Aple Sarker Portal 2025 पुणे : राज्य सरकारने सर्व विभागांनी त्यांच्या व त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालये, मंडळ, महामंडळ, प्राधिकरणे, कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्था, विद्यापीठे आदींच्या सर्व सेवा आता केवळ ऑनलाइनच नव्हे, तर आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या ऑनलाईन असलेल्या मात्र, आपले सरकार पोर्टलवर नसलेल्या 138 सेवा 31 मे पर्यंत विभागांच्या 306 ऑफलाईन सेवा आपले सरकार पोर्टलवर 15 ऑगस्ट पूर्वी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग !
Aple Sarker Portal 2025 या सेवा ऑनलाईन करण्यास निर्धारित कालावधीनंतर अयशस्वी ठरल्यास विभाग प्रमुखांच्या वेतनातून प्रतिसेवा प्रतिदिन 1000 दंड वसूल करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. सर्व संबंधित विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने मुदतीत सर्व सेवा द्याव्या लागतील.

Aple Sarker Portal 2025 सद्य:स्थितीत ऑफलाईन उपलब्ध
- सध्या या विभागांच्या अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण 1027 सेवांपैकी एकूण 138 सेवा विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत, मात्र आपले सरकार पोर्टलवर त्या उपलब्ध नाहीत.
- अशा सर्व सेवा 31 मे पूर्वी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात याव्यात. विभागाच्या अधिसूचित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत ऑफलाईन उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आपले सरकार पोर्टलवर 15 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन उपलब्ध कराव्यात.
- सर्व मंत्रालयाने विभागांनी त्यांच्या व त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व क्षत्रिय कार्यालय मंडळ, महामंडळ, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्था, विद्यापीठे आदींच्या सर्व सेवा एक महिन्यात अधिसूचित कराव्यात.
- अशा अधिसूचित केलेल्या सर्व सेवा 15 सप्टेंबर पूर्वी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात.
Aple Sarker Portal 2025 ऑनलाईन सेवा उपलब्ध करून द्या
- राज्यामध्ये 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झाला आहे. मात्र, या अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या अनेक सेवा नागरिकांना ऑफलाईनच देण्यात येत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
- ऑफलाइन सेवा खेळत असल्यामुळे नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कायद्याचा हेतू सफल होत नाही.
- सरकारी यंत्रणेमार्फत अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम पद्धतीने सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने सर्व मंत्रालयांनी विभाग व त्यांच्या संलग्न कार्यालयांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
- त्यानुसार या विभागांच्या पोर्टलवरील ऑनलाइन सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहेत.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |