Agro Advisory 2025 सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केली आहे. त्याविषयी जाणून घ्या सविस्तर.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 फेब्रुवारी रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमान हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील तीन दिवसात किमान तापमानत फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तर भागात 1 ते 2अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारित अंदाजानुसार (इआरएफएस) 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा जास्त व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळेबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारित कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.
वाढत्या उन्हात हरितगृह, शेडनेटमध्ये पीक घ्यायचे आहे ? अशा पद्धतीने करा पिक व्यवस्थापन
पीक व्यवस्थापन :
रब्बी ज्वारी :
रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. पाणी भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात.
उशिरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बॅन्जोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्प्रिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.फवारणी करत असताना कीटकनाशक पडेल अशा प्रकारे फवारणी करावी.
गहू :
गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था पेरणीनंतर 80 ते 85 दिवस व दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवस पाणी द्यावे.
गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन 10% इसी 10 मिली किंवा क्वेनॉल्फोस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गूळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा किंवा थोडेसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकून बिळे बंद करावे.
फळभागेचे व्यवस्थापन :
केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीएम ची फवारणी करावी. द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला :
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तळविरहित ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे व गादीवाफ्यावरील रोपांना 30 दिवस झाले असल्यास पुनर लागवड करून घ्यावी.
फुल शेती :
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहित ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन :
जनावरांचा घरी गुराक तयार करताना सरकी / खापरी पेंड दूध वाढत म्हणून 33% पेक्षा जास्त वापरली, तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढवून दुधातील जनावरे महिने महीनोमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसाय ही काळजी घ्यावी.