केळीवरील मर रोग, एक भविष्यकालीन आपत्ती!! Banana Blight, a Future Disaster 2025

Banana Blight, a Future Disaster 2025 केळी पिकावर आढळणारा मररोग अत्यंत घातक असून त्यांचा प्रसार सर्वत्र झपाट्याने वाढत आहे हा रोग पणामा मर्या लोकप्रिय नावाने ओळखला जातो. युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. भारतात प्रथमच पश्चिम बंगाल येथे 1911 मध्ये हा रोग आढळून आला. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यात हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो.

Banana Blight, a Future Disaster 2025

Banana Blight, a Future Disaster 2025 तथापि बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील हा रोग वेगाने पसरत आहे. मालभोग, नागजनगोडं रसाबळे, अप्रितपाणी, सिल्क, कानयाळी, मोनयन व विरूपाक्षी हे वाण या रोगास बळी पडतात या बुरशीची उष्णकटिबंधीय प्रजात-4 अत्यंत विनाशकारी आहे.

नवीन फळबागेचे नियोजन!!

Banana Blight, a Future Disaster 2025 केळीचे बारामाही पीक व जमिनीत बुरशीचे तंग धरून राहण्याची 30 वर्षापेक्षा जास्त क्षमता तसेच या बुरशीचे अलौंगिक पद्धतीने असंख्य प्रमाणात निर्माण होणारे बीजाणू यामुळे रोगाचे प्रसार थोपवून त्यांचे नियंत्रण करणे कठीण आहे. रामबाण उपायाचा व रोग प्रतिकारक वाणांचा अभाव यामुळे रोगाची प्रखरता अधिक जाणवते. महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी हा लेख प्रसारित करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now

Banana Blight, a Future Disaster 2025 रोगाचे लक्षणे

या रोगाची सुरुवात लागवडीनंतर 4 ते 5 महिन्याने होते, झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते फिकट पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. 1/3 आठवड्यात पिवळट होतात. पाने संपूर्ण वाळतात व गळून पडतात. नवीन येणारी पाने चुरगळलेली फिकट असतात.

खोडाच्या आतील भागात लालसर किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडतात, हे चट्टे नंतर काळपट होतात. अन्यद्रव्य वाहक नलिका मरतात, बाहेरून अशा क्रमाने चट्टे पडत जाऊन तेथील अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात जाड बुडके राहते अति तीव्र लक्षणात झाड मरून जाते.

Banana Blight, a Future Disaster 2025 रोगाचा प्रसार

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगट कंद, संसर्गित माती, बागेतील रोगट झाडांचे अवशेष, रोगट बागेत वापरलेली अवजारे, वाहने, करणाऱ्या गुरांचे खूर, रोगग्रस्त बागेतून वाहणारे पाणी, बागेत वाढणारी दगडी, तसेच दुधाणी तण, सूत्रकृमी तसेच केळीवरील कंद पोखरणारे सोंडे, व खोड पोखरणारी अळी या रोगाचे वाहक असतात.

WhatsApp Group Join Now

Banana Blight, a Future Disaster 2025 अनुकूल बाबी

  • लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर.
  • केळी एक पीक पद्धतीचा विस्तृत प्रमाणावर वापर.
  • केळी पिकाचा वारंवार खोडवा घेणे.
  • जमिनीचे 30 अंश सेल्सियस तापमान कमी आद्रता.
  • जमिनीतील पाण्याचा अयोग्य निचरा.
  • रोगास बळी पडणाऱ्या स्थानिक मानाचा वापर.
  • सुरुवातीस पाण्याचा ताण व त्यानंतर मोठ्या प्रमाणात पडणारा सतत धर पाऊस.
  • वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस व त्यामुळे जमिनीत साठलेले पाणी.

Banana Blight, a Future Disaster 2025 नियंत्रणाचे उपाय

संसर्गरोध नियंत्रण नियमांची कडक अंमलबजावणी करून शेजारील राज्यातील कंद किंवा उतीसंवर्धित रोपे यांची लागवड करण्याचे काटेकोरपणे टाळावे.

खात्रीशीर व रोगमुक्त कंद किंवा उतीसंवर्धित रोपे लागवडीसाठी वापरावी.

हंगाम समताना बागेतील सर्व झाडांचे अवशेष गोळा करून पूर्णपणे नष्ट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.

बाग लावणे पूर्वी तागाचे हिरवळीचे पीक घ्यावे.

भात ऊस कांदा यांची एक दोन वेळा लागवड करून नंतर केळीचे पीक घ्यावे.

लागवडीपूर्वी शेतात प्रति झाडास 10 किलो याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत व त्यासोबत ट्रायकोडर्मा हे जैविक नियंत्रक 100 ग्रॅम प्रती झाड वापरावे, रासायनिक खतांची शिफारस केलेलीच मात्रा वापरावी, अतिरिक्त नत्राचा वापर करू नये, बागेत पाणी साठू देऊ नये पाण्याचा उत्तम निचरा करावा.

लागवडीसाठी प्रादुर्भावग्रस्त बागेतले कंद मनुवे वापरू नयेत.

केळी बागेस ठिबक सिंचनाद्वारे योग्य प्रमाणात पाणी घ्यावे.

लागवडीनंतर 3 व 5 महिन्यांनी प्रति झाड 40 ग्रॅम कार्ब्युरॉन बुंध्यानभोवती टाकून सोंड किड्यांचे नियंत्रण करावे.

बागेतील मररोगग्रस्त झाडे निवडून त्यांची दूर अंतरावर विल्हेवाट लावावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment