Banana Rate 2025 खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट झाली आहे. दर 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल वरून 2100 रुपये प्रति क्विंटल, असे दर्जेदार केळी मिळत आहेत. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच कुंभ मेळ्यासह महाशिवरात्री निमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसत आहे.

कुंभमेळा सुरू होताच केळी दरात मोठी सुधारणा झाली. कमाल दर 1300 रुपयांवरून 2300 प्रति क्विंटल पर्यंत काही दिवसात पोहोचले. डिसेंबर मध्ये खानदेशात केळीची आवक कमी असताना ही दरात मोठी घट झाली. ही सुधारणा टिकून आहे. परंतु मागील आठवड्याच्या अखेरीस दरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची घट झाली आहे. केळीचे किमान दर ही 1500 ते 1600 रुपयांवरून 1300 रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत.
उजनीतून 6000 हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा ?
सध्या बाजारात द्राक्ष चिकू यांचीही आवक सुरू आहे. कलिंगडाची देखील काढणी सुरू झाली आहे. याचा ही परिणाम केळी दरांवर झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ऊन तापू लागल्याने रसाळ फळांना उठाव आहे. केळीला कुंभ व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उत्तरे कडून मोठी मागणी होती.
Banana Rate 2025 खानदेशात केळी आवकेतही मागील पाच ते सहा दिवसात वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातही केळीची आवक वाढली असून, तेथील बऱ्हाण पुरातही रोज 30 ते 35 ट्रक (एक ट्रक 16 टन क्षमता) केळीची आवक होत आहे. खानदेशात रोज 40 ते 42 ट्रक (एक ट्रक 16 टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

उष्णता असल्याने केळीस उठाव मात्र आहे. परंतु आवकेत या आठवड्याच्या अखेरीस आणखी वाढ होईल. खानदेशातून केळीची निर्यात हे सुरू आहे. निर्यातीच्या केळीस प्रति क्विंटल 2300 ते 2350 रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.रोज चार ते पाच कंटेनर (एक कंटेनर 20 क्षमता) केळीची पाठवणूक खानदेशातून विविध निर्यात दार कंपन्या परदेशात करीत आहेत. केळीचे आवक रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, जामनेर या भागात आहे.धुळ्यातील चिरपुरातूनही केळी आवकेत वाढ होत आहे.
इतर शेती विषयक माहितीसाठी | येथे क्लिक करा |