औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे आणि पैशाची बचत करायची आहे मग वापरा ‘हे’ तंत्र! Aushdh Favarni 2025

Aushdh Favarni 2025 किणी : मजुरांची टंचाई व मजुरीच्या दिवसेंदिवस वाढते दर यामुळे शेती करणे अवघड बनत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

Aushdh Favarni 2025

Aushdh Favarni 2025 नव्याने विकसित झालेल्या ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी करू लागल्याने वेळेची व पैशाची बचत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे.

अकोल्यात सौर ऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत, वाचा सविस्तर;

वारणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठची जवळपास सर्वच शेती बागायती आहे. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्साहत गहू, हरभरा, भात, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला, फुलशेती, फळबाग लागवडीची शेती करत असतात.

WhatsApp Group Join Now

मात्र, गेले काही दिवस मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. यात मात करत नव तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित करण्यात आलेल्या ड्रोनच्या साह्याने पिकांवर औषध फवारणी करू लागल्याचे चित्र आहे.

सहाशे रुपयात केवळ अर्ध्या तासात एक एकराचे औषध फवारणी करून होऊ लागल्याने कमीत कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्रावर औषध फवारणी होत आहे.

विशेषतः मोठ्या उसावर ड्रोनच्या औषध फवारणी चांगल्या प्रकारे होत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विविध सहकारी संस्था व व्यक्तिगत ड्रोन भाडेतत्त्वावर बांधावर उपलब्ध होत असून, दिवसभरात एका ड्रोनने 15 ते 20 एकर क्षेत्रावर औषध फवारणी होते.

WhatsApp Group Join Now

सेवा संस्था, पाच ते दहा शेतकरी यांनी एकत्र येऊन ड्रोन खरेदी केल्यास औषध मारणे सोपे होणार असून ड्रोन भाड्यानेही देता येणार आहे. याचा लाभ घेण्याची गरज आहे.

Aushdh Favarni 2025 शासनाचे अनुदान

  • सहा ते नऊ लाख रुपये किंमत एका ड्रोनची आहे. 50 ड्रोन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. यासाठी शासनाकडून 40% अनुदानही दिले जाते.
  • तर कृषी पदवीधर असेल तर त्याला 50% अनुदान मिळते. दोन ला दहा लिटर औषधाचा पंप आहे. त्यातून एक एकर क्षेत्र पूर्ण होते.

Aushdh Favarni 2025 फवारणीचा दर कसा?

600 रुपयात एक एकरातील औषध फवारणी करून मिळू लागल्याने कमीत कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्रावर औषध फवारणी होत आहे.

केवळ अर्ध्या तासात एका एकरातील औषध फवारणी पूर्ण होते.

ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी केल्याने वेळेची बचत होऊन फवारणी चांगल्या दर्जाची होते; त्यामुळे शेतकरी अधिक संपत पसंती देत आहेत. – वैभव कुंभारे, शेतकरी, किणी “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment