शेतकऱ्यांनो अशी करा आंबा लागवड मिळवा दुप्पट उत्पादन; आंबा लागवडीबाबत संपूर्ण माहिती Amba Lagvad 2025

Amba Lagvad 2025 इस्राईल पद्धतीने का लागवड केल्याने शेतकरी आपल्या भरपूर उत्पन्न देऊ शकतो. आंब्याची सघन पद्धतीने लागवड करता येते. यामुळे उत्पादन वाढणे किंवा उत्पादन करणे शक्य असते. लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे असते या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी वळण देणे हे दोन मुद्दे जर व्यवस्थित पद्धतीनुसार व्यवस्थित झाले तर झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर प्रमाणात होते. 

Amba Lagvad 2025

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे 4000 वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन 12.12 लाख मे.टन उत्पादन मिळते.

WhatsApp Group Join Now

Amba Lagvad 2025 माहिती

पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत आंबा लागवड करताना 10 * 10 मीटर अंतरावर 1 * 1 * 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन घमेली शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. आंब्याच्या हापूस, केसर, रत्ना, सुवर्णा, साईसुगंध या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी. लागवड करताना कलमांची पिशवी अलगद कापून, मातीच्या हुंडीसह खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. लागवड करताना कलमांचा जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. हापूस जातीची लागवड करायची असल्यास परागीकरण व उत्पादनाच्या वाढीसाठी 10 ते 15 टक्के झाडे केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकूर या जातीची कलमे बागेत लावावीत.Amba Lagvad 2025

जमीन

मध्यम ते भारी प्रतीची 1.5 ते 2.0 मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचारा होणारी

सुधारित जाती  व संकरित जाती

हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज

अभिवृदधी किंवा रोप तयार करणे

पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी  करण्यात येते.Amba Lagvad 2025

लागवड
10*10  मी. भारी जमिनीत
9*9 मी. मध्यम जमिनीत
1*1*1 मी. आकाराचे खडे घेऊन शेपाखत
(४० -५० किलो) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट (२ किलो) मिश्रणाने भरावेत.
खते

Amba Lagvad 2025 एक वर्ष वयाच्या झाडास 15 किलो कंपोस्ट खत, 150 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद 100 ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत. दरवर्षी ही मात्रा  समप्रमाणात वाढवून 10 व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास 50 किलो कंपोस्ट खत, 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद व 1 किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.

पाणी व्यवस्थापन

पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

WhatsApp Group Join Now
आंतरपिके

आंबा बागेत 10 वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके  आंतरपिके म्हणून घेता येतात.

फळांची काढणी

आंबा फळे 14 आणे (85 %)  पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची   छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक  खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता 1.02 ते 1.04 एवढी असावी. फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढावीत.

प्रतवारी

Amba Lagvad 2025 > 350 ग्रॅम, 300 – 351 ग्रॅम, 251 ते 300 ग्रॅम व 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करावी. प्रतवारी झाल्यावर फळे 500 पीपीएम कार्बनडेन्झिम (0.5 ग्रॅम कार्बनडेन्झिम 1 लिटर पाण्यात ) च्या द्रावणात 10 मि. बुडवावीत त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यामध्ये भरावीत.

डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांना दिलासा

Amba Lagvad 2025 कीड व रोग नियंत्रण

तुडतुडे

पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट 30 ई.सी (10 मिली / 10 ली) किंवा मेनिट्रोथिऑन (50 ई.सी (10 मिली / 10 ली) कीटकनाशकाची फवारणी करावी.

मिजमाशी

मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानांच्या देठावर, मोहोराच्या मधल्या दांड्यावर, तसेच मोहोराच्या तु-यांवर अंडी घालते व त्यातुन बाहेर येणारी पांढरट पिवळसर अळी आतील पेशींवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे काळी गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी पालवीवर व मोहोरावर दिसून येतात. व त्यामुळे पालवी व मोहोर करपतो. जून जुलैमधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथोएट 30 ई.सी (10 मिली/ 10 ली) किंवा मेनिट्रोथिऑन (50 ई.सी (10 मिली/ 10 ली) फवारावे. या कीडीची अळी जमिनीत कोषावस्थेत जात असल्यामुळे पाऊस थांबल्यावर झाडाखालची जमीन नांगरुन त्यात मिथील पॅराथिऑनची भुकरी मिसळावी.

फुलकिडे

फुलकि़डे पानांची खालची बाजू तसेच मोहोराचे दांडे व फुले खरवडतात यामुळे पाने वरच्या बाजूला वळून पानाचा रंग करडा बनतो. मोहोर तांबूस होऊन गळतो व फळधारणा होत नाही. फळांची साल खरवडून त्यातून येणारा रस शोषतात. फुलकिडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर – फेब्रुवारी महिन्यापर्यत दिसून येतो. फुलकिडीचा सिरटोथ्रिप्स डार्सेलिस या प्रजातीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 ई.सी (10 मिली/ 10 ली) किंवा फोझॅलॉन 35 ई.सी. (10 मिली/ 10 ली) या किटकनाशकाची फवारणी करावी. आंबा फळावर आढळून येणा-या थ्रिप्स प्लॅक्स व (2.5 मिली/ 10 ली) व त्यानंतर आवश्यकता भासल्यास थायमेथोक्झाम 25 WG (2 ग्रॅम/10 ली) या कीटकनाशकाची फवारणी करावी.

फळमाशी

फळ पिकण्याच्या अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. कामगंध सापळे वापरावेत.

रोग

भूरी

मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत.0.2 %  गंधकाची पहिली फवारणी करावी. 15 दिवसांनी 0.1 % डिनोकॅपची दुसरी फवारणी करावी.

डायबॅक

रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची 3 इंच खालपासून छाटणी करावी. त्यानंतर 0.3 % ऑक्झीक्लोराइडची फवारणी करावी.

आंबा लागवडीचे फायदे Amba Lagvad 2025

  • ज्या पद्धतीने लागवड केल्यास कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळते .
  • खतांचा आणि अन्नद्रव्यांचा योग्य व काटेकोरपणे वापर केला जातो .
  • आपल्याला आंब्याची काढणी खुडणी हाताने करता येते .
  • झाडे लहान फवारणी विरळणी आणि छाटणी करणे सोपे राहते .
  • आंबा लागवडीसाठी जमीन.

एखादा शेतकऱ्याला आंबा लागवड असेल तर आंब्याची सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी तसेच त्यातून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची 1 म खोल असावी यासाठी काळी कसदार जमीन लागते . योग्य जमीन असेल तर पीक वाढीस चांगले असते तसेच जमिनीच्या सामू हा ते आठ इतक्या दरम्यान असावा . एखाद्या शेतकऱ्याला जमिनीचा सामू तपासायचा असेल तर माती परीक्षण मार्फत याचा तपास घ्यावा योग्य मातीत भरपूर उत्पाद मिळवावे तसेच योग्य मातीचा वापर करून शेती करावी.

Amba Lagvad 2025 कशी कराल आंबा लागवड…

  1. साधारणता आंबा लागवडीसाठी 10 मीटर अंतर राखले जाते.
  2. सघन पद्धतीने 5 मीटर अंतर राखले जाते.
  3. यामुळे पद्धतीत एकरी चार पट बसतात.
  4. दोन पद्धतीत लागवड ही चौरस पद्धती ऐवजी आयताकृती पद्धतीने करावी
  5. यामध्ये खड्डा मीटर असावा त्या खंडातील टोपली शेणखत टाकावे. एक किलो सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरीफॉस तसेच 100 ग्रॅम पावडर त्या खड्ड्यात टाकावे .
  6. एखाद्या शेतकऱ्याला आंब्याची शेती करायची असेल त्यासाठी सेकंड लागवडीसाठी आंब्याचे जात लोकप्रिय आहे. तसेच या आंब्याच्या वरायटी मधून शेतकरी अधिक उत्पन्न घेऊन भरपूर पैसा कमवू शकतो तसेच 30 % रत्न आणि केसर आणि आम्रपाली तसेच मल्लिका आणि केसर या जातींची लागवड करावी. या जातींची मार्केटमध्ये मागणी जास्त आहे, हे जर पीक शेतकऱ्यांनी घेतले तर त्याला अत्यंत फायदा होईल. तसेच या आंब्याच्या मराठीमध्ये दरवाढ जास्त आहे योग्य ती जात निवडून शेती करावी .

आंब्याचे साधारणता जी कलम लावायचे आहे. ते एक वर्षात वयाचे असावे आणि 10 ते 14 इंच आकाराच्या पिशवीत वाढलेल्या असावे. तसेच कलम लावताना पिशवीच्या आकाराचा खड्डा भारतामध्ये जिवाणू संवर्धके मिसळून कलम करावी अत्यंत काळजीपूर्वक रोपांचे पालन करावे कुठे होत जाईल तसे त्यातून पीक भरपूर मिळत जाईल.Amba Lagvad 2025

FAQ :

i) सघन आंबा लागवड म्हणजे काय ?

उत्तर शेतकऱ्याला आंबा लागवड असेल तर आंब्याची सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी तसेच त्यातून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची 1 म खोल असावी यासाठी काळी कसदार जमीन लागते.

ii) आंबा लागवडीसाठी मशागत कशी करावी ?

उत्तर

  • आळ्यातील तण वेळोवेळी काढणे .
  • वर्षभर दररोज दिवसाच्या अंतराने 10 ग्रॅम युरिया येथील मातीत मिसळून द्यावा
  • कलमी फांद्यांवर मोहोर वेळोवेळी काढावा
  • जनावरांपासून त्याचे संरक्षण करावे



Leave a Comment