यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर! Agriculture Market MSP 2025

Agriculture Market MSP 2025 केंद्र सरकारने 2025 साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार असुन, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे.

Agriculture Market MSP 2025

Agriculture Market MSP 2025 परभणी जिल्ह्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, खरीप हंगामातील अनेक पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यात आल्या आहेत.

केळी उत्पादकांना बसतोय दुहेरी फटका, वादळी वाऱ्याने बागांचे नुकसान तर दरात ही घसरण!

साधारण ज्वारीसाठी 328 रुपयांनी वाढवून नवीन किंमत 3699 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Agriculture Market MSP 2025 मक्यात 150 रुपयांची वाढ होऊन 2400 रुपये, बाजरी 175 रुपयांची वाढ होऊन 2775 रुपये, तर नाचणीसाठी तब्बल 596 रुपयांची वाढ होऊन 4800 रुपये किंमत निश्चित करण्यात आले आहे.

डाळींची पिकातही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. तूर साठी 8000 रुपये, मुग साठी 8738 रुपये आणि उडीद साठी 7800 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आले आहेत. तेलंबीयामध्ये तीळ 9846 रुपये (579 रुपयांनी वाढ) सोयाबीन 5328 रुपये (436 वाढ) आणि सूर्यफूल 7721 रुपये (441 वाढ) अशी दरवाढ जाहीर केले आहे.

कापसाच्या किमतीतही 589 रुपयांची भर घालून 8110 रुपये प्रतिक्विंटल अशी नवी किंमत निश्चित करण्यात आली आहे. रब्बीतील गव्हासाठी 2425 रुपये (150 वाढ), हरभऱ्यासाठी 5650 रुपये (210 वाढ ), मोहरीसाठी 5950 रुपये (300 वाढ), आणि करडी साठी 5940 रुपये(140 वाढ) ठेवण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

Agriculture Market MSP 2025 आधारभूत किंमतवाढीने वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न:

आधारभूत किंमतवाढीचे शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक व स्वागतार्ह आहे असल्याचे बाजार समिती संचालक डॉ संजय रोडगे म्हणाले.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment