Ativrushti Nuksan 2025 तासगाव शहरासह परिसरातील गावांना जोरदार गारपिटीने झोपडले. यावेळी सुमारे तीन इंचापेक्षा मोठा आकारांच्या दगडासारख्या गारा पडल्या.

इतक्या मोठ्या आकाराच्या गारा पहिल्यांदाच या परिसरात पडल्या. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
हरभऱ्याचे आजचे बाजार भाव काय आहे, वाचा सविस्तर;
Ativrushti Nuksan 2025 मंगळवारी दिवसभर उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर हवामानात बदल झाला. ढगाळी वातावरण दिसत होते.

दरम्यान, सात वाजल्यानंतर तासगाव शहरासह वासुंबे, कवठेएकंद, नागाव परिसरात वादळी वारे आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. तीन इंच आकाराच्या गारा पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
Ativrushti Nuksan 2025 सुरुवातीला पावसापेक्षा गारांचेच प्रमाण जास्त होते. इतक्या मोठ्या आकारांची गारपीट झाल्यामुळे वासुंबे, कवठेएकंद परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
Ativrushti Nuksan 2025 अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
आरग (ता. मिरज) येथे अंगावर वीज पडून उदय विठ्ठल माळी (वय 33, रा.अशोकनगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाईकवस्ती विजापूर रोड, आरग येथील शेत शिवारात मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. उदय माळी हे मंगळवारी शेतात कामानिमित्त गेले होते. यावेळी उदय माळी यांच्या अंगावर वीज पडणे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |