Cinnamon and Nutmeg 2025 दालचिनी हे भारतातील महत्वाचे पीक आहे. या झाडाची साल दालचिनी तमालपत्र म्हणून मसाल्यात वापरली जाते. दालचिनीच्या सालातील व पानातील अर्क काढून त्याचा मसाल्यासाठी तसेच औषधे, अत्तर, व्हॅनिला इ. मध्ये केला जातो.

हवामान: Cinnamon and Nutmeg 2025
दालचिनी हे उष्ण कटिबंधातील झाड आहे. उष्ण व दमट हवामानामुळे झाडाची वाढ व सालीची प्रत चांगली राहते. या झाडास दिवसाचे सरासरी तापमान 27 अंश सेल्सियस असणे आवश्यक असते तसेच 2000 ते 2500 मि.मी. पाऊस आवश्यक असतो.
कारखान्यांच्या वजनकाटा तपासणीचा विषय साखर आयुक्तांनी घेतला गांभीर्याने; काय घेणार ऍक्शन?
जमीन: Cinnamon and Nutmeg 2025
इतर मसाला पिकांपेक्षा हे पीक कणखर असल्यामुळे बहुतेक सर्व जमिनीत चांगले येते. परंतु या पिकाला गाळाची अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन अधिक मानवते.

लागवड: Cinnamon and Nutmeg 2025
दालचिनीची लागवड अति पावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात गुटी कलमाद्वारे करावी नारळाच्या बागेत लागवड करावयाची असल्यास नारळाच्या झाडापासून दोन मीटर अंतर सोडून किंवा सलग लागवड करावयाची झाल्यास दोन ओळीत आणि दोन झाडात सव्वा मीटर अंतर ठेऊन 60*60*60 सेमी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे चांगली माती + 2 घमेली शेणखत 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत.
जाती: लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री, या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. कोकण तेज हि जात पानांतील तसेच सालीतील तेल काढण्यासाठी चांगली आहे. तेलाचे प्रमाण 3.2% आहे.
खते: Cinnamon and Nutmeg 2025
10 वर्षांपासून प्रति झाडास 20 किलो शेणखत 400 ग्रॅम युरिया, 1250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 350 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हि खते चरीतून द्यावी. लहान झाडांना वयोमानानुसार कमी प्रमाणात वरील खतांची मात्रा द्यावी.
पीक संरक्षण:
लीफ मायनर या किडीपासून दालचिनीस उपद्रव होतो त्यासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली रोगर मिसळून फवारणी करावी. तसेच टिक्का नावाच्या बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होतो. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. काढणी व उत्पन्न दालचिनीचे गुटी कलमाचे झाड तीन वर्ष वयाचे झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी. साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. साल काढण्यापूर्वी चाकूच्या साहाय्याने 2 सेमी चौकोनी काप घेऊन साल काढावी दालचिनीच्या एका झाडापासून सुमारे 150 ते 200 ग्रॅम दालचिनी व 2 ते 2.5 किलो तमालपत्र मिळते.
जायफळ: Cinnamon and Nutmeg 2025
जायफळाच्या झाडापासून जायफळ बी व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात. जायफळाच्या फळाच्या टरफलाचा उपयोग गोड कँडी टरफल पावडर, लोणचे, चटणी इ मध्ये करतात.
लागवड: Cinnamon and Nutmeg 2025
जायफळ लागवड 50 % सावली राहील अशी करावी. नारळ सुपारीच्या बागांमध्ये 6*6 किंवा 7.5*7.5 अंतरावर 90*90*90 आकाराचे खड्डे खणून त्यात वरच्या थरात सुपीक माती आणि दोन घमेले शेणखत, एक किलो निमकेक एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट भरावे जुन महिन्याच्या सुरुवातीला एक वर्ष वयाचे कलम खड्याच्या मधोमध लावावे.

खते: Cinnamon and Nutmeg 2025
दहा वर्षपासून प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत, 1 किलो युरिया, 650 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व एक किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
किडी आणि रोग:
Cinnamon and Nutmeg 2025 फळे कुजणे हा रोग आढळून येतो त्यासाठी 1 % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
काढणी व उत्पन्न:
कलमाची लागवड केल्यापासून चार वर्षात फळांचे उत्पन्न सुरु होते. रोपांपासून लागवड केल्यास सुमारे 50 % नर झाडे मिळतात आणि मादी झडपासून फळांचे उत्पन्न 7 ते 8 वर्षानंतर मिळते. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्वाधिक फळे मिळतात.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |