Banana Export 2025 भारत-पाक युद्धामुळे देशातील विविध भागातून होणाऱ्या शेतमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम झाला आहे. देशातच नव्हे तर विदेशात ही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. येथील केळी समुद्रमार्ग जहाजाने दुबईला पाठविण्यात येते. त्यानंतर ती इराक, इराण, ओमान आदि देशांत निर्यात होते.

परंतु मागील काही दिवसापासून केळीचे निर्यात बंद असल्याने केळीच्या दरात घसरण झाली आहे. यांना मालेगाव दाभड व अर्धापूर या तीन मंडळात मोठ्या प्रमाणात केळीचे लागवड झाली आहे. येथील केळी आकाराने मोठी लांब आणि चवीला गोड आहे. त्यामुळे या केळीला विदेशात मागणी आहे. मात्र, भारत पाकिस्तान युद्धामुळे केळीचे निर्यात ठप्प झाली आहे.
औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान! जाणून घ्या सविस्तर;
Banana Export 2025 परिसरात एका महिन्यापासून केळीच्या काढण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला 1600 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला होता. आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परिस्थिती केळीला 1200 ते 1300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Banana Export 2025 विदेशात जाणाऱ्या केळीला 2500 भाव
मागील वर्षात मोठ्या प्रमाणात विदेशात केळीचे निर्यात झाली होती. नांदेड येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने लाखो टन केळीची निर्यात करण्यात आली होती.
बाहेर देशात जाणाऱ्या केळीला 2400 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.
सध्या भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदिगड, श्रीनगर येथे पाठवले जात आहेत. तसेच राज्यातील अनेक भागात केळीचे निर्यात होत आहे.
शेतकऱ्यांना आशा आहे की पुढील काळात अशी परिस्थिती राहणार नाही. विदेशात केळीचे निर्यात सुरळीत सुरू होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |