‘या’ यंत्राच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर…Agriculture Instrument 2025

Agriculture Instrument 2025 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही घोषणा सत्यात उतरेल, असा दावा ‘व्हीएनआयटी’ चे प्रा.डॉ.दिलीप पेशवे यांनी केला आहे.

Agriculture Instrument 2025

व्हीएनआयटी व देशातील इतर संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणी पर्यंतची यंत्रे तयार केले आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न 250 टक्के वाढेल, असा विश्वास डॉ. पेशवे यांनी व्यक्त केला आहे.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे त्यांनी या यंत्राच्या उपयोगितेचे सादरीकरण केले. यंत्र विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना गृहीत धरूनच तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

एका एकरातील गव्हाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत साधारणतः 20 ते 22 हजारांचा खर्च येतो. समजा, त्यांचा गहू 30 हजारांत विकला तर केवळ 8 ते 10 हजारांचे उत्पन्न होईल.

मात्र, व्हीएनआयटीच्या तंत्राने शेती केल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कार्यासाठी केवळ 3,500 ते 4000 रुपये खर्च लागेल व 25,000 ते 26,000 नफा मिळेल, असा विश्वास डॉ. पेशवे यांनी व्यक्त केला.

गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

खते किंवा कीटकनाशकांवर शेतकऱ्यांचा बराच पैसा जातो. यावर उपाय म्हणून व्हीएनआयटीच्या केमिकल इंजीनिअरिंग विभागाने गोमूत्र व शेणापासून कीटकनाशके तयार केले आहेत.

या पंचगव्याचा वापर केल्यास पिकांवर कोणताही रोग लागणार नाही. यामुळे खते व कीटकनाशकांचा 2 ते 3 हजार रुपयांचा खर्च वाचेल, सदर यंत्र खरेदी करण्यासाठी 3500 ते 4000 रुपये खर्च लागेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन 25,000 ते 26,000 रुपये नफा मिळेल.

WhatsApp Group Join Now

Agriculture Instrument 2025 हे आहेत उपयोगाला येणारे यंत्र…

नांगरणीसाठी बूलक ट्रॅक्टर नांगरणीसाठी बूलक ट्रॅक्टर तयार केला. नांगरणीच्या अवजारांना चाके लावली यामुळे बैलावरील वजन कमी होईल आणि वेगाने नांगरणी होईल.
पेरणीसाठी ड्रम सिडरएक गोल ड्रम आहे. त्यास टोकदार छिद्र आहेत. या छिद्रातून धान्य जमिनीत पेरले जाईल. वेगाने काम होईल.
निंदण काढण्यासाठी ‘विकल्प व्हीडर’निंदण करणाऱ्या महिला किंवा पुरुषांना अनेक तास शेतात बसून निंदण करावे लागते. ‘विकल्प व्हीडर’ द्वारे एकच व्यक्ती वेगाने पिकांना हानी न पोहोचता शेतातील अनावश्यक तण काढू शकतो. यात आता लिथियम आयन बॅटरी लावली आहे, ज्यामुळे आवाज किंवा प्रदूषण होत नाही.
विकल्प हार्वेस्टिंगतासनतास विळ्याने पीक कापण्याची गरज नाही. एक किंवा दोन व्यक्ती उभ्यानेच कमी वेळात पिकांची कापणी करू शकेल.
मळणी यंत्रमळणी यंत्र ही आहे. शिवाय धान्य सोंगण्याचे ‘स्कायथे’ नावाचे यंत्र तयार केले आहे. याद्वारे शेतातील सौर पॅनल चा वापर करून शेतातच धान्याची सोंगणी करता येईल.
विकल्प सोलर पंपसौरऊर्जेच्या मदतीने एका तासात 25 हजार लिटर पाणी (साध्या पंपापेक्षा दुप्पट) देणे शक्य आहे.

“देशभरातील विविध संस्थांद्वारे यावर कार्य सुरू आहे. उत्तर प्रदेश, गुजरात अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी या यंत्राचा उपयोग सुरू केला आहे. विदर्भात आम्ही पोहोचू शकलो नाही; पण यापुढे विदर्भात ही या तंत्राचा प्रचार-प्रसार करण्यात येईल.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment