केळीसाठी ठिबक सिंचनातून पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन!! Banana Crop 2025

Banana Crop 2025 दर्जेदार केळी उत्पादन मिळविण्यासाठी लागणाऱ्या घटकांमध्ये पाणी व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन यांचा फार मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रात केळीचे 90 टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आलेले आहे.

Banana Crop 2025

Banana Crop 2025 म्हणजेच पाण्याच्या बाबतीत आपण योग्य नियोजन व व्यवस्थापन केलेले आहे. त्याचबरोबर जर पोषण अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केळीच्या वाढीच्या अवस्थेनुसार केला तर उत्पादनात वाढ करता येईल त्यासाठी खतांच्या व्यवस्थापनामध्ये फर्टिगेशन हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे आहे.

उसाच्या पहिल्या उचलीचा आकडा आज ठरणार; प्रतिटन किमान 3600 रुपये मागणीची शक्यता!!

Banana Crop 2025 ठिबक सिंचनातून अन्नद्रव्यांचे योग्य व आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी खते पिकांच्या मुळांशी गरजेनुसार योग्य त्या प्रमाणात परिणामकारकरीत्या देणे यास शास्त्रीय भाषेत फर्टिगेशन असे म्हणतात.

WhatsApp Group Join Now

केळीसाठी पाणी व्यवस्थापन: Banana Crop 2025

केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मिमी पाणी लागते केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून ठिबक सिंचनासाठी ड्रीपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्य असते. बाष्पीभवनाचा वेग जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीच्या पाण्याची गरज अवलंबून असते.

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास केळी पिकाची पाणी वापर क्षमता आणि पाणी उत्पादकता वाढविण्यासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीत केळी लागवडीनंतर 1 ते 5 महिन्यांपर्यंत 60 टक्के बाष्पपर्णोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी आणि 9 ते 12 महिन्यांपर्यंत 80 टक्के बाष्पपर्णोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आले आहे.

केळीसाठी पाण्याची गरज: (लि. प्रति झाड प्रति दिवस)

मृगबाग केळी
महिना
पाण्याची गरज
लि./ झाड
कांदेबाग केळी
महिना
पाण्याची गरज
लि./ झाड
जून 06ऑक्टोबर04-06
जुलै05नोव्हेंबर04
ऑगस्ट 06 डिसेंबर06
सप्टेंबर08जानेवारी08-10
ऑक्टोबर10-12फेब्रुवारी10-12
नोव्हेंबर10मार्च 16-18
डिसेंबर10एप्रिल18-20
जानेवारी10मे22
फेब्रुवारी12जून 12
मार्च 16-18जुलै14
एप्रिल20-22ऑगस्ट 14-16
मे25-28सप्टेंबर14-16

WhatsApp Group Join Now

वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार व पीक वाढीच्या अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.

केळीसाठी फर्टीगेशन: Banana Crop 2025

केळीसाठी खते देण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत

  • ठिबक सिंचनातून खते पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर दिली जात असल्याने ती मुळांच्या कार्यक्षेत्रातच दिली जातात. त्यामुळे त्यांच्या स्थिरीकरणास वाव राहत नाही आणि त्यांचे शोषण लगेच होऊन पिकांची वाढ झपाट्याने होते.
  • पीक वाढीच्या अवस्थेनुसार तेवढीच एक किंवा अनेक अन्नद्रव्य पिकांच्या मुळाजवळ देणे शक्य होते.
  • मृदा द्रावणात अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखणे शक्य होते.
  • जमिनीचे आरोग्य अबाधित राखून उत्पादन क्षमता वाढवता येते.
  • तणांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो त्यामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.
  • पिकाची पक्वता लवकर होते.
  • ठिबक सिंचनातून खते दिल्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होते.
  • पीक उत्पादनात भरीव वाढ होते.

Banana Crop 2025 विद्राव्य खतांच्या किंमतीचा विचार करता सर्व सामान्य केळी उत्पादकाला कमी खर्चात ठिबक सिंचनातून खतांचा वापर करता यावा यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र जळगाव येथून सण 2008 व 2015 मध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त आढावा बैठकीत पुढील प्रमाणे शिफारस करण्यात आलेली आहे.

केळीच्या अधिक उत्पादनासाठी मध्यम काळ्या जमिनीत नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारसीत मात्रेच्या 75 टक्के मात्रा (150 ग्रॅम नत्र व 150 ग्रॅम पालाश प्रति झाड) ठिबक सिंचनातून देतांना 1 ते 16 व्या आठवड्यापर्यंत 3 ग्रॅम नत्र व 2 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा 17 ते 28 आठवड्यापर्यंत 6 ग्रॅम नत्र व 5 ग्रॅम पालाश प्रति झाड आठवडा 29 ते 40 आठवड्यापर्यंत 2.5 ग्रॅम नत्र व 4 ग्रॅम पालाश प्रति झाड आठवडा तर 41 ते 44 आठवड्यापर्यंत 3 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा वापरण्याची शिफारस करण्यात अली आहे.

Banana Crop 2025 तसेच स्फुरदाची 60 ग्रॅम प्रति झाड हि मात्रा 3.75 ग्रॅम प्रति आठवडा या प्रमाणे 1 ते 16 आठवड्यापर्यंत मोनो अमोनियम फॉस्फेटद्वारे (12:61:00) विभागून शिफारसीत नत्र व पालाशच्या मात्रेसह ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात अली आहे. 10 किलो शेणखत प्रति झाड केळी लागवडीच्या वेळेसच जमिनीतून द्यावे.

जिवाणू खते: ऍझोस्पिरिलम-25 ग्रॅम/ झाड व पी.एस.बी.-25 ग्रॅम / झाड केळी लागवडीच्या वेळी

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment