Animal Vitamins 2025 शरीराच्या निकोप वाढीसाठी व शरीर क्रियेसाठी आहारातून आवश्यक जीवनसत्वाची गरज असते त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे स्वास्थ बिघडते गुरांच्या आहारात प्रथिने, पिष्ठमय पदार्थ स्निग्ध पदार्थ व खनिज द्रव्य या अन्नद्रव्यांशिवाय इतर काही द्रव्यांची आवश्यकता असते.

Animal Vitamins 2025 ही पोषणद्रव्य सेंद्रिय संयुक्त पदार्थ असून शरीर वाढीसाठी शरीर स्वास्थाकरिता अतिशय अल्प प्रमाणात लागतात त्यांनाच विटामिन म्हणजे जीवनसत्वे म्हणतात. जीवनसत्वे हे सेंद्रिय पदार्थ असून शरीरातील उतींमध्ये नैसर्गिक चयापचयासाठी यासाठी अल्प प्रमाणात गरजेचे असते.
अखेर पीएम किसान हप्त्याची तारीख ठरली ‘या’ दिवशी खात्यात पैसे येणार;
Animal Vitamins 2025 सेंद्रिय द्रव्य कुठल्याही प्रकारची ऊर्जा शरीरास पुरवत नाहीत. परंतु त्यांचे आहारात असणे जीवनावश्यक आहे. आहारातून ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळतात परंतु त्यांचा अभाव असल्यास विशिष्ट रोग होतात. जीवनसत्वाचा साठा करून ठेवू शकत नाही, कारण हवेशी संपर्क असल्यास ते नष्ट होतात.

जनावरांच्या शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनसत्व आवश्यक्य आहेत. काही जीवनसत्वे शरीरातच तयार होतात तर काही आहारातून घ्यावी लागतात. जी जीवनसत्वे आहारातून मिळत नाही त्यांचा अभावाने शरीरात रोग होतात व ते मिळताच बरे होतात.
Animal Vitamins 2025 स्निग्धात विरघळणारी जीवनसत्वे-
1 . जीवनसत्व अ : फायदे :
यामुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहतो.
जनावरांच्या वाढीसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी व प्रजनन क्षमता अबाधित ठेवण्यासाठी हे जीवनसत्व उपयोगी आहे.
अभाव :
याच्या अभावाने रातआंधळेपणा होतो.
वार न पडणे , जनावर उशिरा माजावर येणे स्त्रीबीजंड बाहेर पडण्याची क्रिया लांबने मुका माज असे अभाव दिसून येतात.
उपलब्धता : हिरवा मका, हिरवे गवत, दूध, गाजर.
2 . जीवनसत्व ड : फायदे :
जीवनसत्व ड हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते.
अभाव :
याच्या अभावाने मुडदूस हा रोग होतो.
रक्तातील कॅल्शियम व स्फुरदाचे शोषण योग्य प्रकारे होते.
दातांचा विकार व हाडे ठिसूळ बनतात.
गुडघ्यांमध्ये पोकळी, सांध्यांचा आजार असे विकार होतात.
उपलब्धता :
कोवळ्या सूर्यकिरणांपासून जनावरे काही वेळ उन्हात बांधावीत.
उन्हात वाळवलेले गवत भरपूर प्रमाणात द्यावे.
3 . जीवनसत्व इ : फायदे :
जीवनसत्व इ व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते.
शरीर निकोप ठेवण्यासाठी तसेच कातडी निरोगी ठेवण्यासाठी फायद्याचे आहे. प्रजननासाठी आवश्यक्य.
अभाव :
हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो.
त्याच्या कमतरतेमुळे प्रजननाचे व वैधत्वाचे रोग होतात.
जनावर मजावर येत नाही.
उपलब्धता :
प्रजनन क्षमतेची उणीव दिसून आल्यास जीवनसत्व इ चे इंजेक्शन द्यावे.
हिरवे पदार्थ, चारा व धान्य पदार्थात रूपांतर करून देणे.

Animal Vitamins 2025 पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे-
1 . जीवनसत्व ब : फायदे :
मज्जातंतू कार्यान्वित होण्यासाठी कायद्याचे.
चयापचयाच्या क्रियेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहे.
अभाव :
याच्या अभावी मज्जातंतू सुजणे, स्नायूंची हालचाल न होणे, ही लक्षणे दिसतात.
उपलब्धता : इंजेक्शनने जीवनसत्व ब दिले जाते.
2 . जीवनसत्व क : फायदे :
रोगप्रतिकार शक्ती तसेच जखमा भरून येण्यासाठी फायदेशीर आहे.
अभाव : स्कर्वी हा रोग होतो.
उपलब्धता : संत्रा, लिंबू, चिंच, तसेच इंजेक्शनने हे जीवनसत्व क दिले जाते.
टीप: Animal Vitamins 2025
पशुतज्ञाच्या सल्याने जनावरांना जीवनसत्वाचे इंजेक्शन द्यावे. जनावरांच्या समतोल आहारात जीवनसत्वाची कमतरता भासल्यास कृत्रिमरीत्या जीवनसत्वे खाद्यातून अथवा इंजेकशनद्वारे द्यावीत . त्यामुळे जनावरांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |