शेतकऱ्याचा फंडा भारी, उसाच्या शेतात घेतलं आंतरपीक, 3 महिन्यात दीड लाख कमाई; वाचा सविस्तर…Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025 रेवणसिद्ध शेळके गेल्या 15 वर्षांपासून उसात आंतरपीक घेत आहेत. मेथी, हरभरा, पालक, कोथिंबीर, मका तसेच भुईमूग शेंगाची लागवड करत उसात आंतरपीक घेतले आहे.

Antrpik Sheti 2025

WhatsApp Group Join Now

सोलापूर : बदलत्या जमान्यात शेतीत बदल करून योग्य पिकांची निवड करून उसात देखील आंतरपीक घेता येते आणि नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रेवणसिद्ध दामोदर शेळके यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. मेथी, हरभरा, पालक, कोथिंबीर, मका तसेच भुईमूग, शेंगाची लागवड करत ऊसात आंतरपीक घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी रेवणसिद्ध शेळके यांनी लोकल 18 शी बोलताना दिले आहे.

रेवणसिद्ध शेळके एका एकरात उसाची शेती करत आहेत. या उसाच्या शेतीत गेल्या 15 वर्षांपासून ते आंतरपीक सुद्धा घेत आहेत. शेतात नवीन काय करता येईल यासाठी सतत मेहनत घेत असतात. मुख्य उसाबरोबरच चार अंतर पिके आणि पाचवे शेतीची पोत वाढण्यासाठी तागाची लागवड केली जाणार आहे.

या आंतरपिकांमुळे आर्थिक उत्पन्न तर वाढलेच, शिवाय ऊसाचे खोडेचे वजन वाढण्यासही मदत होते. अंतरावर ऊस लागवड असल्याने त्यास पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहते. मशागत करण्यास सोपे जाते. ऊसाच्या पाचटपासून कंपोस्ट खत तयार होते. ऊसाची वाढ होत चालल्यानंतर त्याची बांधणी केली, पाचट तोडून त्याच्या सरीत टाकल्यामुळे खत तयार होतो.

ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन उद्यापासून सुरू होणार;

मुख्य पिक ऊसाबरोबर वर्षभरात इतरही पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केली. मेथी, हरभरा, पालक, कोथिंबीर, मक्का तसेच भुईमूग, शेंगा ची लागवड त्यातून त्यांना तीन महिन्यात एक ते दीड लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळत आहे. तर स्वतः शेतकरी रेवणसिद्ध शेळके हे गावातील आठवडे बाजारात जाऊन भाजी, कोथिंबीर यांची विक्री करत आहेत.

उसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणत्याही प्रकारची आंतरपिके घेऊन शेती केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळू शकते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती केल्यास नक्कीच परवडेल सल्ला प्रयोगशील शेतकरी रेवणसिद्ध शेळके यांनी केला आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment