Bedana Bajarbhav 2025 तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्यास किलोला रेकॉर्ड ब्रेक 650 रुपये दर मिळाला.

गोपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी अडत दुकानात शेतकरी नागप्पा शरणाप्पा हाडगे (रा.बेळुडगी, ता.जत, जि.सांगली) यांच्या हिरव्या बेदाण्यास 651 रुपये दर मिळाला.
महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ कसा दिला जातो ? जाणून घ्या सविस्तर;
Bedana Bajarbhav 2025 सौद्यास खरेदीदार कौस्तुभ हिंगमिरे, पनू सारडा, जगन्नाथ घणेरे, सुनील हडदरे, विनीत बाफना, सतीश माळी, बबलू पाटील, सुदाम माळी, किरण बोडके, मनोज मालू, ओंकार पिंपळे, विठ्ठल पाटील, राहुल बाफना, खरेदीदार, व्यापारी महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक उपस्थित होते.

Bedana Bajarbhav 2025 सरासरी प्रति किलो दर
हिरवा बेदाणा | रु. 210 ते 651 |
पिवळा बेदाणा | रु. 180 ते 255 |
काळा बेदाणा | रु. 80 ते 150 |
” तासगाव बाजार समितीत उच्चांकी दर मिळत आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा. – युवराज पाटील सभापती “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |