सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…Banana Export Update 2025

Banana Export Update 2025 अकलूज : केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे खासदार. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माहिती दिली आहे.

Banana Export Update 2025

नवी दिल्ली येथे 3 डिसेंबर 2024 रोजी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी केली होती.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघटना आणि निर्यातदरांना पायाभूत सुविधा उभारणीस, तसेच केळी व इतर फळे भाज्यांची गुणवत्ता तपासणी तसेच विक्रीनंतर व्यवस्थापन करण्यासाठी इनहाऊस प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.

केंद्राच्या आर्थिक साहाय्य योजनेअंतर्गत तीन एकत्रित पॅक हाऊस आधीच स्थापन झाले असून, आणखी काही प्रकल्प प्रक्रियेत आहेत.

जीएपी प्रमाणपत्र-अपेडाने देशभरातील विविध उत्पादने ओळखून त्यांना Global Good Agriculture Practices प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्रीमियम निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन उद्यापासून सुरू होणार;

58 टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून…Banana Export Update 2025

सोलापूर जिल्ह्यात सुमारे 19 हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी 58 टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

“सोलापूर जिल्ह्याला केळी निर्यात कलस्टर म्हणून मान्यता दिली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल आणि जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.”

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment