Banana Crop 2025 महाराष्ट्रात जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यात केळीची प्रामुख्याने लागवड केली जाते. महाराष्ट्राच्या एकूण केळी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होते. उत्पादनाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा, ठिबक सिंचनाचा, उतीसंवर्धित रोप लागवडीचा, सर्वकष वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते.

Banana Crop 2025 तथापि केळीवर पडणाऱ्या विषाणूजन्य रोगामुळे उत्पादनात घट होऊ शकते. रावेर व यावल तालुक्यात विषाणूजन्य रोगाचे प्रमाण सन 2014 पासून वाढत आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही या रोगाचे प्रमाण वाढीस लागलेले आहे. संक्रमक हरितद्रव्य लोपणे व पर्णगुच्छ या 2 विषाणूजन्य रोगास केळीचे पीक बळी पडते, या रोगाची लक्षणे प्रसार व नियंत्रणाचे उपाय खालील प्रमाणे आहेत.
नवीन फळबाग लागवड पूर्वतयारी!!
Banana Crop 2025 संक्रमक हरितद्रव्य लोप:
नावाप्रमाणेच काकडी पिकावरील हा विषाणू केळीवर सुद्धा आढळतो. या विषाणूची जवळ जवळ 800 यजमान पिके आहेत. त्यात प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, मिरची व वेलवर्गीय काकडी भोपळा यांचा समावेश होतो. केळीवर या विषाणूचा प्राथमिक प्रसार रोगट कंद किंवा उतीसंवर्धित रोगट रोपे या मार्फत होतो व दुय्यम प्रसार मावा किडीच्या अनेक प्रजातीपासून होतो.

केळी लागवडीनंतर 2 ते 3 महिन्यात या रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीस पोंग्याच्या कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विहरीत पिवळसर पट्टे दिसतात. असे पट्टे संपूर्ण पानभर पसरलेले असतात. यानंतर येणारी पाने आकाराने निमुळती व अरुंद होऊन तलवारी सारखी दिसतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड असा आवाज येतो. पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील उती मरतात, व पाने फाटतात.
Banana Crop 2025 संक्रमक हरितद्रव्य लोप लक्षणे:
पर्णगुच्छ: पर्णगुच्छ या रोगाचे प्रमाण ऊतीसंवर्धित रोपे न वापरता कंदापासून लागवड केलेल्या बागेत जास्त असते. या रोगांमध्ये पानाच्या खालच्या बाजूस मुख्य व दुय्यम शिरांवर, देठावर गडद हिरव्या रंगाचे ठिपके व असमान लांबीच्या पिवळसर रेषा दिसून येतात. पाने आकाराने छोटी व अरुंद व उभट असतात. अशा पानांच्या कडा पिवळसर असतात. पाने कडक होऊन नवीन येणारे पान पोंग्यातून लवकर बाहेर पडत नाही.

नवीन फुटणाऱ्या पानांवरील अंतर कमी होऊन त्यांचा शीर्षस्थानी गुच्छ तयार होतो. पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात रोगाची लागवड झाल्यास त्याची वाढ खुंटते त्यांना फुले व फळे लागत नाही. प्रौढावस्थेत या रोगाची लागण झाल्यास लागणारे फळे वाकडे होऊन विकृत दिसतात. या रोगाचाही प्रसार रोगट कंद व मावा किडीपासून होतो.
Banana Crop 2025व्यवस्थापन:
विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी रासायनिक उपाय नसल्याने त्यांच्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रोगाची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लागवडीसाठी वापरण्यात येणारे कंद निरोगी बागेतीलच निवडावेत उतीसंवर्धित रोपांचा वापर करताना नोंदणीकृत प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली जोमदार व अनुवंशिक शुद्धतेची रोपे लावावीत. परप्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणून लागवड करू नये. केळीत काकडी वर्गीय पिके भेंडी, मका, टोमॅटो, वांगी, गवार, घेवडा ही अंतरपिके घेऊ नयेत.
बाग दोन मुक्त ठेवावी बागेतील प्रादुर्भावग्रस्त झाडे पिले प्राथमिक अवस्थेतच शोधून काढून त्याचा संपूर्ण नायनाट करावा. मावा या वाहक किडीच्या नियंत्रणासाठी कारटॅप हायड्रोक्लोराइड 4: दाणेदार हे कीटकनाशक प्रत्येक झाडास 25 ग्रॅम या प्रमाणात 20 दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर 65 व 165 दिवसांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या वेळी हेच कीटकनाशक 12.5 ग्रॅम या प्रमाणात प्रत्येक पोंग्यात टाकावे किंवा व्हर्टीसीलियम लेकॅनी 20 ग्रॅम किंवा 5 मिली यांची लागवड नंतर 25, 65 व 165 दिवसांनी फवारणी करावी.

Banana Crop 2025 विषाणूजन्य रोगांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकामध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकांवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण करून नुकसान टाळणे गरजेचे आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |