वनस्पती शास्त्र: ऊसाची परिपक्वता!! Botany Sugarcane Maturity 2025

Botany Sugarcane Maturity 2025 ऊसाची कोणत्याही कारणासाठी तोडणी करण्यापूर्वी तो कितपत परिपक्व झाला आहे हे पाहणे आवश्यक असते. जेव्हा उसामध्ये साखरेची पातळी आर्थिकदृष्ट्या योग्य झाली आहे. अशी अवस्था येते. तेव्हा तो परिपक्व झाला असे म्हणता येईल.

Botany Sugarcane Maturity 2025

Botany Sugarcane Maturity 2025 आजमितीला पारिपक्वतेचे जे दंडक वापरले जातात, त्यानुसार रसामध्ये साखरेचे शुक्रोज प्रमाण 16 % पेक्षा जास्त व रसाची शुद्धता 85% पेक्षा अधिक असेल तर तो ऊस परिपक्व समजला जातो. ऊस जेव्हा परिपक्वतेच्या अवस्थेत जातो तेव्हा त्याची वाढ थांबते. नवीन पाने येणे बंद होते पेरेंकायमा नावाच्या नरम पेशींमध्ये असलेल्या रितिकेमध्ये पाठवली जाते.

घोडेगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

परिपक्वता ओळखण्याच्या पद्धती

पिकाची सर्वसाधारण अवस्था:

पिकाचा हिरवागार रंग आता फिकट मलूल झालेला असतो. नंतर ही पाने पिवळी होतात. उसावरील हिरव्या पानांची संख्या कमी होते. जुनी पाने पिवळी पळून सुकतात. तसेच लटकत राहतात किंवा गळतात. अशी परिस्थिती पाण्याचा ताण किंवा आती पाण्याने सुद्धा उद्भवते संभ्रम टाळावा.

WhatsApp Group Join Now

जवळून पाहणी करणे: Botany Sugarcane Maturity 2025

शेत शेतामधला सर्वसाधारण वाढीचा ऊस काढावा त्याच्या मध्य उंचीच्या थोड्यावर धारदार च्या कुणाचेही ते घ्यायला धारदार चाकूने छेद घ्यावा असा छेद दिलेला सूर्यप्रकाशाकडे धरावा तो पाणीदार वाटला तर अपरिपक्व समजावा पण थोडा चमकत असेल तर परिपक व त्याच्या अवस्थेत जात आहे असे समजावे.

शेंडा आणि बुडखा यांच्या ब्रिक्सचे गुणोत्तर:

ऊस अपरिपक्व असेल तर शेंड्यांकडील पेरांमध्ये ब्रिक्स कमी असते व बुडख्याकडील पेरांमध्ये ते जास्त असते. ऊस परिपक्व होत जाईल तसतसे शेंडा व बुडख्याकडील ब्रिक्समधील तफावत कमी होत जाते. अशा वेळेला मध्य उंचीवरील पेरातील ब्रिक्स जरा जास्तच असतो. या तत्त्वानुसार शेंड्यांकडील 1/3 भागातील पेरांचा ब्रिक्स व बुडख्याकडील 1/3 भागातील ब्रिक्स यांचे गुणोत्तर पहावे. हे गुणोत्तर एकापेक्षा कमी असेल तर ऊस तो अपरिपक्व समजावा. हे गुणोत्तर एकापेक्षा जास्त असेल तर ऊस परिपक्व आहे असे ओळखावे.

रिफ्रेक्टॉमीटरने ब्रिक्स मोजणे: Botany Sugarcane Maturity 2025

उभ्या पिकामध्ये हॅन्डरिफ्रॅक्टोमीटरने ब्रिक्स मोजता येतात. मध्ये उंचीवरल्या पेराचे ब्रिक्स 20 आले तर ऊस परिपक्व झाला असे ओळखावे. ही पद्धत सर्वात सोपी आहे. पंक्चर करण्याची सुई किंवा दाभणासारख्या सुईने 4-5 थेंब रिफ्रॅक्टोमीटरच्या काचेवर घेऊन निरीक्षण करता येते.

WhatsApp Group Join Now

ब्रिक्स पोल आणि शुद्धता:

उसाच्या रसात विरघळलेले एकूण घनपदार्थ म्हणजे ब्रिक्स, उसाच्या रसामध्ये असलेले निखळ साखरेचे प्रमाण म्हणजे पोल, साखरेचे प्रती पोल प्रमाण म्हणजे शुद्धता. परिपक्वता येत असताना रसामध्ये साखरेचे प्रमाण वाढत असते. हे प्रमाण ब्रिक्सशी सुद्धा निगडित असते. शुद्धता गुणांक हा परिपक्वते बरोबर वाढत जातो. जर पोल 16 पेक्षा जास्त व शुद्धता 85 % पेक्षा जास्त असेल तर ऊस परिपक्व मानावा.

इनव्हर्ट शुगरचे प्रमाण: Botany Sugarcane Maturity 2025

कोवळ्या उसामध्ये ग्लुकोज अथवा फ्रुक्टोज या प्रकारच्या साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यांना इन्व्हर्ट शुगर असे म्हणतात. परिपक्वता येत असताना इन्व्हर्ट शुगरचे शुक्रोज (नॉन रिड्युसिंग शुगर किंवा साखर) यामध्ये रूपांतर होत असते. कोवळ्या उसात इन्व्हर्ट शुगरचे प्रमाण 5 टक्के असते. पक्व उसात ते 0.1% पेक्षा कमी होते. ज्या उसामध्ये इन्व्हर्ट शुगरचे प्रमाण 1% पेक्षा कमी असेल तर ऊस परिपक्व समजावा. ऊस अतिपक्व झाला तरी सुद्धा इन्व्हर्ट शुगरचे प्रमाण वाढते.

पानाच्या देठांमधील ओलावा निर्देशांक:

सर्व घटक जेव्हा अनुकूल असतात तेव्हा आरंभीच्या अवस्थेत उसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण परिपक्वता येताना ते कमी होते. उसाच्या शेंड्यांकडून तिसऱ्या ते सहाव्या पानामध्ये ओलाव्याचे प्रमाण 73 ते 74 टक्के असेल तर ऊस परिपक्व मानावा.

हिरव्या आणि सुकलेल्या पानांच्या संख्येचे गुणोत्तर:

Botany Sugarcane Maturity 2025 उसावरील हिरवी पाने आणि पिकलेली सुकलेली जीर्ण पाने यांच्या संख्येचे गुणोत्तर 0.7 येते तेव्हा परिपक्व झाला असे समजावे.

ऊसाच्या परिपक्वतेवर परिणाम घडविणारे घटक:

वाण: लवकर येणारे हळवे वाण मध्यम मुदतीचे वाण आणि उशिरा येणारे वाण ही वर्गवारी मुळातच परिपक्वतेसाठी लागणारा कालावधीवर केलेले असते. त्यामुळे वाणपरत्वे परिपक्वतेच्या काळामध्ये अनुवंशिक भिन्नता असते.

हवामान: उसाच्या परिपक्वतेवर हवामानाचा मोठा प्रभाव असतो. स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड व कोरडे हवामान यामुळे योग्य वाढ झालेल्या उसामध्ये लवकर परिपक्वता येते. स्वच्छ सूर्यप्रकाशाबरोबर दिवसाचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस, रात्रीचे तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आद्रता 50 ते 55 % ही परिस्थिती परिपक्वता येण्यासाठी अतिशय अनुकूल असते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक मध्ये अशी परिस्थिती मिळते. पण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळामध्ये अशी स्थिती मिळत नाही त्यामुळे रिकव्हरी कमी येते.

ऊसाचे वय: ऊसाचे वय वाढल्यानंतर परिपक्वता येते पण वय आणि हवामान यांच्यातील परस्पर अभिक्रिया हि याबाबतीत महत्वाची असते.

रासायनिक खते: उशिरा आणि मोठ्या प्रमाणात नत्राचा हप्ता दिल्यास परिपकवता काळ वाढतो याउलट फॉसफर्सच्या मात्रेमुळे परिपक्वता लवकर येते.

वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण: मोठ्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडला तर ताणाच्या प्रमाणात परिपक्वता लांबते. याउलट योग्य वाढ झालेल्या उसाला शेवटी हळूहळू पाण्याचा ताण दिला तर लवकर पक्वता येते. कोवळी पाने काढली तर पक्वता लवकर येते.

परिपक्वता वाढणारी रसायने (केमिकल रायपनर्स) :

  • काही रासायनिक पदार्थाची योग्यवेळी फवारणी केल्यास रसामधील साखरेची पातळी वाढते. पक्वता लवकर येते आणि तोडीस उशीर लागला तरी साखरेचा ऱ्हास होत नाही. काही विशिष्ठ परिस्तितीमध्ये अशी केमिकल रायपनर्स वापरता येतात.
  • परिपक्वतेच्या काळात पाऊस सुरू झाला आणि हवामान प्रतिकूल होऊन पक्वतेस अडथळा येऊ लागला तर अशा परिस्थितीत केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात.
  • काही वाणांचे उसाचे एकरी टनेज खूप चांगले असते. पण त्यांची रिकव्हरी पातळी कारखान्यांना समाधानकारक वाटत नाही. अशा वाणांमध्ये केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात.
  • महाराष्ट्रात साखर कारखाने नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत चालतात. आरंभीच्या गाळपात सर्वसाधारनपणे रिकव्हरी कमी असते. ती वाढविण्यासाठी केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे एप्रिलपर्यंत वाढलेले ऊस जास्ती वयाचे होऊन त्यात इन्व्हर्ट शुगर वाढीस लागते. रायपनर्समुळे हा ऱ्हास टाळता येतो.
  • ऊस तुटल्यानंतर गाळप होईपर्यंतच्या काळात अनेक कारणांमुळॆ साखरेचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. रायपरनर्समुळे हे टाळता येते.
  • साखरेचे प्रमाण नुकतेच वाढू लागलेले असते तेव्हा किंवा तोडणीस उशीर झाल्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होत असताना केमिकल रायपनर्स उपयुक्त ठरतात. जेव्हा परिपक्वता पूर्ण झालेली असते तेव्हा रायपनर्सचा उपयोग होत नाही.
  • क्युबा या राष्ट्रातील मॉशेप 1949 या शास्त्रज्ञाने उसामध्ये 2, 4-डी या संप्रेरकाची पानावर फवारणी करून सुक्रोज वाढवण्याचा पहिला प्रयोग केला. यानंतर 2500 पेक्षा जास्त केमिकल्सचे प्रयोग झाले.

काही प्रभावी केमिकल रायपनर्स:

2, 4-डी: मार्केटमध्ये विडार, विडमार 2,4-डी, फेनॉक्झॉन अशा अनेक नावाने मिळते. द्विदल वर्गातील ताणाचे नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. पण उसावर एकरी 1 किलो 200 ते 250 लिटर पाण्यात विरघळून फवारणी केल्यास रिकव्हरी वाढू शकते. शेंड्याच्या बाजूकडील निम्म्या उसावर याची फवारणी उपयुक्त ठरते.

पोलॅरिस ग्लायफोसाइन: हे सर्वात जास्त प्रचलित रायपनर आहे. याची एकरी 5 किलो / 400 लिटर पाणी या प्रमाणात ऊस तोडण्यापूर्वी 6-8 आठवडे फवारणी केली असता रसाची गुणवत्ता वाढते. रसातील साखरेच्या घटकांचा ऱ्हास टळतो. जेव्हा हवामान किंवा जमिनीतील घटक खूप प्रतिकूल असतात तेव्हा पोलॅरिसचा परिणाम चांगला दिसतो. पोलॅरिसमुळे प्रकाश सौश्लेषनावर विपरीत परिणाम होत नाही. रेस्पिरेशन मात्र कमी होते व ऱ्हास प्रक्रिया कमी होते. शुक्रोजचे परिणाम चांगले वाढतात व वाढलेली पातळी 3 महिने टिकून राहते. याची मात्रा जास्त झाल्यास शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.

इथेल / इथेफोन (2-क्लोरो एथिल फॉस्फोनिक ऍसिड): एक प्रभावी केन रायपनर म्हणून याचा वापर हवाई मध्ये होतो. परिपक्वतेकडे झुकणाऱ्या उसाला 700 पीपीएम इथ्रेल फवारणी केली असता 6 आठवड्यानंतर साखरेचे प्रमाण लक्षणीय वाढते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये साखरेचा ऱ्हास न होता ती चांगली टिकून राहते.

सायकोसील (CCC-2 क्लोरो एथिल ट्रायमेथिल अमोनियम क्लोराईड): ऊस तोडणीपूर्वी दोन महिने याची एकरी 1.5 कि. प्रति 400 लिटर पाण्यात विरघळवून फवारणी केल्यास रिकव्हरी वाढते.

ग्यायफोसेट (एन: फॉस्फोनॉमेथिल ग्लायसिन): एक एकर उसासाठी 0.32 ते 0.64 कि. क्रियाशील घटक 400 लिटर पाण्यातून फवारणी केली असता रसातील साखरेचे प्रमाण वाढते व शुद्धताही वाढते. बारा आठवडे सुक्रोजचा ऱ्हास थांबतो. कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तीव्रता वाढविल्यास पाने करपतात.

सोडियम मेटासल्फेट: 10 महिने वयाच्या उसावर 1 हजार पीपीएम तीव्रतेची फवारणी केल्यास सुक्रोज वाढते हा परिणाम 10 ते 12 आठवडे टिकून राहतो.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment