Avkali Pavus 2025 बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम होत आहे.

तसेच महाराष्ट्र ते ओडिसा पर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 10 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उजनीतून दररोज सुमारे 4200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणी साठा?
Avkali Pavus 2025 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रातही अवकाळीचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रभावामुळे शनिवारी नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमान अंशतः घट झाली. नागपूरला शुक्रवारी 41.8 अंशावर असलेल्या तापमान 1.2 अंशाने घटत 40.6 अंशावर आले.
Avkali Pavus 2025 मात्र, पारा सरासरीपेक्षा 2.1 अंशांनी अधिक असून, पारा घटला तरी उन्हाचा तडाखा कायम होता. या विदर्भात चंद्रपूरला सर्वाधिक 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
याशिवाय गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती येथील तापमानही 41 अंशांच्या वर होते. दिवसाचा पारा घटला तरी रात्रीच्या तापमानात अंशतः वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूरला अंश किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक किमान तापमान वर्धा 24.4 अंश, अमरावती 24.1 अंश आणि इतर जिल्ह्यात रात्रीचा 23 अंशावर होता.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |