वनस्पतीशास्त्र ऊसाचे फुटवे!! Botany Sugarcane Shoots 2025

Botany Sugarcane Shoots 2025 ऊसाची लागण केल्यानंतर बेणे कांडीवर असलेल्या मूळ पट्टीचे वरील अंकुरतुन कांडेमुळे सुटतात. जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्य यांचे शोषण सुरू होते. कांड्यातील ग्लुकोज व इतर पदार्थ यामुळे बेण्यावरचा अंकुर चेतविला जातो. त्यातून कोंभ निपजतो या कोंभाचे पुढे पूर्ण उसामध्ये रूपांतर होते.

Botany Sugarcane Shoots 2025

कोंभाला आरंभी एक मूळ येते पुढच्या वाढीच्या काळात म्हणजे लागणीपासून दीड-दोन महिन्यात कांडे मुळांचे कार्य पूर्णतः कमी होते व शोषण शोषणाचे काम कोंभा पासून तयार झालेली मुळे शूट रूट्स करू लागतात. याच कोंभावर उसाचा जो अंकुर असतो त्यापासून क्रमाक्रमाने पेरे वाढत जाऊन ऊस तयार होतो. यातल्या खालच्या पेरावर आणखी अंकुर असतात या अंकुरापासून फुटवे निपजतात.

औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग!!

Botany Sugarcane Shoots 2025 फुटव्यांची संख्या:

प्रत्येक मुख्य कोंभा पासून किती फुटवे यावेत याचा एक प्रकारचा निसर्ग नियम असतो. आपण सध्या लागणीसाठी वापरतो त्या सॅकॅरम ऑफिसिनॅरिअम या उसामध्ये सर्व साधारणपणे एका मुख्य कोंभारातील प्राथमिक फुटवे व तीन दुय्यम फुटवे येतात. म्हणजेच डोळा बेणे लावल्यानंतर त्याला मुख्य कोण धरून एकूण संख्या सात होती ही क्रिया दाखवण्याचे एक सूत्र आहे.

WhatsApp Group Join Now

ऊसाची संख्या=अ +ब+ क

अ=मुख्य कोंभाचा ऊस,

ब= प्राथमिक फुटवे

क= दुय्यम फुटवे

मुख्य कोंभ किडीने खाल्ला किंवा काढून टाकला तर मात्र, हे सूत्र बदलते प्रत्येक प्राथमिक फुटवा हा मुख्य कोंभाप्रमाणे फुटवे निर्माण करू शकतात. सॅकॅरम बारबेरी या प्रकारच्या उसामध्ये फुटव्यांची सूत्र असे आहेत.

WhatsApp Group Join Now

ऊसांची प्रत्येक बेटातील संख्या= अ + 8 ब+ 23 क+ 31 ड

अ म्हणजे मुख्य कोंब ब क ड म्हणजे अनुक्रमे प्राथमिक दुय्यम तृतीयम इ. फुटवे.

ऊस जाड असेल तर फुटवे कमी बारीक असेल तर फुटवे जास्त असे काहीचे अवलोकन आहे. पण हा काही निसर्ग नियम नाही शेतात लावलेल्या उसामध्ये फुटव्यांची अवस्था आल्यानंतर पुढे कांड्या लांबण्याची अवस्था येते बेण्याची लागण फार खोलीवर केली नसेल, पुरेसा ओलावा व योग्य उष्ण तापमान असेल, तर फुटवे भरपूर येतात दोन सऱ्यातील ऊस वाढीला लागून एकमेकांना भिडू लागतात फुटव्यांची परस्परांशी स्पर्धा सुरू होते.

अनेक अंतर्गत व बाह्य घटकांचा फुटव्यांच्या संख्येवर परिणाम होतो काही शेतकरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यादरम्यान उसाची लागण करतात जुलै महिन्यातील लागण्याच्या उसात पहिले आलेले फुटवे पुढे थोडे कमी होतात. ऑगस्ट लागण्याच्या उसाला पुष्कळ दुय्यम फुटवे येतात पण यांचे मरून जाण्याचे प्रमाण जास्त असते.

सप्टेंबर लागण्याच्या उसाला भरपूर फुटवे येतात पण त्यातले 20 ते 25 टक्के राहतात. मुख्य फुटल्यानंतर काही मोठ्या आकाराच्या पानकोंबऱ्या येतात. त्यातला 50 टक्क्याहून अधिक शेवटपर्यंत मरून जातात. ग्लुकोज, फ्रुटोज इत्यादींचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कारखान्याच्या गाळपासाठी त्या अयोग्य असतात.

जोपर्यंत फुटवे बाल्याअवस्थेत असतात तोपर्यंत सर्वांना प्रकाश, हवा, पाणी, जमीन व त्यातली पोषणद्रव्य पुरेशी असतात. पण हे फुटवे मोठे झाल्यावर परस्परांवर सावली करतात. प्रकाश अपुरा पडतो, जागा, ओलावा पोषण द्रव्य अपुरी पडतात, फुटवे मरण्याचे प्रमाणही वाढते.

Botany Sugarcane Shoots 2025 फुटव्यांवर परिणाम करणारे घटक:

अनेक अंतरबाह्य घटकांचा फुटव्यांची निर्मिती व वाढीवर परिणाम होत असतो आरंभी निपजलेल्या फुटव्यांची संख्या आणि ऊस काढण्याच्या वेळी शेतात मिळणारी ऊसाची संख्या यांचा अनन्य संबंध पाहताना काही संभ्रम आणि संदेह निर्माण होतात. पण तो टाळणे आवश्यक्य आहे. उदा. रुंदी सरीच्या लागणींमध्ये फुटवे चांगले वाढतात. अरुंद सरीमध्ये लागण दाट होते. त्यामुळे फुटवे कमी मिळतात शेवटी आपणास हवे तसे तितके निकोप सशक्त वजनदार ऊस मिळवण्यासाठी आरंभापासून किती फुटव्यांची निपज करायची याचे मरण्याचे प्रमाण कमीत कमी कसे ठेवायचे व शेवटी अपेक्षित संख्या कशी राखायची हेच ऊस शेतीच्या यशाचे गमक आहे.

Botany Sugarcane Shoots 2025 सूर्यप्रकाश:

सूर्यप्रकाशाचे तीव्रता व प्रकाशाचा कालावधी यांच्या फुटव्यांवरती खूप मोठा प्रभाव असतो. उसाच्या शेताच्या परिसरात आणि दिवसभरात काही काळ सावली उसावर पडत असेल तर फुटव्यांचे प्रमाण फार कमी राहते. तसेच फुटवे येण्याच्या काळात आकाशी ढगांनी खूप काळ अच्छादलेले असलेले तर फुटवे कमी येतात.

नवीन लागवड केलेल्या शेतात सुरुवातीच्या भरपूर फुटवे येण्याच्या अवस्थेत पाठोपाठ दोन सरांतील पाणी एकमेकांना भिडण्याची एक अवस्था येते तोपर्यंत फुटव्यांची संख्या इतकी झालेली असते की, अन्नद्रव्यासाठी त्याची मोठी स्पर्धा सुरू होते. याच वेळेला प्रत्येक फुटीवर भरपूर पालवी आल्याने परस्परांना आच्छादन करतात.

या आच्छादनामुळे भरपूर सूर्यप्रकाश असून सुद्धा तो फुटव्यांच्या वाढीला कमी पडू लागतो. याप्रमाणे अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश यासाठी झालेला तीव्र स्पर्धेमुळे फुटवे मरण्याची एक लाट सुरू होते. पण त्यातला प्रकाश हा घटक जास्त प्रभावी असतो. प्रकाशाचा हा प्रभाव उसाच्या शरीरांतर्गत निर्माण होत असल्याने संप्रेरकाशी निगडित असतो.

Botany Sugarcane Shoots 2025 तापमान:

प्रकाशानंतर तापमान हा घटक फुटव्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 20° पासून पुढे जसजसे तापमान वाढत जाते तस तसे फुटव्यांचे प्रमाण व 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ते जास्तीत जास्त राहतील थंड किंवा अति उष्ण वातावरणात फुटवा कमी येतो थोडी उथळ लागण व पाचटाचे आच्छादन यामुळे उबदारपणा येतो व फुटवा वाढतो.

Botany Sugarcane Shoots 2025 खते:

नायट्रोजनची मात्रा जसजशी वाढते तसतसे फुटव्यांचे प्रमाण वाढत जाते पण एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र फुटव्यांची संख्या वाढत नाही. फॉस्फरसची कमतरता असल्यास वाढत्या मात्रेबरोबर फुटव्यांची संख्या वाढते पण जमिनीत पुरेसा फॉस्फरस असेल तर मिळणारा प्रतिसाद कमी व तात्पुरता असतो कारण मर्यादेच्या बाहेर फुटवे वाढल्यास फॉस्फरसच्या कमतरतेची लक्षणे दिसतात.

Botany Sugarcane Shoots 2025 सिंचन:

फुटव्यांची संख्या हमखासपणे वाढवण्याच्या उपाय म्हणजे चांगले पाणी व्यवस्थापन फुटव्यांची निपज ही विभाजन क्षम असलेल्या मेरीस्टेटमॅटिक पेशींच्या फुगीरपणावर अवलंबून असते. त्यासाठी पाणी अत्यावश्यक असते त्यामुळे अनेक विकरे कार्यान्वित होऊन पेशींचे विभाजन घडून येते व फुटवे वाढतात. तथापि मर्यादेपेक्षा अधिक ओलावा व मुक्त हवेचा दबाव अभाव फुटव्यास हानिकारक ठरतो तसेच पाण्याचा ताण सुद्धा फुटव्यावर अनिष्ट परिणाम करतो.

सरींची रुंदी आणि रोप लागणीचे अंतर:

कमी रुंदीची सरी व दाट लागण केली तर जरी उसाचा फुटवा झाला तरी प्रकाश, हवा, अन्न यासाठी झालेल्या स्पर्धेमुळे फुटव्यांची मर जास्त होते. त्यामुळे सुद्धा फुटवे कमी होतात. रुंद सरी 4.5 ते पाच फूट व योग्य अंतर दीड ते दोन फूट ठेवून रोप लागण केल्यास भरपूर प्रकाश मिळतो हवा खेळती राहते आणि पोषण द्रव्यांसाठी स्पर्धा टाळते भरपूर फुटवे येतात दक्षिण उत्तर दिशेच्या सरांमध्ये प्रकाश चांगला मिळतो व फुटवे चांगले फुटण्यास मदत होते.

Botany Sugarcane Shoots 2025 रोग आणि किडी:

शेंडा किड आणि कांडेकिड या दोन्हींमुळे उसाचे बरेच नुकसान होते. बाळ अवस्थेमध्ये या किड आल्यानंतर कोंब त्याला बळी पडतात. परंतु बाजूचे फुटवे चांगले येतात जेठा कोंबची शिरजोरी कमी झाल्यामुळे फुटवे येतात पण अशा फुटव्यांवर सुद्धा कांडेकीड किंवा शेंडाकीड येते व नुकसान होते म्हणून किडींचे नियंत्रण करावेच लागते.

तुटाळी आणि फुटव्यांची भरपाई:

लागण केलेल्या उसामध्ये काही कारणांमुळे क्वचित ठिकाणी देण्याची उगवण होऊ शकत नाही तेथे तुटाळी पडते. अशी तुटाळी भरण्यासाठी सुरुवातीपासून लागणीच्या वेळीच पाटाकडेला कांडी लावून ठेवण्याची पद्धत आहे. एखाद्या ठिकाणी तुटाळी पडल्यास दोन्ही बाजूने फुटवे वाढवून ती जागा भरून सुद्धा जाऊ शकते तसेच उसामध्ये फुटवे काही कारणांमुळे मरतात त्यांची जागा नवीन फुटव्यांनी भरून निघते बाल्यावस्थेत अशी भरपाई चांगल्या प्रकारे घडून येते. पण ऊस मोठा झाल्यावर भरपाईचे प्रमाण कमी होते. म्हणून लागणीचे वेळीच रोपे तयार केल्यास तुटाळी भरणे सोयीचे होते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment