Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरणाची गरज:
गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या हे पाळीव प्राणी जातीच्या काही रोगांमुळे (उदा. घटसर्प, फऱ्या, फाशी व अंतरविषार) यामुळे तडकाफडकी मारतात. या रोगाची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. काही रोगांमध्ये जनावरे सहजा मृत्यूमुखी पडत नाहीत, परंतु जनावरे अनुत्पादन होतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता घडते परिणामी पशुपालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होते.

Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरणाचे फायदे:
लसीकरणामुळे जनावरांचे स्वास्थ्य व त्यांचे उत्पादकता वाढण्यास मदत होते.
रोग आधारित विशिष्ट लसीकरणामुळे घटसर्प, फऱ्या, अंतरविषार इत्यादी. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास सहज शक्य होते.
जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते.
कृषी व्यापारातील संधी व आव्हाने!!
Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरण करताना घ्यावयाची काळजी:
- आजारी जनावरांना शक्यतो लसीकरण करू नये.
- लसीकरण हे शक्यतो सकाळी थंड वेळेत करावे.
- जनावरांना दिले जाणारी लसी चांगल्या नामांकित कंपनीचे असावी.
- लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याचे तारीख पाहून घ्यावी व त्या लसीचा नंबर नोंदवून ठेवावा.
- लसीची मात्रा लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना या उत्पादन कंपनीच्या सूचनानुसार कराव्यात.
- फोडलेल्या बाटलीतील लस तसेच साठवून पुन्हा वापरू नये.

- लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यात उकळून निर्जंतुक करून घ्यावी किंवा नवीन सुई वापरावी.
- लसीची साठवणूक व वाहतूक ही चांगल्या शीत पेट्यांमधून करावी.
- दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून देऊ नये, लसीचा स्रोत बॅच नंबर व कालबाह्य दिनांक जपून ठेवावा.
गाई म्हशीतील लसीकरणाचा तक्ता:
रोग /आजार | लसीकरणाची वेळ |
घटसर्प | एप्रिल-मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. (संकरित गाई व म्हशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी) |
फऱ्या | एप्रिल-मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. |
फाशी | मे महिन्यात वर्षातून एक वेळेस (रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच) |
लाळ्या व खुरकत | वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात. |

म्हशीला लसीकरण करताना शेळ्या मेंढ्यांतील लसीकरणाचा तक्ता:
रोग /आजार | लसीकरणाची वेळ |
काळपुळी | वर्षातून एकदा फेब्रुवारीत द्यावी. (रोगग्रस्त भागात) |
घटसर्प | वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. |
अंतरविषार | वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. (पुढील दोन मात्रा 15 दिवसांच्या अंतराने) |
लाळ्या व खुरकत | वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्च मध्ये द्यावी. |
देवी | वर्षातून एकदा डिसेंबर मध्ये द्यावी. (गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये) |
फऱ्या | वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. |
Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरणाबाबत असणारे संभ्रम:
लसीकरण केल्याने जनावरातील दूध कमी होईल या भीतीने बरेच पशुपालक लसीकरण करण्याचे टाळतात. लस दिल्याने जनावरांना हलकासा ताप व तणाव येऊन दूध कमी होऊ शकते. परंतु हे तात्पुरते असून काही काळातच दूध पूर्ववत होते. पशुपालक गाभण जनावर गाभडेल या भीतीने लसीकरण टाळतात. मात्र, असे प्रकार क्वचितच कमकुवत व अशक्त जनावरांमध्ये घडतात.

Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरण केल्याने काही जनावरांना गाठी येतात परंतु ती गाठ काही काळच राहते बर्फाने शेकवल्यास गाठ जिरून जाते. गाठी येतात म्हणून लसीकरण टाळावे जनावरांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |