आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा शुल्काबाबत शासनाचा नवा जीआर, वाचा सविस्तर; Aple Seva Kendra 2025

Aple Seva Kendra 2025 राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करून त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या नागरिकांना भरपूर देण्याचे संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे ,याच बद्दलची सविस्तर माहिती या लेखातून पाहूयात….

Aple Seva Kendra 2025

राज्यामध्ये 2018 च्या जीआर नुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. यामध्ये काही बदल करून आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कमीत कमी दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने होणारे डिजिटायझेशन नागरिकांना सेवा सुविधांची असलेली आवश्यकता ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी विधानसभेत ‘या’ नव्या घोषणा शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा; 

Aple Seva Kendra 2025 ज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कमीत कमी दोन आपले सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 05 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कमीत कमी चार केंद्र स्थापन करता येतील. तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बृह मुंबई महानगरपालिकांसाठी 25 हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, इतर महानगरपालिका व नगरपरिषदसाठी दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, याचबरोबर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करता येतील. मात्र, लोकसंख्या जर 5000 पेक्षा जास्त असेल तर अशा नगर पंचायतीला किमान चार केंद्र स्थापन करता येणार आहेत.

WhatsApp Group Join Now

Aple Seva Kendra 2025 कसे असेल सेवा शुल्क!

  • या निकषांमध्ये वेळोवेळी बदल करता येतील. त्याचबरोबर हे सेवा केंद्र स्थापन केल्यानंतर या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा असतील, त्या सेवांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
  • ज्यामध्ये प्रत्येक सेवेसाठी 50 रुपये शुल्क आकारला जाईल. तसेच 05 टक्के अर्थात अडीच रुपयांचा वाटा हा राज्यसेतू केंद्राचा असणार आहे.
  • यानंतर 10 टक्के वाटा हा जिल्हा सेतू केंद्राचा असणार आहे आणि 20 टक्के वाटा हा महाआयटीचा असणार आहे. उर्वरित 65 टक्के 32.50 अर्थात रुपये हे आपले सरकार सेवा केंद्राच्या चालकाला मिळणार आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment