कृषी व्यापारातील संधी व आव्हाने!! Agricultural Trade 2025

Agricultural Trade 2025 शेतमालाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे शेतमालाची विक्री ही गुंतागुंतीची झाली आहे. शेतात पिकवलेले पिकणे हे दिवस इतिहास जमा झाले असून जे विकते ते पिकवणे हे गरजेचे बनले आहे. ग्राहकांवर अवलंबित बाजारपेठ ही गरज बनली असून त्याप्रमाणे कृषी माल उत्पादन व विक्रीमध्ये बदल करणे शेतकऱ्यांना अनिवार्य झाले आहे.

Agricultural Trade 2025

WhatsApp Group Join Now

Agricultural Trade 2025 पारंपारिक भारतीय शेती पद्धतीमध्ये स्वतःसाठी पिकवण्याचे व स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त झालेले फक्त विकायचे हा दृष्टिकोन होता. परंतु, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतमाल उत्पादन करणे, कृषी निर्यातीत वृद्धी करणे ही शेतकरी व देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.

कोबीवर्गीय पिके रोग व कीड व्यवस्थापन!!

Agricultural Trade 2025 पुरातन काळापासून भारत हा चहा, कॉफी, बासमती तांदूळ या शेतमालाचा निर्यातदार देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात भारताची कृषी मालाची निर्यात ही देशाच्या एकूण निर्यातीच्या 50% इतकी होती. आज ती फक्त 10 टक्क्यावर येऊन पोहोचले आहे. तंबाखू, काजू, मसाल्याचे पदार्थ यांचा वाटा कृषीमाल निर्यातीमध्ये अधिक होता.

Agricultural Trade 2025 आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या विविधपूर्ण कृषी हवामानामुळे काही अपवाद वगळता सर्व पिके घेण्याची क्षमता आपल्याकडे असली तरी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठाचे मागणी व त्या पिकानुसार मिळणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन निवडक पिके उत्पादित करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now

जागतिक बाजारपेठेत आपण चांगले फळ व भाजीपाला निर्यातदार बानू शकतो. कारण जगातील 13 टक्के भाजीपाला व 11 टक्के फळे भारतात पिकवली जातात. जगातील सर्वात जास्त डाळिंब, आंबा, केळी भारत उत्पादित करत असला, तरी जागतिक फळ निर्यातीमध्ये त्याचा हिस्सा 0.5 % एवढाच आहे.

Agricultural Trade 2025 महाराष्ट्रातील फळ पिकाखाली क्षेत्रात व उत्पादनात चांगलीच क्रांती झाली असून देशातील 80% पेक्षा जास्त द्राक्ष व डाळिंब तर 20 टक्के पेक्षा जास्त केळी महाराष्ट्र मध्ये पिकवली जाते. देशाच्या एकूण फळ व भाजपाला निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशातील तसेच राज्यातील फुलांच्या उत्पादनात मोठे वाढ झाली असून गुलाब, कार्नेशन, जरबेरा या लांब दांडे असणाऱ्या फुलांची निर्यात चांगलीच झाली आहे.

कृषी व्यापारात संधी बरोबर काही आव्हाने देखील आहेत. प्रामुख्याने वाहतुकीमध्ये होणारी सुलभता वर्षभर होणारे निर्यातीसाठीचा पुरवठा लोकांची वाढती आवड यांचा विचार करता प्रक्रिया उद्योग आजच्या काळात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. कारण देशातील फक्त 1 टक्के शेतमालावरच प्रक्रिया केली जाते. इतर देशाच्या तुलनेत ती खूप कमी आहे.

Agricultural Trade 2025 देशातील उपलब्ध प्रक्रिया उद्योगांपैकी केवळ 48% वापरात आहेत. त्यामुळे ही फळे व प्रक्रिया युक्त फळे यांच्या निर्मितीमध्ये आपण मागे आहोत भारतात शेतमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दरवर्षी 55 हजार कोटींचे नुकसान होते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment