Agriculture Export 2025 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाएफपीसीने पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने महाएएफसी संचालक मंडळाने संयुक्त अरब अमिराती (UAE) दौरा केला. डाळवर्गीय पिके आणि कांदा यांना केंद्रस्थानी ठेवून दुबई, अबुधाबी आणि शारजा येथील कृषी बाजारपेठा सुपर मार्केट आणि हायपर मार्केट यांना भेट देण्यात आल्या.

दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आयोजित प्रतिष्ठित ‘गल्फ फूड 2025’ प्रदर्शनात देखील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तसेच या निमित्ताने महाएफपीसी शिष्टमंडळाने निर्यात पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार आणि फूड हब प्रतिनिधीं सोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
Agriculture Export 2025 या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचा थेट निर्यात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाएफपीसी कडून विशेष उद्देश वाहन (SPV) स्थापन करण्याची योजना असून यामुळे कंपन्यांना निर्यात झालेल्या शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था, होलसेल आणि रिटेल विक्रीसाठी आवश्यक सुविधा तसेच खरीदारांकडून पेमेंटची खात्री मिळण्यास सुविधा होणार आहे.
सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड वाचा सविस्तर..
प्रथम टप्प्यात महाएफपीसी संयुक्त आरोप अरब अमिरातीमध्ये लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित फूड हब, खरेदीदार यांच्यासोबत भागीदारी करण्यावर भर देणार असून त्यानंतर इतर गल्फ देशांमध्ये विस्तार करण्याचा मानस आहे. तसेच निर्यात मूल्य साखळी बळकट करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर गुंतवणूकदारांना निमंत्रित केले जाणार आहे.
शंभर कोटींच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधी निर्माण उद्देश Agriculture Export 2025
महाएफपीसीने ‘दुबई डिक्लरेशन 2025’ उपक्रमांतर्गत शंभर कोटींच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधी निर्माण करण्याचा महत्त्वकांक्षी उद्देश ठेवला आहे.

या उपक्रमात पाच प्रमुख दिशानिर्देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश वाढवणे, कृषी निर्यात लॉजिस्टिक्स मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय स्त्रोत मिळवणे, निर्यात व्यवसायातील ज्ञान व्यवस्थापन सुधारणा, व्यवसाय विविधकरणाला चालना देणे, या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये थेट सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
इतर शेती विषयक माहितीसाठी | येथे क्लिक करा |