अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्राचा कडाडून विरोध, ‘या’ दोन खासदारांनी मांडली भूमिका! Almatti Dhran 2025

Almatti Dhran 2025 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या शेतजमिनी, घरे बुडवणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने केंद्र सरकारने परवानगी देऊ नये, ही उंची वाढण्यास महाराष्ट्राचा ठाम विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक व खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय जनशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासमोर गुरुवारी दिल्लीत मांडली.

Almatti Dhran 2025

याबाबतचे निवेदन ही दोघांनी मंत्री पाटील यांना दिले. यावर मंत्री पाटील यांनी हा विषय न्यायालयात आहे. मात्र, महाराष्ट्रसह आंध्र व तेलंगणाचाही उंची वाढवण्याला विरोध असेल तर या प्रश्नी मध्यस्थी करून लवकरच चारही राज्याच्या जलसंपदा मंत्र्यासमवेत बैठक घेण्याची ग्वाही दिली. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीवरून महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये पुन्हा मागाची ठिणगी पडली असून या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांची खासदार महाडिक व खासदार माने यांनी भेट घेतली.

हवामान अलर्ट! पिकांची व फळबागांसाठी तातडीने करा ‘या’ उपाययोजना;

Almatti Dhran 2025 खासदार महाडिक म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापुराचे संकट अति गंभीर होऊ शकते. महाराष्ट्रात सह आंध्र आणि तेलंगणा राज्याचाही अनमती धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. हजारो नागरिकांच्या शेतजमिनी घरे बुडवणाऱ्या या धरणाची उंची वाढवण्याला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक बोलवावे अशी मागणी महाडिक यांनी केली.

WhatsApp Group Join Now

Almatti Dhran 2025 संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा!

अलमट्टी धरणाची पावसाळ्यात पाण्याची पातळी कमाल मर्यादा मीटर निश्चित करावी, दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिक समन्वयासाठी संयुक्त पूर यंत्र प्राधिकरण स्थापन करून कृष्णा नदीच्या खोऱ्यात रियल-टाईम मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित करा, धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निष्काळाजीपणा आणि सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीररित्या जबाबदार धरा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली.

इतर माहीतीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment