Bedana Bajarbhav 2025 गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष आणि बेदाण्याच्या दरामध्ये सातत्याने पडझड होत होती. मात्र, यावेळी बेदाण्याचे उत्पन्न कमी झाल्यानं बेदाण्याला चढा भाव मिळू लागला आहे.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथील नवनाथ कोरडे या शेतकऱ्याच्या बेदाण्याला काल विक्रमी 651 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर महाराष्ट्रातला विक्रमी दर मानला जात आहे.
टेंभू-म्हैसाळ योजनेद्वारे माण व कोरडा नदीत कधी सोडणार पाणी ?
Bedana Bajarbhav 2025 ! द्राक्षाचे उत्पन्न जवळपास 50 टक्क्यांनी घटलं
यावर्षी द्राक्षाचे उत्पन्न जवळपास 50 टक्के घटल्याने बेदाणेही खूप कमी प्रमाणात तयार झाले आहेत. सर्वसाधारण गोल बेदाण्याला अडीचशे रुपयापर्यंतचा दर मिळत असून व्यवस्थित पद्धतीने निवडून आणलेल्या लांब बेदाण्याला विक्रमी भाव मिळू लागला आहे.

पंढरपूर बाजार समितीत नवनाथ कोरडे यांनी आणलेला बेदाणा हा जवळपास एक ते दीड इंच लांबीचा असून पूर्णपणे वाळलेला आणि अतिशय चांगला रंग असलेला या बेदाण्याला चक्क 651 रुपये प्रति किलो एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
बाजार समितीतील व्यापारी विशाल मर्दा यांच्याकडे कोरडे यांनी आपला बेदाणा विक्रीसाठी आणला होता. काल झालेल्या लिलावात सांगलीच्या सारडा या व्यापाऱ्यांनी कोरडे यांचा बेदाणा 651 रुपये एवढ्या विक्रमी दराने खरेदी केला आहे.
यावेळी बोलताना शेतकरी नवनाथ कोरडे यांनी बागेत संपूर्ण घरदार राबवत असल्याने इतका चांगला दर मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या वतीने नवनाथ कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.
Bedana Bajarbhav 2025 यावर्षी बेदाण्याचे उत्पन्न कमी…
शेतकऱ्यांनी प्रति एकर उत्पन्नापेक्षा कॉलिटीवर लक्ष दिल्यास आणि बेदाणा निवडताना ग्रेडिंग मशीन ऐवजी माणसांचा वापर केल्यास चांगल्या प्रतीचा बेदाणा निघू शकेल, अशी अपेक्षा व्यापारी विशाल मर्दा यांनी व्यक्त केली आहे.
तर यावर्षी बेदाण्याचे उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना या सीझनमध्ये अतिशय चांगले दर मिळतील, असे सांगताना आज भारतातही व्यापाऱ्यांकडे 25 टक्क्यांपेक्षा कमी बेदाणा असल्याने हा संपूर्ण सीजन शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळवून देणारा असेल, असे व्यापारी सारडा यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळं यावर्षी द्राक्ष आणि बेदाण्याला चांगले दर राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |