अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत, शेतकऱ्यांच्या याद्या ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर अपलोड चे काम सुरू; Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025 गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त 56 हजार 748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजी च्या शासन निर्णयानुसार 71 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai 2025

WhatsApp Group Join Now

त्यासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या ‘ई-पंचनामा पोर्टल’ वर अपलोड करण्याचे काम शुक्रवार, 21 मार्चपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे.

वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी मंजूर’ नवीन शासन निर्णय वाचा सविस्तर; 

Ativrushti Nuksan Bharpai 2025 अतिवृष्टी जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापुर, बार्शीटाकळी, पातुर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात 56 हजार 700 शेतकऱ्यांचे 56 हजार 371 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तसेच जमीन खरडून व गेल्याने 48 शेतकऱ्यांचे 30 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले होते.

त्या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या महसूल वनविभागामार्फत 18 मार्च रोजी जारी करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील (Ativrushti Nuksan Bharpai 2025) अतिवृष्टी ग्रस्त 56 हजार 748 शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत देण्यासाठी 79 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला.

WhatsApp Group Join Now

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदत मंजूर करण्यात आली आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. – अजित कुंभार, जिल्हाधिकारी अकोला. “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment