Azolla Production and its Economics 2025 भारतातील बहुसंख्य शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात या व्यवसायात दूध उत्पादनाला अन्यसाधारण महत्त्व आहे. दूध व मास या गोष्टींना आजच्या घडीला खूप मागणी असल्यामुळे पशुसंवर्धन हे एक शेतकऱ्यांना फायदेशीर उत्पन्न देणारे स्त्रोत आहे. चाराटंचाईच्या काळात अझोलाचा वापर जनावरांच्या आहारात केल्याने पशुखाद्य पौष्टिक बनते.

अझोला मध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामधील प्रथिने, तंतुमय पदार्थ, आणि लिग्निनचे प्रमाण कमी असल्यामुळे अझोला जनावरांना सहज बसतो. अझोलाच्या वापराचे खूपच फायदे आहेत आणि अझोला बेड बनवायला खर्चही कमी येतो. त्यातून येणारे उत्पन्न हे पशुपालकाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
हळद पिकाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन!!
Azolla Production and its Economics 2025 अझोला हे उथळ पाण्यावर तरंगणारे नेचे वर्गीय छोटी पाने असलेले आणि जास्त संख्येने वेगाने वाढणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जनावरांना सहजपणे पचणारी असून ती खाद्यात वापरल्यामुळे दूध उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.

अझोला बेड तयार करण्याची पद्धत:Azolla Production and its Economics 2025
- शेडमध्ये 6 फूट लांब 3 फूट रुंद व 1 फूट खोल एवढ्या आकाराचा खड्डा करून खोदावा.
- या खड्ड्यात पूर्ण जातील अशा पद्धतीने प्लास्टिक शीट पसरवून कडेने व्यवस्थित दाबून ठेवावा.
- प्लास्टिक शीट वर 10 ते 15 किलो चाळलेली माती पसरवावी.
- तसेच 10 लिटर पाण्यात 2 किलो गाईचे शेण (2 दिवसापूर्वीचे) व 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून शीटवर टाकावे.
- खड्ड्यात 10 सेंटिमीटर खोल एवढे पाणी सोडावे.
- पाण्यात 500 ग्रॅम ते 1 किलो ताजे अझोलाचे मातृबीज पसरवावे त्यावर लगेच थोडे पाणी शिंपडावे त्यामुळे अझोला लगेच सरळ उभा राहतो.
- अझोलाच्या जलद वाढीसाठी 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट 1 किलो शेण यांचे मिश्रण 5 दिवसातून एकदा वापरल्यास योग्य राहील.
- अझोला ची 10 ते 15 दिवसात पूर्ण वाढ होते.
- एका खड्ड्यातून 500 ते 600 ग्रॅम अझोला खाद्य म्हणून वापरता येतो.

अझोला बेड तयार करण्यासाठी लागणारा खर्च:
खर्चाचे विवरण | प्रमाण | अंदाजे रक्कम (रु.) |
प्लास्टिक शीट | 9*6 | 50 |
चाळलेली माती | 15 किलो | 15 |
गाईचे शेण | 10 किलो | 30 |
सुपर फॉस्फेट | 250 ग्रॅम | 2 |
अझोलाचे मातृबीज | 1 किलो ग्रॅम | 100 |
कामगार | 2 | 500 |
एकूण | 697 |
अझोला बेड पासून मिळणारे उत्पन्न: Azolla Production and its Economics 2025
एका बेडपासून दर 10 ते 15 दिवसांनी एक काढणी याप्रमाणे 10 काढणी घेऊ शकतो एका काढणीला सरासरी 5 किलो उत्पन्न मिळते याप्रमाणे एका बेड पासून आपणास जवळपास 50 किलो अझोला उत्पन्न मिळते.
एका किलोस 100 रुपये दर मिळतो म्हणजेच आपणास एकूण 5000 रुपये मिळतात. याकरिता आपणास 700 रुपये खर्च येतो म्हणजेच जर आपण 50 किलो विकत घेण्याऐवजी घरी तयार केला तर आपणास 4300 फायदा होतो.
जनावरांच्या खाद्यात अझोला वापरावयाचे प्रमाण:
Azolla Production and its Economics 2025 गाय व म्हैस 1.5 ते 2 किलो ओझोला प्रति जनावर प्रति दिवस.
शेळी व मेंढी 300 ते 400 ग्रॅम ओझोला प्रति जनावर प्रति दिवस.
कोंबडी 20 ते 30 ग्रॅम ओझोला प्रति जनावर प्रति दिवस.

अझोला तयार करताना घ्यावयाची काळजी:
- Azolla Production and its Economics 2025 अझोला तयार करण्यासाठी थोड्याच सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्यामुळे ती जागा झाडाखाली किंवा शेड खाली सावलीत असावी.
- अझोलाच्या वाढीसाठी खड्ड्यातील पाण्याचे पातळीसारखे असावी.
- जर अझोलावर कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पूर्ण खड्डा मातीने बुजून घ्यावा. नवीन ठिकाणी खड्डा तयार करून अझोला वाढवावा.
- नायट्रोजनची कमतरता न होण्यासाठी 5 किलो माती 30 दिवसातून व 25 ते 30 टक्के पाणी 10 दिवसातून बदलावे आणि 5 ते 6 महिन्यानंतर एकदा ताजे अझोला मातृभेज बदलावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |