Cabbage Cultivation 2025 भारत देश जगात कोबी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण भाजीपाला पिकांपैकी अंदाजे चार टक्के क्षेत्र या पिकाखाली आहे. भारतामध्ये पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोबीचे उत्पादन घेतले जाते.

Cabbage Cultivation 2025 महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्यात या पिकाची लागवड होते. हे हिवाळी भाजीपाल्यातील महत्वाचे पीक आहे. तसेच हे पीक उष्ण व समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर ते मायेचं एप्रिल पर्यंत बाजारात उपलब्ध असते.
शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा!!
Cabbage Cultivation 2025 आहारातील महत्त्व:
कोबीमध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असून शरीर पोषणासाठी आवश्यक खनिजेसुद्धा उपलब्ध आहेत. या भाजीचा उपयोग कोशिंबीर भाजी लोणचे व कच्या स्वरूपात खाण्याखाली केला जातो. कोबीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील प्रमुख घटक आढळतात. पाणी 91.9 टक्के, प्रथिने 1.8 टक्के, स्निग्ध पदार्थ 0.6 टक्के, जीवनसत्व ब 0.06 ग्रॅम, जीवनसत्व क 124 मिली ग्रॅम.

Cabbage Cultivation 2025 कोबी हि क्रुसिफेरी या कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव Brassica Oleracea var. capitata असे आहे. भाजीपाला उत्पादनाच्या दृष्टीने हि वनस्पती एकवर्षीय तर बीजोत्पादनाच्या दृष्टीने द्विवर्षीय आहे.
Cabbage Cultivation 2025 जमीन व हवामान:
कोबी लागवड यशस्वीरीत्या करण्यासाठी मध्यम प्रतीची सेंद्रिय खतेयुक्त व उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 पर्यंत असावा. या दरम्यान जमिनीचा सामू असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये सहजरित्या उपलब्ध होतात या पिकाची वाढ हिवाळी हंगामातील थंड तापमानामध्ये चांगली होते. जास्त उष्ण हवामानात कोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते त्यामुळे 25 अंश सें पेक्षा जास्त तापमान वाढ कमी होते निरनिराळ्या हंगामात लागवड करणासाठी निरनिराळ्या जातींची लागवड करावी.
Cabbage Cultivation 2025 सुधारित जाती:
कोबीच्या गड्ड्यांचा आकार, पानांचा आकार, वजन व रंग यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. गड्यांच्या आकारानुसार कोबीच्या विविध जाती खालील प्रमाणे;
गोल आकाराचे गड्डे असणाऱ्या जाती: या प्रकारात गड्डे गोलाकार घट्ट व हिरव्या रंगाचे असतात.
गोल्डन एकर : हि जात कोपनहेगन या जातीपासून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे गड्डे लहान गोल आकाराचे व सरासरी 1 ते 1.5 किलोग्रॅम वजनाचे असतात.
प्राईड ऑफ इंडिया : या जातीचे गड्डे घट्ट गोलाकार असून पुनर्लागणीपासून 70 ते 75 दिवसात काढणीस तयार होतात.
चपटे गड्डे असणाऱ्या जाती :
पुसा ड्रम हेड : या जातीचे गड्डे सपाट, आखडू व सरासरी 1.75 ते 2 किलोग्रॅम वजनाचे असतात.
पुसा मुक्ता : या जातीचे गड्डे चपटे-गोल असून हि जात ब्लॅक रॉट या रोगास प्रतिकारक आहे.

Cabbage Cultivation 2025 संकरित जाती:
श्री गणेश गोल, नाथ आता लक्ष्मी 401, ग्रीन एक्सप्रेस, ग्रीन बॉय, सप्टेंबर इत्यादी. याशिवाय आज अनेक खाजगी कंपन्यांनी सुधारित आणि संकरित जाती विकसित केल्या असून त्या बाजारात उपलब्ध आहेत. लागवडीच्या हंगामानुसार आणि तापमानाच्या गरजेप्रमाणे वाणांची निवड करावी.
Cabbage Cultivation 2025 लागवडीचा हंगाम:
अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रात कोबी पिकाची लागवड वर्षभर केली जाते. लवकर येणाऱ्या जातींची ऑगस्ट महिन्यात आणि मध्यम उशिरा येणाऱ्या जातींची सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारीमध्ये गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावेत. बाजारपेठेत सतत विक्री करण्याच्या दृष्टीने बियाणे दोन-तीन आठवड्यांच्या अंतराने पेरावे.
जमिनीची पूर्वतयारी:
साधारणतः 3*1*0.25 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करून त्यामध्ये उत्तम शेणखत 20 किलो.ग्रॅम, 50 ग्रॅम. 20:20:20 निंबोळी पावडर 2 किलो.ग्रॅम. व थायमेट 10 टक्के 20 ग्रॅम. वाफ्यात वरच्या थरात मिसळावे, एक हेक्टर क्षेत्रासाठी 20 ते 25 वाफे पुरेसे होतात. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर 5 ते 7 से.मी. अंतरावर 1 से.मी. रेषा हाताने पाडून बियाणे पातळ पेरावे. बियाणे खत मिश्रित मातीने झाकावे व झारीने हलकेसे पाणी द्यावे.
उन्हाळ्यातील उष्ण तापमानात 35 ते 50 टक्के शेड नेटचा वापर करावा. रोपांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपे उगवल्यानंतर कीडनाशक आणि डायथेन एम 45 बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून 8 ते 10 दिवसांचे अंतराने दोन-तीन वेळा फवारण्या कराव्यात. साधारणपणे 25 ते 30 दिवसानंतर रोपे पुनर्लागणीसाठी तयार होतात.
बियाणे प्रमाण:
Cabbage Cultivation 2025 सरळ जातीसाठी 400 ते 500 ग्रॅम प्रति हेक्टर संकरित जातीसाठी 250 ते 300 ग्रॅम प्रति हेक्टर.
Cabbage Cultivation 2025 लागवड:
लागवड क्षेत्राची नांगर नांगरणी उभी आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी शेवटच्या कुळवीच्या आधी वीस ते पंचवीस टन पुसलेले शेणखत प्रती हेक्टर व अंदाजे 1 टन निम पावडर व 10 किलो.ग्रॅम. फॉलीडॉल पावडर जमिनीत मिसळून द्यावे. पुनरलागण सरी वरंब्यावर करावी. लवकर येणाऱ्या जातीसाठी 45*45 सेमी. व मध्यम आणि उशिरा येणाऱ्या जातीसाठी 60*45 सेमी. अंतरावर लागवड करावी.
पाणी व खत व्यवस्थापन:
कोबीचे बियाणे उगवणीपासून ते गड्डे निर्मिती अवस्था काढणे पर्यंत पाण्याची नितांत आवश्यकता असते पाणी देण्याची पद्धत ही हवामाना जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था यावर अवलंबून असते पारंपारिक पद्धतीत पाणी जास्त प्रमाणात दिले जाते म्हणून विद्राव्य खते व सिंचन पद्धतीने द्यावे.
कोबी पिकाच्या उत्तम लागवडीसाठी व अधिक उत्पादनासाठी खत व्यवस्थापनाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांद्वारे 200:100:100 किलो.ग्रॅम. या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्टर द्यावे लागवडी वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. शिल्लक नत्राची मात्रा 30 दिवसांच्या अंतराने दोन वेळा समप्रमाणात द्यावी. तसेच ठिबक संचाद्वारे 525 किलोग्रॅम. 19:19:19 व 217.5 कि.ग्रॅ. 46:00:00 द्यावे.
अंतर मशागत:
लागवडीनंतर पिकातील तन वेळोवेळी खुरपून काढून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीनंतर 5 ते 6 आठवड्याने रोपांना मातीची भर द्यावी. यामुळे गड्डे भरताना झाड खाली कोलमडणार नाही. लागवडीच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी लागवडी पूर्वी ट्रायफ्ल्यूरॅलीन 1 कि.ग्रॅ.प्रति हेक्टर किंवा ब्यूटाक्लोर 2 किलोग्रॅम. प्रती हेक्टर पाण्यात मिसळून फवारावे.
कोबीवर्गीय भाज्यांवर आढळणारे रोग व उपायोजना:
रोपे कोलमडणे:
या रोगामुळे रोपे जमिनीलगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशीमुळे होतो हा रोग आटोक्यात आणण्यासाठी वाफ्यातून कॅप्टन 0.1% द्रावण झालेली शिंपडावे. पेरणीपूर्वी बियांना थायरम किंवा कॅप्टन हे औषध 3 ग्रॅम. प्रति किलो बियाणे या प्रमाणात हे बुरशीनाशक बियांना चोळावे.
ब्लॅक रॉट:
या रोगामुळे पाणी पिवळी पडतात, आणि पानांच्या शिरा काळ्या होतात. खोडाचा आतील भाग काळपट पडतो. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बी आणि जमिनीतून होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बी 50 सें.ग्रे. कोमट पाण्यात 30 मिनिटे बुडवून घ्यावे व सुकवावे नंतर रोपवाटिकेत पेरावे किंवा पेरणीपूर्वी मर्क्युरीक क्लोराइड मध्ये (1:1000) अर्धा तास बुडवून नंतर सुकवून पेरावे. तसेच रोगप्रतिकारक जाती लावाव्यात रोगाची लक्षणे दिसताच खालील पाने काढून नष्ट करावीत. कॉपरऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
पानावरील ठिपके आणि करपा:
हे रोगही कोबीवर्गीय पिकावर येतात. यांच्या नियंत्रणासाठी शक्यतो पिकाची फेरपालट करावी. एक पीक त्याच त्याच जमिनीत घेऊ नये. रोगप्रतिकारक जाती लावाव्यात तसेच पेरणीपूर्वी बियांना बीजप्रक्रिया करावी. किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा. रोगाचा प्रादुर्भाव दिसतात मॅन्कोझेब कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम स्टिकर 10 मिली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

कोबीवर्गीय भाज्यांवर आढळणाऱ्या किडी व उपाययोजना:
काळी माशी किंवा मस्टर्ड सॉफ्लाय:
ही एक प्रकारची माशी असून ते पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी कोवळ्या रोपांची पाने खाते मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. यांच्या नियंत्रणासाठी दर 15 दिवसांच्या अंतराने मॅलेथीऑन 50 इसी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किडीच्या तीव्रतेनुसार फवारणीचे अंतर कमी जास्त होऊ शकते.
मावा:
हिरव्या किंवा काळा रंगाचे हे बारीक किडे कोवळ्या पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुरकुत्यासारखे होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. नियंत्रणासाठी मॅलेथीऑन 50 इसी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास हि कीड आटोक्यात येते 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
चौकोनी ठिपक्यांचा पतंग:
या किडीची अळी पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाला छिद्र पाडून पानातील हरितद्रव्य खाते मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड पाने खाऊन अगदी चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबर पासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आराखड्याप्रमाणे किडींचे नियंत्रण करावे.
- लागवडी पूर्वी मुख्य पिकामध्ये आणि कडेने मोहरी पेरावे मुख्य पिकाच्या 25 ओळीनंतर 2 ओळी मोहरी पेरावी.
- शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचान लावावेत.
- एकरी 5 फेरोमोन सापळे लावावेत.
- मोहरीवर अळ्या दिसू लागताच डायक्लोरोव्हॉस 10 मिली 10 लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी.
- कोबी फुलकोबी पिकावर पहिली फवारणी 2 आळ्या प्रती रोप दिसू लागताच बी. टी. 10 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी फवारावे. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री कीटक प्रति हेक्टरी 1 लाख या प्रमाणात सोडावे.
- दुसरी फवारणी निंबोळी अर्क 4% या प्रमाणात करावी.
- तिसरी फवारणी इन्डॉक्झाकार्ब 10 मिली किंवा स्पिनोसॅड 2.5 एस. सी. 10 मिली 10 लिटर पाण्यातून करावी.
- चौथी फवारणी निंबोळी अर्क 4% या प्रमाणात करावी.
सर्व मुद्द्यांचे व्यवस्थित नियोजन केल्यास निश्चित कोबी वर्गीय भाज्यांचे उत्पादन वाढेल व शेतकरी बंधूंना चांगला फायदा होईल.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |