Army worm control गेल्या दोन वर्षापासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही प्रादुर्भाव या किडीचा दिसत आहे. किडीचे शास्त्रीय नाव Spodoptera frugiperda असे आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control ठेवणे गरजेचे आहे. ही एक बहुभक्षी कीड असून सुमारे 350 पेक्षा जास्त पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते.

या किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष, पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते. ती मादी पतंग साधारणपणे 1000-1500 हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर पोंग्यामध्ये घालते.
ओळखण्याच्या खुणा Army worm control :
त्यावर लोकरी केसाळ पूजक्यांचे आवरण घातले जाते. अंड्याचा रंग 12 तासानंतर गडद तपकिरी होतो. अंड्यातून साधारण 2-3 दिवसात अळी बाहेर पडते. अळीच्या सहा अवस्था असतात. अवस्थेनुसार अळीचा रंग बदलत जातो. लहान अळीच्या हिरव्या रंगाची आणि डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी रंग होतो. तर शेवटच्या अवस्थेत अळी चा शरीरावर गडद ठिपके दिसून येतात. तसेच डोक्यावर इंग्रजी वाय(Y) आकार स्पष्ट दिसून येतो.
पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोप अवस्थेचा काळ हा साधारण 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंत असू शकतो. अशा प्रकारे आळीच्या 10-12 पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात.
पूर्ण वाढलेली अळी 30 ते 35 मि.मी. असते. तर पतंगाच्या विस्तार 35 ते 40 मि.मी. इतका असतो.

नुकसानीचा प्रकार Army worm control :
- रोपाची पाने पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून आल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव आल्यास समजून नियंत्रणाचे उपाय योजावेत.
- तिसऱ्या अवस्थेतील अळी पोंग्यात शिरून पाने खाते.
- चौथ्या अवस्थेत छिद्र दिसतात.
- पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते.
- सहाव्या अवस्थेत अळी आधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. मक्याची पाने झडल्यासारखी दिसतात.
- या अळीच्या प्रादुर्भावामुळे 30 ते 60 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
शेतात निरीक्षण कसे करावे ?
- शेताचे दररोज निरीक्षण करताना बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू (W) आकारात चालावे.
- यावेळी प्रत्येक ओळीतील पाच अशी खूण 20 झाडे निवडावीत.
- पैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी.
- वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भाव असतील तर नुकसान पातळी 10 टक्के आहे असे समजावे.
- जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजावेत.

अमेरिकन लष्करी अळी Army worm control :
- शास्त्रीय नाव : Spodoptera frugiperda
- ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून, जून 2018 मध्ये भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळला.
- बहुभक्षीय कीड असून, 80 पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते.
- गवत वर्गीय पिके उदाहरणार्थ मका, मधु मका, ज्वारी ही आवडीची. सोबतच हराळी, शिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वाटाणा, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू यावर वारंवार प्रादुर्भाव होतो.
नुकसानीची सुरुवात Army worm control :
i) या किडीचा उपद्रव हंगामाच्या सुरुवातीस, बांधावरील गवतावर आढळून येतो. बांधावरील गवत फस्त केल्यानंतर अळ्या मुख्य पिकाकडे वळतात. Army worm control
ii)दिवसा त्या जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन पाणी कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात.
iii)या किडीचा रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात आणि एकही रोग शिल्लक राहत नाही. या अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे पिकावर तुटून पडतात.
iv)एका शेतातील अन्नसाठा संपल्यानंतर अळ्या हजारोंच्या संख्येने शेजारच्या शेतात जातात. या किडीच्या अळ्या एखाद्या लष्करासारखा पिकावर सामूहिक हल्ला करतात व पीक फस्त करतात म्हणून या किडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.
v)या आळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते.
vi)हवेतील आद्रता 75 टक्क्यांपेक्षा जास्त कमी, सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.
मल्चिंग पेपर टाकून भाजीपाला करायचा आहे ? मल्चिंग करण्याचे फायदे खर्च आणि अनुदान
एकात्मिक कीड व्यवस्थापन Army worm control
1) पाऊस पडण्याआधी खोल नांगरट. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मनात मरून जाते.
2)आंतरपीक म्हणून ज्वारी + मग + उडीद या पद्धतीचा वापर करावा.
3)पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.
4)सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी.
5)गावातील बहुतांशी शेतकऱ्यांना एकाच वेळी पेरणीचे नियोजन करावे. त्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
6)मका पिका भोवती म्हणून नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळी लावावे. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (5% )किंवा जी अझाडिरेक्टिन (1500 पीपीएम) 50 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
7)मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
8)पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
9)मक्यावरील लष्करी आळी साठी कामगंध सापळे वापरावेत. (सर्वेक्षणासाठी एकरी 5 नियंत्रणासाठी एकरी 15) तसेच प्रकाश सापळे लावावेत.
10)किडीचा प्रादुर्भाव दिसून येतात. पोह्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी. त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.
11)प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम (नोमुरिया) रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली 75 ग्रॅम प्रती 15 लीटर पाण्यात मिसळून सकाळी 11वाजण्यापूर्वी अथवा सायंकाळी 4 वाजलेनंतर फवारणी करावी.
12)ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) 1.5 लाख अंडी हेक्टरी सोडावेत.

आर्थिक नुकसान पातळी :
- प्रति काम गंध सापळ्यावर 2 ते 3 पतंग दिसणे.
- किडेने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढीलपैकी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर Army worm control
फवारणी प्रमाण- (प्रति 15 लिटर पाण्यातून)
1) इमामेक्टीन बेन्झोएट (0.5 % एस.जी.) (प्रॉक्लेम, ई एम-1)10 ग्रॅम किंवा
2) स्पिनोटोरम (11.7 % एस.सी.) (डेलिगेट) 6 मिलि किंवा
3) क्लोरॲन्टानिलीप्रोल (18.5 % एस.सी.) (कोराजन) 5 ते 6 मिलि किंवा
4) क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (9.3 %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (4.6 % झेड.सी) (अम्प्लिगो) 8 मिलि
आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी (किटकनाशक बदलून) 15 दिवसांच्या अंतराने करावी.
अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा :
टीप
रासायनिक कीटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करू नये.
एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये.