Chilli and Okra Disease 2025 शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याचा खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह ही खनिज द्रव्य विपुल प्रमाणात असतात व शरीराची योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्यांची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्वावर भाजपाला लागवडीकडे वळला आहे.

Chilli and Okra Disease 2025 भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती योग्य सेंद्रिय व रासायनिक खते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही, त्याचबरोबर या पिकांवर पडणाऱ्या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक्य आहे. भाजीपाला लावताना प्रमुख भाजीपाल्याची पिके म्हणून मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, कांदा, वेलवर्गीय पालेभाज्या फळभाज्या आणि गवारी याकडे मुख्यत्वे करून लक्ष द्यावे लागेल.
अझोला उत्पादन आणि त्याचा अर्थशास्त्र!!
भाजीपाल्याची रोपे लागवडी पूर्वी तयार करावी लागतात आणि तेव्हा रोपे कोलमडणे या रोगाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत हमखास जाणवतो यामुळे भाजीपाल्याचे पीक उत्तम येण्यासाठी बियाणे रोपवाटिका यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Chilli and Okra Disease 2025 निरोगी बियाणांची निवड
भाजीपाला पिकात बुरशीजन्य, जिवाणूजन्य आणि काही थोड्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार बियाणामार्फत होत असतो. रोगविहरहित बियाणे ओळखणे किंवा निवडणे कठीण आहे. म्हणून प्रमाणित केलेले बियाणे वापरावे किंवा भाजीपाला पिकातील बियाणे धरताना सुरुवातीच्या काढणीतील रोगमुक्त झाडांचे फळांचे बी धरावे या शेतात रोगाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणचे बी शक्यतो निवडावे.
Chilli and Okra Disease 2025 रोपवाटिका
भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाफेमध्ये चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत 2 पाट्या व 40 ते 50 ग्रॅम ब्ल्यूकॉपर चांगले मातीत मिसळावे त्यानंतर औषधे लावलेले बी ओळी मध्ये पातळ पेरावे प्रत्येक 2 * 1 मीटर च्या वाफ्यात 25 ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध बियाण्याच्या दोन ओळींमध्ये घालावे. मात्र फोरेट औषधाचा आणि बियांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
Chilli and Okra Disease 2025 मिरची
या पिकावर फळे कुजणे व फांद्या वाळणे, भुरी, विषाणूजन्य चुरडा, मुरडा, मर इ. रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो.
फांद्या वाळणे व फळे कुजणे:
या रोगाची सुरुवात झाडांच्या शेंड्यांपासून होते प्रथम कोवळे शेंडे मरतात रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडे सुकून वाळतात. त्याचप्रमाणे या रोगामुळे पानांवर व फांद्यांवर काळे चट्टे पडतात. त्यानंतर पक्व हिरव्या तसेच लाल मिरच्यांवर सुद्धा होतो त्यामुळे मिरचीवर लांबट गोलाकार काळे डाग पडतात. रोगाची तीव्रता जास्त झाली की संपूर्ण मिरची काळी पडते व कुजते.

भुरी:
या रोगामुळे पानाच्या वरील व खालील बाजूस पिठाप्रमाणे पांढरी बुरशी दिसते या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फळांवर तसेच फांद्यांवर सुद्धा पांढरी बुरशी दिसते. त्यामुळे सर्व पीक पांढरट पावडरचा फवारा केल्यासारखे दिसते त्यामुळे पाने फुले गळून पडतात आणि झाडे निस्तेज दिसतात.
उपाय:
पेरणीपूर्वी बियाणास थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
वाफ्यामध्ये बी पेरतेवेळी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 25 ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध प्रति वाफ्यास द्यावे.
रोपे तयार झाल्यानंतर ती 25 ग्रॅम डायथेन एम-45, 30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. वया द्रावणात रोपे साधारण पाच मिनिटे बुडवून नंतर लागण करावी.
लागवडीनंतर 10 दिवसांनी फोरेट हे औषध प्रती हेक्टरी 10 किलो याप्रमाणे चंद्रकार कोरी घेऊन प्रत्येक झाडास चिमूटभर द्यावे.
लागवडीनंतर 45 दिवसांनी 1500 ग्रॅम डायथेन एम-45, 1500 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व 500 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसांनी फवारणी करावी साधारण 3 ते 4 फवारण्या कराव्यात.
भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर क्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
Chilli and Okra Disease 2025 भेंडी
भेंडीवर प्रामुख्याने भुरी आणि केवडा या 2 रोगांचा प्रादुर्भाव आढळतो आणि या दोन्ही रोगांमुळे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होते.

भुरी:
या रोगाची सुरुवात खालील पानांपासून होते या रोगामुळे पानाच्या दोन्ही बाजूस पिठासारखे पांढरे बुरशी दिसते या रोगाचे प्रमाण तीव्र असल्यास सर्व पाने पांढरी होऊन निस्तेज होऊन गळतात. तसेच पांढरी बुरशी फांद्यांवर फळांवरही पसरते त्यामुळे फळे पिवळसर आणि अखूड होतात.
उपाय:
या रोगाच्या बंदोबस्तासाठी रोग दिसतात 500 ग्रॅम बाविस्टीन किंवा 500 मिली कॅरेथॉन किंवा 1500 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा 500 ग्रॅम बेनलेट 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 20 किलो गंधक पावडरची प्रतिहेक्टरी करावी गरज असल्यास 15 दिवसाच्या अंतराने दुसरी आणि तिसरी फवारणी करावी.
पानांच्या शिरा पिवळे पडणे:
Chilli and Okra Disease 2025 हा रोग विषाणूमुळे होतो तसेच रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळी भेंडीवर फारच होतो या रोगामुळे पानाच्या शिरा पिवळ्या पडतात. झाडाची वाढ खुंटते तसेच भेंडी सुद्धा पिवळी पडते. रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे होतो. शेंडे वाकडे होतात आणि उत्पादनावर तसेच प्रतिवर अनिष्ट परिणाम होतो व नंतर फळे येतच नाहीत.

उपाय:
Chilli and Okra Disease 2025 रोगट झाडे दिसतात काढून नष्ट करावीत.
रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पिकावर 625 मिली रोगर किंवा 1000 मिली म्टसिस्टोक्स 500 लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
पीक फुलावर आल्यानंतर वरील औषधांना ऐवजी 1000 मिली मॅलेथीऑन 500 लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी गरजेनुसार फवारणी करावी.
अर्का अनामिका किंवा फुले उत्कर्षा किंवा फुले कीर्ती यासारख्या प्रतिबंधक जातींचा वापर करावा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |