केळी बागेतील टरबूज आंतरपिकातून एकरी दीड लाखाचा उत्पन्न, वाचा सविस्तर…Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025 भंडारा : नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती नसल्याचे शक्य अभ्यासून एका शेतीनिष्ठ शेतकऱ्यांने सिद्ध करून दाखवले आहे. साडे सहा एकर बागेत 4 एकरात केळीचे तर दोन एकरात पपईची लागवड केली आहे. या सहा एकरात आंतरपीक म्हणून टरबूज लावले आहेत. टरबूजच्या उत्पादनातून प्रति एकर दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाहून घेतले आहे. असा हा परिवर्तनशील प्रेरणादायी शेतकरी लाखणी तालुक्यातील काल कोलारी पळसगाव येथील आहे.

Antrpik Sheti 2025

मोरेश्वर खुशाल सिंगनजुडे या शेतकऱ्याचे नाव आहे. तसेच सहा एकरात टरबुजाचे आंतरपीक लागवडीखाली आहे. 4 एकरात केळी व 2 एकरात पपई केळी व पपई हे मुख्य पीक असून, त्यात टरबूज हे आंतरपीक आहे. सरासरी टरबूज खर्च वजा जाता 4 ते 4.5 लाख रुपयांचा नफा सोडला. चार एकर केळी व दोन एकरात पपई वीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सोडणार आहे.

गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने मोरेश्वर यांना उत्पन्नाची व नफ्याची शाश्वती मिळाली आहे. जुलैपर्यंत पपई निघणार तर ऑक्टोबर महिन्यात केळी निधण्याचे नियोजन केले आहे. यात सुद्धा अर्था खर्च व अर्धा नफा नियोजित आहे. धान शेतीला फळ बागायत पर्याप्त पर्याय आहे. फक्त शेतकऱ्यांनी परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. टरबूज, केळी व पपईला वर्षभर मागणी आहे. अपेक्षित भाव सुद्धा मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनी निश्चितच बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करावा.

शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणारा वरदान;

Antrpik Sheti 2025 एक एकरात 70 हजार रुपयांपर्यंतचा नफा…

एक एकरात टरबुजाचे उत्पन्न 15 ते 20 टन पर्यंत मिळते. त्याला 8 ते 10 रुपये किलोचा दर मिळाला. सरासरी प्रति एकर 1 लाख 50 हजार रुपये एवढे नगदी उत्पन्न हातात मिळाले. पैकी एक एकरात 60 ते 70 हजार रुपये खर्चात गेल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात अर्थ खर्चात तर अर्धा नफा तत्वावर टरबुजाची शेती फळाला आली, टरबूज आंतरपीक असून, तीन महिन्यात प्रति एकर 70 हजार रुपये नफा मोरेश्वर यांना मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now

Antrpik Sheti 2025 वर्षभरात सहा एकरात 12 लाखांचा नफा!

अभ्यासांती प्रत्यक्ष कृतीतून मोरेश्वर यांनी अनुभवलेले आहे. वर्षाला बागायतीतून बारा लाख रुपयांचा शुद्ध नफा कमवत प्रति महिना एक लाख रुपयांची मिळकत अनुभवाने कमावली आहे असे मला वाटते.

मोरेश्वर यांच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने गतवर्षी त्यांचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान सुद्धा केला आहे. या पुरस्काराने त्यांचे मनोबल ही वाढले.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment