Chemical Fertilizers 2025 कृषी विद्यापीठातील अनेक वर्षापासूनच्या संशोधन शिफारसी नुसार असे आढळून आले आहे की, फक्त रासायनिक किंवा फक्त सेंद्रिय खतांच्या वापरातून पिकांच्या उत्पादनात वाढ होत नाही, तर रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर केला तर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारले जाते.

सध्याच्या परिस्थितीत अन्नद्रव्यांची कार्यक्षमता पाहिली तर नत्राची 30 ते 50 टक्के स्फुरदाची फक्त 15 ते 20 टक्के पालाश ची 60 ते 70 टक्के आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फक्त 2 ते 5 टक्के इतकी आहे. या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवणे काळाची गरज आहे. ही कार्यक्षमता 1 टक्क्यांनी जरी वाढली तरी आपल्या देशाच्या अंदाजे एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त फार कमी होऊ शकतो. कारण रासायनिक खते हे मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे.
सोयाबीन लागवडीतील महत्त्वाचे मुद्दे !!
Chemical Fertilizers 2025 रासायनिक खतांचा वापर 1950-51 मध्ये 0.52 किलो हेक्टरी होता तो आता 148 किलो हेक्टरी आहे. या कालखंडात धान्य उत्पादनात वाढ करून भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला परंतु हे सगळे करत असताना पाणी आणि जमिनी या नैसर्गिक साधन संपत्तीच्या प्रतीकडे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही.

कालांतराने रासायनिक खतांचा धान्य उत्पादनात प्रतिसाद गुणांक कमी होत गेला म्हणजे 1975 मध्ये नत्र, स्फुरद, पालाश, अन्नद्रव्य एक किलो पिकास जमिनीतून दिले असता 16 किलो धान्य उत्पादन मिळत होते. ते आता त्याच जमिनीतून फक्त 6 किलो धान्य उत्पादन मिळते याचा अर्थ जमिनीची सुपीकता जवळ जवळ 62% कमी झाले आहे.
म्हणजेच जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रासायनिक खतांचा असंतुलित वापर सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा बेसुमार व शास्त्रीय सिंचन पद्धतीचा वापर होय, त्यासाठी खालील पद्धतींचा वापर शेतकरी बंधूंनी काटेकोरपणे आपल्या शेतात केला तर निश्चितच शेतातील रासायनिक निमिष्ठांचा खर्च कमी होऊन श्वास्वत उत्पादनात वाढ होईल.
Chemical Fertilizers 2025 रासायनिक खताचे कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय
माती परीक्षणाद्वारे विविध पिकांना शिफारशीत खत मात्रेमध्ये बदल करून संतुलित खतमात्रा द्यावी. जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश चे प्रमाण कमी असल्यास शिफारस खतमात्रा 25 टक्क्याने वाढवावे या उलट प्रमाण जास्त असल्यास शिफारस खत मात्र 25% ने कमी करावी तसेच जमिनीत अन्नद्रव्य प्रमाण मध्यम असल्यास शिफारस खतमात्र प्रमाणे खत द्यावे.
Chemical Fertilizers 2025 कृषी विद्यापीठाने तयार केलेले अपेक्षित उत्पादन तंत्र समीकरणांचा वापर केला तर पिकांच्या अपेक्षित उत्पादनाबरोबर जमिनीची सुपीकता ही वाढेल.
सेंद्रिय खतांचा विविध पिकांना शिफारसी प्रमाणे प्रत्येक वर्षी जमिनीतून दिल्यास जमिनीचा प्राकृतिक व जैविक गुणधर्मात चांगले बदल होऊन रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल.

जमिनीतील मातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असल्यास शेणखत सोबत जिप्सम चा वापर माती परीक्षणानुसार उन्हाळ्यात वापर करावा म्हणजे अशा चोपण जमिनींची सुधारणा होईल.
Chemical Fertilizers 2025 जमिनीतील मातीची विद्युत वाहकता 1 डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा जास्त असेल तर पृष्ठभागावर पांढरे क्षार दिसून येतात. तर या क्षरांचा शेतीत चांगले पाणी देऊन निचरा करावी शेताच्या बाजूला चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
माती परीक्षणानुसार मातीमध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त असल्यास फळबाग लागवड करू नये विशेषतः लिंबू, मोसंबी, संत्राची लागवड करू नये. अशा जमिनीत सेंद्रिय भूसुधारक, मळी कंपोस्ट, गांडूळ खत, गंधक, शेणखतात मिळवून द्यावे म्हणजे जलधारणा शक्ती वाढेल व जमिनीची घडण सुधारेल. तसेच चुनखडी प्रतिकारक सीताफळ, आवळा, पपई, तूर, भुईमूग, बाजरी, इत्यादी पिकांची लागवड करावी तसेच आम्लयुक्त रासायनिक खते अमोनियम सल्फेट विद्राव्य खतांचा ठिपकाद्वारे वापर करावा.
पिकांच्या फेरपालटीत मूग, उडीद, सोयाबीन, चवळी, तूर, या कडधान्य पिकांचा समावेश करावा त्यामुळे पीक काढण्याच्या वेळी पालापाचोळा जमिनीवर पडून नांगरणीच्या वेळी जमिनीत मिसळून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होऊन जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांचे कार्यक्षमता वाढवून पिकांची वाढ जोमदार होते.

शेतात पिकांची काढणी झाल्यावर उरलेले पिकांचे अवशेष न जाळता त्यांच्या अच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे तसेच उसाचे पाचट न जाळता त्याचा सुद्धा खोडवा पिकात अच्छादन म्हणून वापर करावा म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन थांबेल तणांचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आणि सेंद्रिय कर्ब मातीत वाढेल.
Chemical Fertilizers 2025 ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर पीक वाढीच्या अवस्थेनुसार केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल ठिबकाद्वारे युरिया, फॉस्फरिक ऍसिड, पांढरे पोटॅश, तसेच चिलेटेड, स्वरूपातील मॅग्नेशियम लोह, जस्त इत्यादींचा वापर करावा.
नत्रयुक्त रासायनिक खत जसे की युरिया चा वापर पेरणीच्या वेळेस एकदाच न करता पेरणीच्या वेळी अर्धी मात्रा आणि पेरणीनंतर एक महिन्यांनी अर्धी मात्रा याप्रमाणे विभागून द्यावे. विशेषता मका व कापसासाठी नत्र 3 वेळा विभागून द्यावे. (20% पेरणी वेळी उर्वरित 40 टक्के 2 वेळा एक महिन्याच्या अंतराने देऊन माती आड करावे).
Chemical Fertilizers 2025 हलक्या जमिनीत बटाटा टोमॅटो वांगी इत्यादी भाजीपाला पिकांना नत्राप्रमाणेच पालाशयुक्त खते विभागून दिल्यास फायदा होतो. युरिया खताची दुसरी मात्रा उभ्या पिकात देताना निंबोळी पेंडीचा 5:1 प्रमाणात वापर करावा. (5 भाग युरिया 1 भाग निंबोळी पेंड).
बागायत क्षेत्रात 2/3 वर्षातून एकदा हिरवळीचे पिके उदा. धैचा किंवा ताग घेऊन फुलोरा सुरू होताच जमिनीत गाढावेत म्हणजे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.
Chemical Fertilizers 2025 पाण्याचा अमर्याद वापर न करता बागायत क्षेत्रामध्ये पाणी देण्याच्या आधुनिक पद्धतींचा वापर करावा उदा. ठिबक तुषार सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावे.
माती परीक्षण करून मातीत कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पेरणीच्या वेळी शेणखतात मिसळून करावा उदा. लोहाची कमतरता म्हणजे मातीत 4.5 पीपीएम पेक्षा कमी असल्यास एकेरी 10 किलो फेरस सल्फेट 40 किलो शेणखतात मिसळून आठवडाभर मुरवून जमिनीतून द्यावे.

तसेच मातीत 0.6 पीपीएम पेक्षा जास्त कमी असल्यास एकेरी 8 किलो झिंक सल्फेट वरील प्रमाणे शेणखतात मुरवून द्यावे. बोरॉनची कमतरता असल्यास बोरॅक्स एकेरी 2 किलो शेण खतात मिसळून द्यावे.
Chemical Fertilizers 2025 भात पिकांना युरिया डीएपी 60:40 या प्रमाणात ब्रिकेटचा वापर 170 किलो प्रति हेक्टरी प्रमाणे करावा, तसेच गिरीपुष्पाचा पाला 3 टन प्रती हेक्टर चिखलणीच्या वेळी जमिनीत गाढावा.
अशाप्रकारे भविष्यात शेतकरी बंधूंनी वरील सुचवलेल्या उपाययोजनांचा एकात्मिकरित्या अवलंब केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून विविध पिकांचे शाश्वत उत्पादन घेता येईल व जमिनीचे आरोग्य चांगले राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |