शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर; AI In Farming 2025

AI In Farming 2025 नागपूर: हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजाती आणि या सर्वांचा थेट परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षावर. शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोक्यावर काढतोय अशा वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा किरण म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा उजेड ठरू शकतो का?

AI In Farming 2025

जगभर शेतीत एआयचा उपयोग करून अचूक हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन, रोबोटिक तंत्र, आणि ‘स्मार्ट फार्मिंग’ सुरू आहे. मात्र, भारतात याची शक्यता, अडथळे व भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा गरजेची आहे. कारण, जर शेती वाचवायचे असेल तर तिला शहाणपणाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार लागणारच आहे.

‘मे’ महिन्यातच पाण्याची कृपा निम्न तेरणा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ! वाचा सविस्तर; 

AI In Farming 2025 राज्य सरकारने सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी पुढील दोन वर्षांकरिता 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने राज्यात कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. काही कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, त्यांनी केलेला अभ्यास व प्रयोगांचे प्रात्यक्षिके दाखवली जात आहे.

WhatsApp Group Join Now

AI In Farming 2025 फुड टेक्नॉलॉजी सह शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक उद्योगांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता येतो. एआय चा वापर कोरडवाहू शेतकऱ्यांनी कसा करावा, यावर विचार करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापराचा भांडवली खर्च, व देखभाल खर्च, गुंतवणूक यांच्या ताळेबंदाचा विचार व्हावा. अन्यथा सेन्सर, ड्रोन, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्या व स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रांना या तंत्रज्ञानातून नफा मिळेल आणि शेतकरी लुटला जाईल.

‘अँप’द्वारे लगेच सूचना

यासाठी विशिष्ट ॲप विकसित केले जात आहेत. त्या ॲपद्वारे सॅटॅलाइट मॅपिंगमुळे शेतीतील मातीत असलेली अन्नद्रव्य, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाहण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन यांची अचूक माहिती व आकडेवारी मिळते. पिकांवर रोग व किड्यांचा प्रादुर्भावाची सुरुवात होताच त्याची ही सूचना दिली जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा किमान 40 टक्के व खतांचा 30 टक्के वापर कमी होत असून, पीक उत्पादनात 40 टक्के वाढ होऊ शकते.

AI In Farming 2025 मूलभूत सुधारणा आवश्यक

WhatsApp Group Join Now
  • भारत उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्याने परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांची तंत्रज्ञान व कौशल्य निपुणता विचारात घेणे, वैज्ञानिक क्लीष्टता टाळणे, कृषी निविष्ठा वाजवी दरात तसेच सरकारी अनुदानावर सहज उपलब्ध करून देणे.
  • जमिनीतील सेन्सर इनपुट साठी 24 तास वीज पुरवठा, सॅटॅलाइट मॅपिंग सपोर्ट, जीपीएस, इंटरनेट ऑफ थिंग्स साठी नेटवर्क उपलब्धता, ओवर हेड, लाईट वायर, ट्रान्सफॉर्मर पक्षी यामुळे ड्रोनचे तसेच वन प्राण्यांमुळे या संयंत्रांचे होणारे नुकसान यांसह अन्न महत्त्वाच्या बाबींवर विचार करणे व त्यात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment