Biyane Vikri Subsidy 2025 नाशिक : जिल्हा परिषद सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर तूर 11.10 क्विंटल, मूग 10.24 क्विंटल, उडीद 10.54 क्विंटल व भुईमूग 157.80 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावे करावेत असे आवाहन जिल्हा परिषद नाशिक कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्व्ये केले आहे.
विकसित कृषी संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सज्ज!
Biyane Vikri Subsidy 2025 असे आहेत योजनेचे निकष
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थी निवड करून तुर, मूग, उडीद व भुईमूग या पिकांची लागवड करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात येईल.

शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करावा. अर्धा सोबत शेतकऱ्यांनी स्वतःचे कुटुंबाचे नाव असलेले 7/12 व 8-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे.
Biyane Vikri Subsidy 2025 एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक हेक्टर साठी आवश्यक बियाण्यांचा लाभ देण्यात येईल. (सदर बियाण्यांचा लाभ देताना एकापेक्षा अधिक बियाण्यांचे क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे.)
चालू आर्थिक वर्षात लांब दिलेल्या शेतकऱ्याला दुबार लाभ दिला जाणार नाही. योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सातपूर, नाशिक व राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे बियाणे खरेदी करून पुरविण्यात येतील.
या योजनेत 50 टक्के अनुदानावर तुर, मुग, उडीद व भुईमूग बियाणे देण्यात येणार असून अनुदान वजा जाता उर्वरित 50 टक्के वसूल करावयाची रक्कम गट स्तरावर बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल करून पुरवठा संस्थेचे नावे डी.डी / धनादेश काढून कृषी विकास कार्यालयास पाठविण्यात यावा. तुर बियाण्यांच्या 2 किलो बॅग साठी पूर्ण दर रुपये 360 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50% अनुदान रुपये 80 इतके आहे.
तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रुपये 180 इतकी आहे. मूग बियाण्यांच्या 2 किलो बॅग साठी पूर्ण दर रुपये 390 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रुपये 195 इतकी आहे.
तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रुपये 195 इतकी आहे. उडीद बियाण्याच्या 2 किलो बॅग साठी पूर्ण दर रुपये 380 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रुपये 190 इतकी आहे.
तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रुपये 190 इतकी आहे. तर भुईमूग बियाण्याच्या 20 किलो बॅग साठी पूर्ण दर रुपये 2 हजार 280 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रुपये 1 हजार 140 इतकी आहे.
तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रुपये 1140 इतकी आहे. तूर, मूग, उडीद बियाण्यांसाठी पुरवठादार संस्था महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. नाशिक ही असून भुईमूग बियाण्यांसाठी पुरवठादार संस्था राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्या नाशिक ही आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |