Bhimashankar Hapta 2025 अवसरी: येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम 2025-26 मध्ये गाळप होणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन 3100 देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhimashankar Hapta 2025 पहिल्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार, सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ!!
Bhimashankar Hapta 2025 गळीत हंगाम सन 2025-26 चे धोरण ठरविण्यासाठी 25 सप्टेंबर 2025 झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाचे सरासरी 12 टक्के साखर उताऱ्यानुसार निव्वळ एफआरपी 3272.14 प्रति मे टन येत आहे.

Bhimashankar Hapta 2025 निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी 3100 रुपये प्र. मे. टन पंधरवडा बिलाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.
ऐच्छिक पद्धतीने वसुली: Bhimashankar Hapta 2025
उर्वरित रक्कम रु. 172.14 प्र. मे. टन देखील निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे.
तथापि शासनाचे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार वसुली सक्तीची न करता संमतीपत्र घेऊन ऐच्छिक पद्धतीने करणेबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे.
त्यामुळे ऊस पेमेंट मधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही याबाबत संबधितांनी सोसायटी व बँकेस कळवणे आवश्यक आहे.
तरी ऊस उत्पादकांनी आपला उत्पादित केलेला ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |