‘मनरेगा’तून केळी लागवडीला अनुदान; वाचा तीन टप्प्यात शेतकऱ्यांना ‘किती’ मिळणार पैसे! Banana Farming 2025

Banana Farming 2025 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मनरेगा केळी लागवडीसाठी हेक्टरी 2 लाख 89 हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. किमान पाच गुंठे तर कमाल पाच एकर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Banana Farming 2025

अनेक शेतकरी अलीकडे शेतीकडे वळाले आहे. त्यातच आता राज्य शासनाच्या वतीने फळ-पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळ-पिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जून मध्ये; पण ‘हे’ कराल तरच मिळतील पैसे!

ज्या अनुषंगाने चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून केळी कडे पाहिले जाते, त्यामुळे या पिकांचा समावेश यामध्ये केला आहे.

WhatsApp Group Join Now

Banana Farming 2025 योजनेचे ‘हे’ आहेत निकष

लाभार्थीच्या नावे किमान 5 गुंठे तर कमाल 5 एकर जमिनीपर्यंत अनुदान मिळेल.

जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास कुळाची संमती गरजेची अनुसूचित जाती / जमाती / दारिद्र्यरेषेखाली / इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य असेल.

Banana Farming 2025 पहिल्या वर्षी मिळणार 1.17 लाखांचे अनुदान

WhatsApp Group Join Now

योजनेमध्ये केळीसाठी पहिल्या वर्षी जमीन तयार करणे. रोपे लागण, अंतर मशागत व पिक संरक्षणासाठी एक लाख 97 हजार 724 दुसऱ्या वर्षात भरणी खते मशागतीसाठी 49 हजार 796 तर तिसऱ्या वर्षी खते पाणी व पिक संरक्षणासाठी 41 हजार आठशे रुपये असे एकत्रित दोन लाख 89 हजार 220 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेत सहभागी होऊन इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग, तसेच गाव पातळीवर कृषी सहायकांशी संपर्क साधावा. – जालिंदर पांगरे, जिल्हाध्यक्ष, कृषी अधिकारी, कोल्हापूर.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment