांसाठी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उद्योगात शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर होणार असून, त्याचा मोबदला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच या उद्योगामुळे रोजगार निर्मितीही वाढणार आहे.
CNG Gas 2025 तरुणांना मिळणार रोजगार
120 कोटी रुपयांच्या गुंतवणूक किती गुंतवणुकीतून सीएनजी गॅस निर्मितीच्या या उद्योगात जिल्ह्यातील 300 बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या वाढीसाठी मदत होणार आहे.
“ गुंतवणूक परिषदेतील सामंजस्य करारापैकी 120 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीएनजी गॅस उद्योग पर्यावरण पूरक आहे. या उद्योगासाठी शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर होणार असून, त्यापोटी शेतकऱ्यांना मोबदला मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. – अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |